एकूण 423 परिणाम
जुलै 22, 2019
राजुर (जि. जालना) : राजुर येथील स्वस्त धान्य नं 89 दुकानातील गव्हात युरीया आढळला. यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने तसेच गावकरी यांच्या वतीने राजुर येथे सोमवारी ( ता. 22)  राजुर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  यावेळी रस्त्यावर दोन्ही बाजूला  लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.  ...
जुलै 21, 2019
साकोली (जि. भंडारा) : लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे विदर्भाचा महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्पाचे काम सहा वर्षांपासून बंद पडलेले आहे. या प्रकल्पासाठी अनेकांच्या जमिनी गेल्याने शेतकरी भूमिहीन झाले. मात्र, प्रकल्प सुरूच न झाल्याने बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शासनाने या प्रकल्पाकडे लक्ष...
जुलै 21, 2019
पाली :  श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात कामगिरी बजावणाऱ्या अधिपरीचारक अक्षय अजित कांबळे यांना शनिवारी (ता.20) रात्री नऊच्या सुमारास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण  करण्यात आली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील 38 कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता.21) दिवसभर काम बंद आंदोलन करून धरणे धरले होते. त्यामुळे येथील...
जुलै 21, 2019
राजा ढाले यांनी सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन या तिन्ही क्षेत्रांत अत्यंत ज्वलंत कामं केली; पण या सर्व कामांमागं एक दीपस्तंभ सतत झगमगत होता आणि तो त्यांच्या प्रज्ञेचा होता. प्रज्ञेच्या पडझडीच्या काळात त्यांच्या या प्रज्ञेचं मोल विशेषच वाटतं. ढाले यांचं नुकतंच (ता. १६ जुलै) निधन झालं. त्यानिमित्त...
जुलै 21, 2019
नागपूर : देशातील सर्वांत मोठे व्यापारी हब म्हणून नागपूरच्या विकासासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेऊन व्हिजनबेस आराखडा तयार करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केंद्र व राज्यात आमचेच सरकार असल्याने चेंबरने तयार केलेल्या आराखड्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी...
जुलै 20, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीबरोबरच कोल्हापूर महापालिका निवडुकीतही भाजपचीच सत्ता आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी आदेश दिल्याने कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. शहरातील भाजपने पंधरा दिवसात विविध आंदोलने करून शहरातील महत्त्वाचे विषय हाती घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर महापलिका मिशन २०२०...
जुलै 17, 2019
कॉंग्रेसने काढली मनपाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा  जळगाव : मनपा प्रशासनाचा निषेध असो, लाज वाटते ना.. या खड्डयांची, चिड येते ना.. या खड्डयांची, बांगड्या भरा.. बांगड्या भरा, सत्तेसाठी बांगड्या भरा अशा घोषणा देत आज कॉंग्रेसतर्फे महापालिकेची प्रेतयात्रा काढून महापालिकेच्या निषेध करण्यात आला....
जुलै 17, 2019
जीवघेण्या रस्त्यांच्या प्रश्‍नावर  जळगावकर आक्रमक  जळगाव : "अमृत' योजनेमुळे खोदलेले रस्ते, प्रमुख रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जिवावर उठत असून, दोन दिवसांत या खड्ड्यांनी दोघांचा बळी घेतला. त्यामुळे याप्रश्‍नी आता जळगावकर आक्रमक झाले आहेत. याविरोधात तीव्र जनआंदोलनासह आयुक्त, पोलिस अधीक्षकांना...
जुलै 17, 2019
फोन खणखणला आणि पलीकडून आवाज आला, राजाभाऊ गेले. हा एक जबरदस्त धक्का होता. 15 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी गेलो होतो. कारण होतं, त्यांनी अलीकडेच लिहिलेला मराठी भोषेसंदर्भातील लेख. शीर्षक होतं "बहता नीर.' हा लेख मागच्या वर्षी एका दिवाळी अंकासाठी द्यायचा होता; पण तेव्हा तो पूर्ण झाला नव्हता. अर्धाच...
जुलै 16, 2019
नंदुरबार : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांची नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. धुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल तालुक्यातील सामोडे गावात जन्मलेल्या राजेंद्र भारूड यांची आदिवासबहुल नंदरूबार जिल्ह्यात पदोन्नतीपर बदली झाली आहे....
जुलै 15, 2019
कोल्हापूर - सर्पदंश झालेल्या प्रताप पुणेकर यांच्यावर वेळेत उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. असा आरोप करत आज गिरगाव ग्रामस्थ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने सीपीआर रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला.  मोर्चाची सुरुवात दसरा चौक येथून झाली. आंदोलकांनी सीपीआरच्या मुख्य इमारतीसमोर घोषणाबाजी करत प्रशासनाचा...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 13, 2019
सोनई : सोनईसह अठरा गावातील पिण्याच्या पाण्याची योजना सुरु होण्याकरीता राहुरी-शनिशिंगणापुर मार्गावर आज दोन तास रास्तारोको  आंदोलन झाले. या आंदोलनासाठी हजारो महिला हंडा घेवून उपस्थित होत्या. सोनईसह खेडले, करजगाव, खरवंडी, शिरेगाव,तामसवाडी सहवाड्यावस्त्यांचा यात समावेश आहे. ८५ कोटी रुपये खर्चाची ही...
जुलै 12, 2019
आटपाडी - पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांची जयंती व स्वातंत्र्यसेनानी इंदुताई पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथे सोमवारी (ता. 15) समान पाणीवाटप पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. भारत पाटणकर आणी आनंदराव पाटील...
जुलै 11, 2019
नागपूर  : बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यासाठी विद्यार्थी संघटना आंदोलन करीत आहेत. दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांकडून विद्यापीठाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असताना, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांनी प्रकरण काढणार...
जुलै 10, 2019
नगर- मुख्यमंत्री व खासदार सुजय विखे आता साकळाई बाबत काही बोलत नाहीत. पण योजना होईपर्यंत मी शांत बसणार नाही. त्यासाठीच येत्या क्रांती दिनापासुन मी उपोषणास बसणार आहे अशी माहिती अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिली आहे. 2014 मध्ये आम आदमी पक्षाकडून लोकसभेची नगर मतदारसंघाची निवडणूक लढवून चर्चेत आलेल्या...
जुलै 09, 2019
सांगली -  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच...
जुलै 09, 2019
पारोळा ः पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासुन बसस्थानक परिसरात खड्डे व चिखल झाला आहे. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले असून. स्वत: आमदार डॉ. सतीष पाटील यांनी पदरमोड करित आज (ता.9) सकाळी बसस्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम केले. जेसीबी व डंपरच्या...
जुलै 08, 2019
मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा… या मालिकेत बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरीत झाल्याचा प्रवास सुरू आहे. दापोली, साताऱ्यात मिळालेल्या जातीयवादी आणि अपमानास्पद वागणूकीनंतर आता सुभेदारांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालंय. बाबासाहेबांचं मुंबई...
जुलै 08, 2019
कोल्हापूर - मराठा समाज आर्थिकदृष्ट्या ज्यावेळी सक्षम होईल त्याच वेळी मराठा क्रांती मोर्चे खऱ्या अर्थाने सार्थकी लागतील, अशी भावना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. आरक्षणाचा नुसता आनंद नको, तर मराठा समाजाला सर्वच क्षेत्रांत प्रगतीही महत्त्वाची असून त्याची नैतिक जबाबदारी सर्वांची...