एकूण 70 परिणाम
जून 10, 2019
मुंबई - भाडेवाढ, निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी आदी मागण्या 30 जूनपर्यंत मान्य न झाल्यास 9 जुलैला राज्यातील रिक्षाचालक  संप पुकारतील, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नेतृत्वाखालील संयुक्त कृती समितीने रविवारी दिली. समितीने मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनाही दिले आहे...
जून 09, 2019
मुंबई : दरवाढ तसेच पेन्शन, पीएफ आदी मागण्या 30 जूनपर्यंत सरकारने मान्य न केल्यास 9 जुलै रोजी राज्यातील सर्व रिक्षाचालक संपावर जातील, अशी घोषणा ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने केली. ही माहिती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी आज (रविवार) येथे दिली.  या मागण्या महाराष्ट्र सरकारने...
जून 02, 2019
मुंबई - सीएनजी दरवाढीचे कारण पुढे करत टॅक्‍सीचे किमान भाडे २२ वरून ३० रुपये आणि रिक्षाचे किमान भाडे १८ वरून २२ रुपये करण्याची मागणी चालकांच्या संघटनांनी केली आहे. तसे पत्र मुंबई टॅक्‍सीमेन्स युनियनने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. या मागणीबाबत १५ दिवसांत निर्णय न झाल्यास संपाचा इशारा या...
मे 04, 2019
मुंबई - मध्यरात्री १२ वाजल्यानंतर रिक्षा-टॅक्‍सीचालक नियमित भाड्यापेक्षा वाढीव भाडे आकारतात. मात्र, डिजिटल मीटर आल्यानंतरही त्यांच्याकडून प्रवाशांची होणारी लूटमार थांबलेली नाही. रात्री ११ नंतरच डिजिटल मीटरमध्ये नाईट चार्जप्रमाणे भाडे दाखवले जात असल्याने त्यांचे प्रवाशांशी खटके उडत आहेत. अमित जगाते...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्यामुळे शहरातील ‘कॅब’ची संख्या वाढून आता ३३ हजारांवर पोचली आहे. मागील सुमारे चार वर्षांत कॅबची संख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॅब’ने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर कॅब कंपन्यांना संलग्न रिक्षांचीही संख्या दोन्ही शहरांत...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबईः उबरची तांत्रिक अडचणींमुळे आज (शुक्रवार) सुरू होणारी उबर 'टॅक्सी'सेवा लांबली आहे. उबर इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. मात्र, ही सेवा नेमकी कधी सुरू होईल, याबद्दल स्पष्ट करण्यात आलेले नाही. जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या सहकार्याने...
फेब्रुवारी 01, 2019
मुंबई - उबर आता मुंबई पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून समुद्रात बोट सेवा सुरू करणार आहे. गेटवे ऑफ इंडिया, घारापुरी आणि मांडवा अशा मार्गांवर उबर बोट चालवण्यात येईल. शुक्रवारपासून (ता. १) सेवा सुरू होणार असून, प्रवासाच्या किमान १५ मिनिटे आधी बोटीचे तिकीट आरक्षित करता येईल.  मुंबई व उपनगरांत रेल्वे, बस,...
जानेवारी 11, 2019
मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा, टॅक्‍सी आणि खासगी वाहनांवर किमान १५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावा लागला आहे. संपामुळे शेअर रिक्षा आणि टॅक्‍सीने येण्या-जाण्यासाठी प्रत्येक...
जानेवारी 09, 2019
मुंबई - बेस्टच्या कर्मचारी आणि कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे मंगळवारी (ता. 8) सुमारे 27 लाख प्रवाशांचे "मेगा हाल' झाले. घरापासून रेल्वेस्थानक गाठणे अवघड झाल्यामुळे शेअर रिक्षासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या; तर लांबचा प्रवास करणाऱ्यांचा खिसा टॅक्‍सीचालकांनी रिकामा केला.  विविध मागण्यांसाठी "...
जानेवारी 04, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) दिवे येथील ‘टेस्टिंग ट्रॅक’वर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा कोटा ऑटो रिक्षा आणि टुरिस्ट टॅक्‍सीसाठी वाढविण्यात आला आहे. या वाहनांव्यतिरिक्त अन्य परिवहन वाहनांचा कोटा पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आरटीओकडून वाहनांच्या...
