एकूण 72 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या काळात...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
विधानसभा 2019 : हिंगणघाट (जि. वर्धा) - विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून, उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र देशोधडीला लावीत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज येथे केला. हिंगणघाट येथील गोकुलधाम मैदानावर...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  मुंबई -  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्‍तरीत्या शब्द टाकूनही त्यांना उमेदवारी न मिळण्यामागे दिल्ली हे कारण मानले जाते आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही श्रेष्ठींच्या नाराजीचा...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व दक्षिणेतील भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले असून बुधवारी उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे फलक झळकावून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर : पाच वर्षात माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे? मित्रप्रेमामुळे तिकीट कापल्या जात असेल तर हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरचा अन्याय आहे, अशा शब्दात दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त केली. उद्या बुधवारी दक्षिण नागपुरातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून...
सप्टेंबर 25, 2019
विधानसभा 2019 : नागपूर शहरातील सर्व सहा मतदारसंघांमध्ये सत्ताधाऱ्यांतर्फे विकासकामे आणि भूमिपूजनाचा धडाका सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र राज्याचे नेतृत्व बदलल्याने प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक इच्छुकांना आणि कार्यकर्त्यांना कुठल्या गटासोबत राहावे, असा प्रश्‍न पडला आहे. काँग्रेसमधील...
सप्टेंबर 16, 2019
कोल्हापूर - शहर आणि उपनगरातील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्‍नच निकालात काढला आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून आपले सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ९० हजार लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याची ग्वाही  कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या अंमलबजावणीस महाराष्ट्रात "ब्रेक' लागला असून, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या कायद्यानुसार कारवाईला स्थगिती दिली आहे. गुजरातनेही नव्या कायद्याला विरोध दर्शविला आहे. तसेच, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याला...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने...
सप्टेंबर 09, 2019
स्वतंत्र विदर्भाची मागणी वरचेवर केली गेली आणि त्याचे राजकारण होऊनही नेतृत्व उदयाला आले, निवडूनही आले. ही मागणी पूर्व विदर्भातूनच यायची, पश्‍चिमेतून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जाते. तथापि, त्यात तथ्य नाही. सध्या राज्याच्या सत्तेच्या चाव्या विदर्भाकडे आहेत. महाराष्ट्र विधानसभेची...
सप्टेंबर 09, 2019
नागपूर ः शाश्‍वत विकासाच्या दृष्टीने नागपूर महापालिकेने विविध उपक्रम राबविले. या उपक्रमातून शहराचा कायापालट झाला. या बदलाची दखल घेत अटल शस्त्र मार्केनॉमीतर्फे महापालिकेला "बेस्ट सस्टेनेबल, लिव्हेबल, ग्रीन, क्‍लिन ऍण्ड एक्‍सक्‍लूझिव्ह इन्फ्रा सिटी' हा पुरस्कार देण्यात आला. आयुक्त अभिजित बांगर...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : शहरात भाजपचे शेकडो उमेदवार लढण्यास इच्छुक असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या पूर्व नागपूरमधून एकाही इच्छुकाने लढण्याचा दावा केला नाही. भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शनिवारी रविभवन येथे घेण्यात आल्या. विधानसभाध्यक्ष...
सप्टेंबर 01, 2019
नागपूर : हिंगणा मार्गावर मेट्रोच्या प्रवासी सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे. 7 सप्टेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून पोलिस, महामेट्रो प्रशासनाची धावाधाव सुरू झाली आहे. या दौऱ्याबाबत उद्या,...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहराचे स्थान राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर अग्रस्थानी असते. गेल्या काही वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर म्हणूनही नागपूरला ओळखल्या जाऊ लागले. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या मागे उभे...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज चार हजार 345 लोकांना घरे मिळणार आहेत. मात्र, उर्वरित नागरिकांना चिंता करण्याचे कारण नाही. दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचे काम सुरू करण्यात येईल. नागपुरात कुणीही बेघर राहणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. नागपूर...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर ः आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी एचसीएल टेक्‍नॉलॉजीने मिहानमधील प्रकल्पाचा विस्तार करणार असून 90 एकर जमीन घेणार आहे. 18 ऑगस्टला एमएडीसी आणि एचसीएल यांच्यात सामंजस्य करार हॉटेल लि मेरिडियन येथे दुपारी साडे तीन वाजता होणार आहे. कंपनीचे संचालक संजय गुप्ता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय...