एकूण 1356 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
चाळीसगाव ः ‘भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या काही वर्षांतच केंद्रात विविध योजना राबवत भारतातील महिलांचे हात बळकट झाले आहेत. ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका विश्वास’ हा मूलमंत्र जोपासत सर्व समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणले. केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामांच्या बळावर राज्यात पुन्हा...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास...
ऑक्टोबर 20, 2019
दिवाळी म्हणजे चैतन्याचा, प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. एकीकडं प्रतीकांच्या रूपांतून उजळवणारी दिवाळी ही खरीच; पण मनं उजळवणारी, सकारात्मकतेचं बीज रुजवणारी हीदेखील तितकीच खरी. सर्व स्तरांतल्या नागरिकांना प्रकाशाच्या धाग्यानं एकत्र आणणारी ही दिवाळी. या आठवड्यात दिवाळी सुरू होते आहे. त्या निमित्तानं...
ऑक्टोबर 20, 2019
काऊंटरवरच्या धनलक्ष्मीनं विचारलं : ‘‘आज काय कामाला सुट्टी नव्हती का?’’ ती करारी बाई म्हणाली : ‘‘ताई, सुट्टी कशाची वं?’’ दुकानाच्या मालकीणबाई म्हणाल्या : ‘‘अगं, आज लक्ष्मीपूजा नव्हं का?’’ ती करारी बाई उत्तरली : ‘‘ताई, घरी खायाला चार तोंडं हायती. सुट्टी घेतली तर लक्षुमी कुठून ईल वं? आन् तुमी तरी कुटं...
ऑक्टोबर 20, 2019
मी सतत तीन ते चार महिने व्यायाम किंवा डाएट करतो, तेव्हा त्यानंतर एक महिना आराम करतो. सामान्यतः एकाच प्रकारचा आहार मी दीर्घकाळ घेत नाही. दर महिन्याला मी आहारात बदल करतो; कारण एकच आहार तुम्ही दीर्घकाळ घेत राहिलात, तर तुम्हाला त्याचा कंटाळा येतो. भारतीय लोक लहानपणापासून डाएटिंग कधीच करत नाहीत....
ऑक्टोबर 19, 2019
गडचिरोली : मागील तब्बल 26 महिन्यांपासून सायकलने भारतभ्रमण करणाऱ्या राजस्थान राज्यातील अजमेर (जयपूर) येथील अंकित अरोरा (वय 19) या युवकाचे गडचिरोलीत आगमन झाले. त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शनिवारी (ता. 19) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या...
ऑक्टोबर 19, 2019
गुरुकुंज मोझरी (जि. अमरावती) : खंजिरी भजनांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे, विश्‍वबंधुत्वाचा संदेश देणारे युगपुरुष वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आपल्या गुरुमाउलीला "मौन श्रद्धांजली' अर्पण करण्यासाठी देशाच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने...
ऑक्टोबर 19, 2019
गोंदिया : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत मतदान होणार आहे. आज, शनिवारी अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभेतील प्रचारतोफा दुपारी 3 वाजता, तर गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघातील प्रचारतोफा सायंकाळी 6 वाजता थंडावल्या. दरम्यान, मतदान प्रक्रिया सुरळीत...
ऑक्टोबर 19, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर कौन्सिलर चित्रकला छान आहे. आवडते आहे. चित्रकलेच्या शालेय जीवनात देण्याच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षाही दिल्या आहेत. अभ्यास आवडतो, पण मार्क फार छान नसतात. अशा सर्वांसाठी पूर्वीची मळलेली वाट होती ती कमर्शियल आर्टिस्टच्या डिप्लोमा किंवा पदवीची. मात्र त्यात...
ऑक्टोबर 19, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रातल्या जनतेच्या मूळ प्रश्‍नावरच लढली जात आहे. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवाद आणि काश्‍मीरचे राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याचा मुद्दा प्रमुख केलेला असला, तरी महाराष्ट्रातली जनता हुशार आहे. भाजपच्या भपकेबाज प्रचाराला ती बळी पडणार नाही. सरकारच्या चुकीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
सातारा ः लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर प्रचाराच्या निमित्ताने धडधडणाऱ्या आरोप- प्रत्यारोपांच्या तोफा उद्या (ता. 19) सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहेत. यानिमित्ताने गेले महिनाभर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात उडालेला राजकीय धुरळाही खाली बसणार आहे. जाहीर प्रचाराची सांगता...
ऑक्टोबर 19, 2019
दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केलेली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या तंबूतील...
ऑक्टोबर 19, 2019
राजकारणाशी आपला काही संबंध नाही, असा सूर समाजात नेहमीच ऐकायला मिळतो. पण, लोकशाही बळकट होण्यासाठी प्रत्येकाने राजकारण समजून घेण्याची गरज आहे. लोकशाही व्यवस्था असणाऱ्या भारतासारख्या देशात तर मतदार म्हणून नागरिकांना राजकारणापासून अलिप्त राहून चालणार नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात...
ऑक्टोबर 19, 2019
पुणे - कोणत्याही विद्यापीठाशी संलग्न नसणाऱ्या; परंतु व्यवस्थापनशास्त्रातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम (पीजीडीएम) चालविणाऱ्या उत्कृष्ट संस्थांना श्रेणी स्वायत्तता (ग्रेडेड ऑटोनॉमी) दिली जाणार आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे महत्त्वाचे पाऊल उचलत यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे...
ऑक्टोबर 18, 2019
महाड : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सरकारकडून विविध उपक्रमांतून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. महाडमध्येही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये एक हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.  भारतीय राज्यघटनेनुसार सर्व नागरिकांना देण्यात...
ऑक्टोबर 18, 2019
पलूस - भाजप सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर गेला आहे हे भाजप सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात राज्याचे नेतृत्व...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
इस्लामाबाद : कर्तारपूर कॉरिडॉरच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या उद्‌घाटन सोहळ्याचे निमंत्रण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज दिली. भारतातील शीख भाविकांसाठी 9 नोव्हेंबर रोजी...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : कस्तुरचंद पार्कवर सध्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक चबुतऱ्याच्या भोवती रस्ता बांधण्यात येत आहे. त्यासाठी चार फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तेथे या तोफा आढळून आल्या. यासोबत दोन उखळी तोफा (मॉर्टर) व त्याचे स्टॅण्डदेखील सापडले आहेत. तोफा लांबच्या...