नोव्हेंबर 07, 2018
मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दोन वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अवघ्या 24 तासांच्या आत गजाआड करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे. पार्वतीदेवी रामछबिला विश्‍वकर्मा असे अटकेत घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मूल होत नसल्याच्या नैराश्‍येतून हे कृत्य केल्याची कबुली तिने दिली आहे...
सप्टेंबर 17, 2018
आयुष्यातील अनेक अपघातांतून मला जीवदान मिळाले. देव तारी त्याला कोण मारी? रिक्षाने जाताना समोरून आलेल्या गाडीने जोरात धडकत दिली. पलट्या खाऊन रिक्षा प्रभात रस्त्यावर कोपऱ्यातील झाडावर आदळली. ड्रायव्हर जखमी. माझ्या कंबर-पाठीला मार. एकदा अलका टॉकीजजवळ पतीबरोबर स्कूटरवर होते. पोलिसाने हात दाखवल्यावर...
सप्टेंबर 12, 2018
सावर्डे - मुंबई-गोवा महामार्गावर कामथे घाटात एका रिक्षात शर्ट पॅंट परिधान केलेली एक महिला रिक्षाचालक दिसली. ‘गणपती इलो, चला गावाक... कोकण आपलाच असा’, असे सांगत विजया विजय राणे रिक्षा चालवत मुंबई मालवण प्रवास करत होत्या. त्यांची जिद्द आणि धाडस पाहून चिपळूणच्या सभापती पूजा निकम यांनी त्यांचे स्वागत...
ऑगस्ट 30, 2018
सातारा - नव्या दरप्रणालीनुसार मीटरमध्ये दुरुस्ती करण्याची रिक्षाचालकांना दिलेली मुदत संपत आली आहे. त्यामुळे येत्या पाच तारखेपासून मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे मीटरनुसार भाडे आकारणीस नकार देणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध तक्रार करण्याचे आवाहन उपप्रादेशिक...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - ‘महाराष्ट्र बंद’चा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. खबरदारीचा उपाय म्हणून एसटी आणि पुणे महापालिका परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा बंद ठेवण्यात आली होती. रिक्षा, खासगी टॅक्‍सीचीही किरकोळ वाहतूक सुरू होती. रेल्वे वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती. बंदमुळे एसटी आणि पीएमपीचे सुमारे पावणेदोन...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव शेरी - बंदमुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विमानतळावरून पुण्यात जाण्यासाठी टॅक्‍सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. विमानतळावरून कॅंप किंवा स्टेशन परिसरात जाण्यासाठी टॅक्‍सीचालक दोन हजार रुपये, तर रिक्षाचालक...
जुलै 23, 2018
सातारा - पहिला टप्पा एक किलोमीटरचा करून २० रुपये पहिले टप्पा भाडे निश्‍चित करण्याची रिक्षाचालकांची अनेक दिवसांची मागणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने मान्य केली. मात्र, शहरामध्ये बहुतांश रिक्षाचालक मीटर न टाकताच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे. त्यावर अंकुश...
जून 26, 2018
औरंगाबाद - जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स रिक्षाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी रॉडला विशिष्ट पद्धतीने लावण्यास रिक्षाचालकांनी विरोध दर्शवला आहे. तुम्ही स्टिकर द्या, आम्ही रिक्षात सोयीच्या ठिकाणी चिकटवतो, अशी भूमिका सध्या रिक्षाचालकांनी घेतली आहे. ...
जून 18, 2018
औरंगाबाद : जिल्हाभरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले क्‍यूआर कोड स्टिकर्स अखेर तयार झाले आहेत. चालक-मालकांची संपूर्ण कुंडली असलेले मराठीतून तयार केलेले क्‍यूआर कोड लवकरच रिक्षा, टॅक्‍सींवर झळकणार आहेत.  ऑटोरिक्षा आणि टॅक्‍सीचालकांकडून प्रवाशांसोबत अरेरावी व असभ्य वर्तन केल्याच्या अनेक...
मे 31, 2018
मुंबई - जवळचे भाडे असल्यास "वेटिंगवर आहे' असे सांगत ते नाकारणे, "इंधन संपले आहे', असे खोटे सांगणाऱ्या रिक्षा, टॅक्‍सीचालकांच्या बनवेगिरीला चाप बसणार आहे. रिक्षा, टॅक्‍सीच्या दर्शनी भागात "उपलब्ध आहे (हिरवा रंग), "उपलब्ध नाही (लाल रंग)' आणि "बंद (पांढरा रंग) याचा दर्शनी फलक (डिस्प्ले बोर्ड) लवकरच...