एकूण 408 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नवी मुंबई : अधिकारी असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवत, मिठाईच्या दुकानातील सुका मेवा घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना कामोठे पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्यांमध्ये अलिबाग तालुक्‍यातील दोन आरोग्य अधिकारी व एका सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षकाचा समावेश असल्याचे आढळून आले. पोलिसांनी फसवणुकीसह...
ऑक्टोबर 23, 2019
हातकणंगले - माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ६९ गावठी बाँब जप्त केले आहेत. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून बाँब निर्मितीचे साहित्य जप्त केले. परिसरात खळबळ उडाली आहे. दोघे घरातच बाँब तयार करीत असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली. या प्रकरणाचे येथील...
ऑक्टोबर 23, 2019
पुणे - जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने पहिले आंबेडकरवादी विश्‍व साहित्य संमेलन आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी बॅंकॉक (थायलंड) येथे आयोजित केले आहे.  या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद खासदार अमर साबळे भूषविणार आहेत. या संमेलनात विविध परिसंवाद, कवी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. देश-विदेशातील...
ऑक्टोबर 22, 2019
नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्यावर छापा मारून कपाटात ठेवलेले एमडी ड्रग्स पोलिस उपायुक्‍त आणि सहायक आयुक्‍तांनी जप्त केले. तसेच पाच पोलिसांना निलंबित केल्याने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. येथून 34 ग्रॅम ड्रग्स आणि 2 लाख 45 हजार रुपये जप्त करण्यात आले.  नंदनवन पोलिसांनी ड्रग्स तस्करांकडून उपरोक्त...
ऑक्टोबर 21, 2019
अलिबाग, ता. २० ः सरत्या पावसाचा  आज ‘स्ट्राँग रूम’ला तडाखा बसला. त्यामुळे मतदान साहित्य पोहचविण्याची प्रक्रिया दोन तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मतदान केंद्राचा ताबा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि अन्य साहित्य घेऊन...
ऑक्टोबर 20, 2019
सिंधुदुर्गनगरी - विधानसभा निवडणूकीसाठी उद्या (ता.21) मतदान तर 24 ला मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून ही निवडणूक प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्‍यक असल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी 144 कलम...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी विविध कक्षांची स्थापना केली असून, निवडणुकीचे कामकाज आता अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणूक कामकाजासाठी १४ हजार ३९६ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ...
ऑक्टोबर 19, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘लर्निंग होम’ ही शिक्षणाची प्रयोगशाळा असेल. ‘घरानंही शिकवावं, शाळेनं घर व्हावं’ या तत्त्वावर चालणाऱ्या या ‘आनंदघरा’त शिक्षक व पालक दोघांचाही स्वयंस्फूर्त सहभाग असेल.  ‘लर्निंग होम’ची संपूर्ण रचना बालकेंद्री असेल. मुलांना आनंद वाटेल, येथे यावेसे वाटेल...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे - पुणेकरांनो, डेंगीचे डास आता तुमच्या घरातच आहेत. घरातील फ्रिज, फुलदाणी, वातानुकूलित यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी अशा ठिकाणी या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने टिपले आहे. त्यामुळे घरातील डासोत्पत्तीच्या ठिकाणांची स्वच्छता करा, असा सल्लाही दिला जात आहे....
ऑक्टोबर 18, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक शिक्षणातील नवविचारांवर आधारित अशा अनेक प्रयोगशील शाळा खुद्द शास्त्रज्ञांनीच जगभरात उभ्या केल्या आहेत. आपल्याकडची अशीच एक शिक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे ग्राममंगलचं ‘लर्निंग होम.’ या ‘आनंदघर’नुसार आता शिक्षणात घर व पालकांची भूमिका अशी आहे -  घर-कुटुंब-...
ऑक्टोबर 17, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक महाराष्ट्र सरकारनं ‘ओपन एसएससी’ बोर्ड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिक्षण प्रवाहातून दूर, शारीरिक अक्षम, विविध कौशल्यात करिअर करणारे विद्यार्थी थेट दहावीची परीक्षा देऊ शकतील. शाळेत दाखल झालंच पाहिजे अशी आता सक्ती नसेल.  जे पालक आपल्या...
ऑक्टोबर 16, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘ओझ्याविना शिक्षण’ या गाजलेल्या अहवालात प्रा. यशपाल म्हणतात, ‘शाळेतून मुलांच्या गळतीचं मुख्य कारण म्हणजे शालेय अभ्यासाचा निरर्थकपणा. कुतूहल, चौकस वृत्ती हा जसा जगातल्या सगळ्या मुलांचा नैसर्गिक गुण असतो, तसा शाळेत जाणं हा नसतो! किंबहुना शाळांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद : उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जाहीर सत्कार मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बुधवारी (ता. 16) केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ते औरंगाबादेत काय बोलणार, याची...
ऑक्टोबर 15, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक विज्ञान विषयाचा कवितेशी तसा सहसा संबंध नसतो. तरीही विज्ञान मुलांना शिकवताना विज्ञानाचे छोटे खेळ, प्रयोग, गाणी यांचा उपयोग होतो. आपल्याकडे अजूनही खूप अंधश्रद्धा आहेत. त्या दूर करून बालवयापासूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजायला हवा! सृजन आनंद विद्यालयात...
ऑक्टोबर 14, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक गाणी तर मुलांना आवडतातच. मुलं सूर, तालाचा मनसोक्त आनंद घेतात. बालवाडीत तर गाण्याची रेलचेल असते.  त्यामुळेच गाणे हे मुलांना ‘आनंदाने शिकते’ करण्याचं एक उत्तम साधन आहे. कोल्हापूरच्या सृजन आनंद विद्यालयात गाणे हे शिकण्याचं एक सुरेल साधन म्हणून वापरलं जातं...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : गेल्या काही वर्षात चिमुकल्यांसाठी सुरू केलेल्या चॅनलवरील मालिकांमधून दाखविण्यात येणारी हिंसा, मोबाईलमधील वेगवेगळे गेम्स यामुळे घरातील चिमुकल्यांच्या आक्रमकतेत वाढ झाल्याचे दिसून येते. दिवाणखान्यात पडून एका हाती टीव्हीचे रिमोट तर कधी पालकांचा मोबाईल, असे चित्र प्रत्येक घरात दिसते. मोबाईल,...
ऑक्टोबर 14, 2019
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा नुकताच ९० वा वाढदिवस साजरा झाला. लताबाईंचं गाणं आणि माझा परिचय होऊन सत्तर वर्षे लोटली आहेत. माझं वय दहा वर्ष असेल, तेव्हा ‘महल’ चित्रपट पाहायला आमचं कुटुंब गेलं होतं. चित्रपट लक्षात राहिला नाही; पण गाणं आवडलं. ‘ये जिंदगी उसीकी है, जो किसीका हो गया’ या गाण्यानं...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...