एकूण 14 परिणाम
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
नोव्हेंबर 02, 2018
सहलीत बाई आजारी पडल्या. मुलाशी फोनवर बोलल्या आणि पुढच्या प्रवासात त्यांना काहीही त्रास झाला नाही. आम्ही आधीच युरोपला पोहोचलो होतो. बाकीचे सहलकरी मागाहून आले. हॉटेलवर फडकेबाई भेटल्या. अनेक देश भटकत पॅरिसला आलो. डिस्नेलॅंडला गेलो. डिस्नेलॅंडमधील खेळ पाहत हिंडत होतो. जेवणाची वेळ झाली म्हणून ठरलेल्या...
सप्टेंबर 17, 2018
आयुष्यातील अनेक अपघातांतून मला जीवदान मिळाले. देव तारी त्याला कोण मारी? रिक्षाने जाताना समोरून आलेल्या गाडीने जोरात धडकत दिली. पलट्या खाऊन रिक्षा प्रभात रस्त्यावर कोपऱ्यातील झाडावर आदळली. ड्रायव्हर जखमी. माझ्या कंबर-पाठीला मार. एकदा अलका टॉकीजजवळ पतीबरोबर स्कूटरवर होते. पोलिसाने हात दाखवल्यावर...
एप्रिल 25, 2018
पहिलाच परदेश प्रवास. अनोळखी ठिकाणी फोन बंद. रात्र वाढत चाललेली. हॉस्टेलपर्यंत जायचे कसे? आतून घाबरलेली. तरी धीटाईचा आव. त्या रात्री भेटलेल्या ब्रिटिशांनी सहकार्याचा हात पुढे केला आणि मुक्काम गाठून दिला. वास्तुरचनाशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी मी पुण्याहून लंडनला निघाले. माझा पहिलाच परदेश प्रवास...
फेब्रुवारी 22, 2018
नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले. येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो. सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी...
जानेवारी 29, 2018
एखादी सहल विशिष्ट कारणाने लक्षात राहते. केनियात फिरत होतो, त्या भागात त्या दिवसात रोज संध्याकाळी चार वाजता पाऊस पडायचा. आमची ती चहाची वेळ असते, म्हणून आम्ही त्याला नावच ठेवले - चहाचा पाऊस. केनियाला जायचे होते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात; पण तयारी एप्रिलपासून सुरू झाली. त्या देशात प्रवेश करायला...
ऑक्टोबर 19, 2017
आज लक्ष्मीपूजन. पण मागल्या दारातून अलक्ष्मी येऊन आपल्याला संकटात टाकणार नाही, याची काळजी घेण्याचाही दिवस. एका उद्योजकाला चीनमध्ये अलक्ष्मीचा तडाखा बसणार होता, त्याची ही गोष्ट.  इलेक्‍ट्रॉनिक्‍समधे लागणाऱ्या सुट्या भागांचे उत्पादन करताना, चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त मालाशी नेहमीच तीव्र स्पर्धा असते...
ऑगस्ट 07, 2017
आयुष्यात कधी कधी अशा गोष्टी घडतात, की कुठल्या तरी अदृश्‍य शक्तीचे अस्तित्व नाकारायला मन धजावत नाही. अशीच एक गोष्ट. काही वर्षांपूर्वीची. आमचे टोकियोला पोस्टिंग होते. तेथे दोन वर्षे राहून आम्ही अल्जेरियाला गेलो. टोकियो आणि अल्जेरिया सगळ्याच बाबतींत दोन टोके. तेव्हा डॉलर काही आजच्यासारखे मिळत नव्हते....
जुलै 12, 2017
परदेशात पहिल्यांदाच गेलो होतो. मुंबईच्या विमानतळावर मोबाईल हरवलेला. म्हणजे परदेशात जाऊन संपर्ककक्षेच्या बाहेर. काही धांदरटपणा, काहीशी धांदल; पण प्रत्येक वेळी जणू देवाचीच सोबत होती. पाच वर्षांपूर्वी पासपोर्टच्या गडबडीमुळे परदेशवारी हुकली आणि आता ती पुन्हा चालून आली. कंपनीने निवडलेल्या मशिन्सच्या...
जून 08, 2017
आजोबा गेले ती सरत्या मार्गशीर्षातील संध्याकाळ होती. सहा वाजल्यापासूनच सगळीकडे अंधारून आलं होतं. हवेत गारवा जाणवत होता. माणसं घराकडे परतत होती. गुरे-ढोरे गोठ्यात आधीच बांधली होती. आजूबाजूच्या घरातील बाया-मुली चुली पेटवत होत्या. सकाळपासूनच आजोबांची हालचाल थंडावत चालली होती. दादांच्या सांगण्यावरून...
एप्रिल 20, 2017
आंऽबा पिकतो.. रस गळतो... आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. हा आंबा मिळवण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. आंबा मिळवण्यासाठी तो काहीही करू धजतो. एकदा का आंबा मिळाला की तो तृप्त होतो. उन्हाळ्याचे दिवस. आम्ही कोकणच्या माहेरवाशिणी मुंबईला घरच्या आंब्याची वाट बघत असायचो. आमचे भाऊ प्रेमाने आम्हा सर्वांना...
मार्च 31, 2017
परदेशात अचानक वेगळाच मार्ग आपल्याला सुचवला जातो. आपल्यालाही त्यातील थ्रिल त्या मार्गावर जायला लावते. पण जोशात सुरू केलेल्या प्रवासात काहीतरी चुकते आणि मग थ्रिलची जागा चिंता घेते. आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो. मेलबर्नहून सिडनीला जायचा बेत होता. संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेन होती. आरक्षण आधीच झालेले...
डिसेंबर 19, 2016
मी आणि मुक्ता दोन दिवस अमृतसरला गेलो होतो. दोन दिवसांच्या अमृतसर भेटीत काही गोष्टी ज्या माझ्या कायमच्या लक्षात राहतील त्या म्हणजे येथील रस्ते, वेगवेगळ्या प्रकारच्या रिक्षा आणि रिक्षा चालविण्याची पद्धत. येथे तीन प्रकारच्या रिक्षा बघायला मिळाल्या, एक आपली नेहमीची इंजिनवर चालणारी रिक्षा, दुसरी...
जुलै 05, 2016
आदिमानवाची जसजशी प्रगती होत गेली, तसतसा तो स्थायिक होऊन एका जागी राहू लागला. कालांतराने पंचमहाभूते व जंगली श्वापदे यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्याने घर बांधण्याची कला शिकून घेतली. घरापाठोपाठ दारही आले. मानवाच्या काही दुर्गुणांना दूर ठेवण्यासाठी दाराला कुलूप लावण्याची गरज भासू लागली....