एकूण 49 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : वर्धा, आर्वीत गतवेळच्याच स्पर्धकांमध्ये थेट लढत आहे, तर युतीला बंडखोरीने ग्रासले आहे. भाजप-शिवसेना युतीतील बंडखोरीमुळे देवळी आणि हिंगणघाट मतदारसंघात लढत तिरंगी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लढती बहुरंगी आणि लक्षवेधी ठरल्या आहेत. जिल्ह्यातील चारही मतदारसंघांतील लढतींचे...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : २००४ आणि २००९ या दोन वर्षी येथून काँग्रेस विजयी झाली होती. गतवेळी २०१४ मध्ये भाजपने विजय मिळविला. संघटनात्मकदृष्ट्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे २०१४ मध्ये भाजपकडून लोकसभेवर निवडून गेले होते. मात्र, तीन वर्षातच त्यांनी पंतप्रधान आणि...
ऑक्टोबर 14, 2019
वाशीम जिल्ह्यामध्ये तीन विधानसभा मतदारसंघांतील निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. या रणधुमाळीत युती आणि आघाडीतील बंडखोरांनी निवडणुकीची दिशाच बदलली असून, निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या आधी एकांगी वाटणारी निवडणूक काट्याच्या लढतीकडे झुकत असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यामध्ये वाशीम, कारंजा आणि...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांत दुरंगी व बहुरंगी लढती होत आहेत. सर्वच ठिकाणी काँटे का मुकाबला आहे. ताकदवान उमेदवार ‘अभी नहीं तो कभी नही’ अशा तयारीने रिंगणात उतरले आहेत. आपली बाजू भक्‍कम करण्यासाठी ते पैशाचा पाऊस पाडू लागले आहेत, तर पैशाने विकत न येणाऱ्यांना पदाचे स्वप्न दाखवले जात आहे....
ऑक्टोबर 10, 2019
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांत काट्याच्या लढतीचे चित्र आहे. लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलाय, दुसरीकडे पराभवाचे उट्टे काढण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सध्यातरी युती आणि आघाडी दोन्हीही तुल्यबळ आहेत.  राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...
ऑक्टोबर 08, 2019
काँग्रेसचे दिग्गज नेते आमदार चंद्रकांत रघुवंशींनी शिवबंधन बांधल्याने शिवसेनेची ताकद वाढणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावितांनी उमेदवारी नाकारल्याने पक्षाचाच राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेताहीन झाली.  आदिवासीबहुल नंदुरबारची ओळख काँग्रेसचा बालेकिल्ला अशीच...
ऑक्टोबर 08, 2019
आंबेगावात तिघांची माघार घोडेगाव - आंबेगाव विधानसभेसाठी ‘मनसे’चे वैभव दत्तात्रय बाणखेले, अपक्ष अशोक दत्तात्रय काळे पाटील, जनता दल सेक्‍युलर पक्षाचे नाथा हरिभाऊ शेवाळे यांनी माघार घेतली. त्यामुळे रिंगणात ६ उमेदवार आहेत. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील व शिवसेनेचे राजाराम...
ऑक्टोबर 08, 2019
विधानसभा 2019 : पुणे - भाजप- शिवसेना युतीच्या नेत्यांना शर्थीचे प्रयत्न करूनदेखील शिवसेनेतील बंडखोर वाघांना शांत करण्यात अखेर अपयश आले. याउलट काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवत पक्षातील बंडखोरांची मनधरणी करण्यात यश मिळविले, त्यामुळे शहरातील कोथरूड आणि कसबा वगळता अन्य मतदारसंघांत दुरंगी, तर...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री, ता.7 (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांची चौथ्यांदा परंपरागत लढत होणार आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 2004 पासून काळे - बागडे यांची सतत सरळ लढत झालेली आहे. 2014 च्या विधानसभेत डॉ.काळे यांचा केवळ...
ऑक्टोबर 03, 2019
परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातून अखेर काँग्रेसने रविराज देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुरेश नागरे यांनी उमेदवारी साठी फार जोर लाववला होता पण शेवटी त्यांना अपयश आले आहे. परभणी विधानसभा मतदार संघातून काँग्रेस तर्फे सुरेश नागरे यांना उमेदवारी मिळणार असे सांगितले जात होते. परंतु बुधवारी...
सप्टेंबर 05, 2019
२००९ च्या पुनर्रचित मतदारसंघातील निवडणुकीनंतर चंदगड मतदारसंघाचे राजकीय संदर्भ बदलले. गडहिंग्लज तालुक्‍याचा मोठा भाग या मतदारसंघाला जोडला. दहा वर्ष मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. भाजपमध्ये एका म्यानात अनेक तलवारी, शिवसेनेच्या भात्यात बाणच बाण तर राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार...
ऑगस्ट 24, 2019
विधानसभा 2019 : लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजप-शिवसेना युतीपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर विधानसभा निवणुकीत आव्हानांचा डोंगर असणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीतील सहा जागा राखण्याची तयारी युतीने सुरू केली आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत एकही जागा...
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी आणि आर्वी हे तीन मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे, तर हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. युतीत वर्धा आणि हिंगणघाट शिवसेनेकडे, तर आर्वी आणि देवळी भाजपकडे होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीने या समीकरणाची घडी पूर्णतः विस्कटली. वर्धा आणि हिंगणघाट या...
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीला मतांची मोठी आघाडी मिळाली. मात्र, ही आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत टिकविण्याचे आव्हानदेखील युतीसमोर राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांवरच प्रमुख पक्षांच्या...
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप...
ऑगस्ट 20, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळत असले, तरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी उमरगा वगळता उर्वरित तीन मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप मिळते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला...
ऑगस्ट 19, 2019
विधानसभा 2019 : भंडारा जिल्ह्यातील तिन्हीही विधानसभा मतदारसंघांवर भाजपचे वर्चस्व आहे. राज्यात शिवसेनेसोबत युती झाल्यास भंडारा मतदारसंघ मित्रपक्षासाठी सोडण्याची वेळ येऊ शकते. यावरून युतीचा धर्म की जागेचे गणित असा प्रश्‍न भाजपसमोर येऊ शकतो. दुसरीकडे विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जिल्ह्यात प्रभाव...
ऑगस्ट 19, 2019
विधानसभा 2019 : बालेकिल्ल्यातच काँग्रेसला संपवण्याचा भाजपचा निर्धार आहे. दिग्गजांचे त्यासाठी पक्षांतर होतंय. त्यामुळे येथील लढती लक्षणीय ठरतील. नंदुरबार जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा असून, दोन भाजप आणि दोन काँग्रेसकडे आहेत. चारही मतदारसंघ राखीव असल्याने सर्वसाधारण गटातील नेते पालिका आणि जिल्हा...
जुलै 23, 2019
कुरुंदवाड - शिरोळ येथील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ श्री दत्त विकास पॅनेल व संस्थापक परिवर्तन पॅनेल यांच्यात दुरंगी लढत होत आहे. दत्तच्या १२३ गावांच्या कार्यक्षेत्रातील २५ हजार सभासद २७ जुलैला नवे कारभारी निवडणार असून, निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पॅनेलच्या...
जून 19, 2019
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्वच मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस आघाडीकडून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील मैदानात आहेत. भाजपकडून युवा नेते मनोज घोरपडे यांची तयारी सुरू असून, शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी...