एकूण 48 परिणाम
जुलै 20, 2019
आपलं ओटीभरण झालं नाही तरीही प्रत्येकीसाठी आशीर्वादासह फुलांची वाडी बनवतेय ती. केवढं मनाचं मोठेपण! मैत्रिणीला तिच्या मुलीची फुलांची वाडी भरायची होती. अगदी मोजके, नाजूक फुलांचे दागिने हवे होते. आम्ही ताराबाईंच्या दुकानात गेलो. पूर्वीच्या दुकानाच्या जागी नवीन इमारत झाली होती. त्यांना मोठा गाळा मिळाला...
जुलै 12, 2019
डॉक्‍टरांचे आणि विठ्ठलवाडी परिसरातील साऱ्या वस्तीचे कौटुंबिक नाते तयार झाले आहे. कित्येकदा त्यांना फी मिळाली नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू कधीही मावळले नाही. सिंहगड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होते. विठ्ठलवाडीत पदपथावरच मजुरांच्या झोपड्या होत्या. पहाटेच्या वेळी कोणीतरी डॉक्‍टरांना हाका...
जुलै 03, 2019
अतिदक्षता विभागातील एका रुग्ण आजीबाईनी नाश्‍त्याबद्दल तक्रार केली आणि काही निवडक रुग्णांना वेगळा आहार देण्याची कल्पना सुचली. नेहमीप्रमाणे अतिदक्षता विभागात सकाळचा राउंड घेत होतो. एका आजींची कुरबूर सुरू होती. आज त्या एकदम ताज्यातवान्या, उत्साही दिसत होत्या. मी विचारले, ""काय आजी, काय झाले?''...
जून 21, 2019
"घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे,' असे विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे. देण्यातच खरा आनंद असतो. माझी नात नूपुर सध्या अटलांटाला असते. ती शाळेत शिकत असताना काही दिवस आमच्याकडे येत असे. ती पाचवी-सहावीत असेल, त्या वेळचा एक प्रसंग माझ्या नेहमीच लक्षात राहिला. माझा मित्र शेख दुबईत असतो. त्याचे...
जून 19, 2019
अगदी तरुण वयात आजाराने गाठले. कायमची औषधे घ्यावी लागणार होती. पण मनाचा निश्‍चय आणि व्यायाम यामुळे त्रासमुक्ती झाली. मी एका ख्यातनाम कॉर्पोरेट कंपनीत मनुष्यबळ विभागात काम करत होतो. दुपारी जेवणाच्या सुटीची वेळ होती. सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत जेवण घेत असताना अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधेरी आली. काही...
जून 17, 2019
चार भावंडांतील वर्षा अतिशय भिडस्त! कोणीही उठावे आणि तिला कोणतेही काम सांगावे. बिचारी निमूटपणे ते करून टाकी. हळूहळू सगळीच कामे तिच्या अंगावर पडू लागली. त्यापायी तिचा स्वतःचा अभ्यास मागे पडे, क्‍लासही बुडे. हे लक्षात येऊनसुद्धा भिडस्तपणामुळे ती हे गृहीत धरणे टाळू शकत नाही. पूजाला स्वयंपाकाची मनापासून...
जून 04, 2019
नसबंदीच्या शस्त्रक्रियेनंतरही ती महिला गर्भवती राहिली; पण या सर्व प्रकारामध्ये मी योग्य केले की अयोग्य केले? एक कुटुंब, निष्पाप मुलाकरिता खोटे बोलावे लागले. एमबीबीएस झाल्यानंतर १९७१ मध्ये माझी नेमणूक एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबनियोजन अधिकारी म्हणून झाली. त्या काळी आम्ही पुरुष नसबंदीच्या...
एप्रिल 29, 2019
गेले वर्षभर दातांच्या दुखण्याने हैराण झाले होते. अशा स्थितीत आम्ही कर्वे रस्त्यावरील ध्यान मंदिर मार्गावरच्या दंतवैद्यांच्या दवाखान्यात पोचलो. आम्हा दोघांच्या हातात काठी. येताना रिक्षा मिळाली, जातानाचे काय? पण काही चौकशी करण्याआधीच सांगण्यात आले, की आमचा माणूस रिक्षा आणून देईल. तोंडाचा एक्‍स रे...
एप्रिल 26, 2019
माझे वडील वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाले होते. त्या काळी मला टॉन्सिलचा त्रास व्हायचा. कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यातील घसातज्ज्ञांशी प्राथमिक चर्चा करून टॉन्सिल काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. ही शस्त्रक्रिया विनागुंतागुंतीची नियमितपणे होणारी साधी सोपी आहे. डॉ. एस. व्ही. गोगटे...
एप्रिल 20, 2019
वाचनाला कोणताही अडसर नसावा. माध्यमाचा तर अजिबात अडसर नसावा. वाचणे महत्त्वाचे. एका चर्चासत्रामध्ये साठीच्या आसपासचे एक प्राध्यापक हातात पुस्तक घेऊन वाचणे हे कसे विशेष आहे याबद्दल बोलत होते. त्यांना किंडल, अँड्रॉईड, स्मार्ट फोन या माध्यमांपेक्षा पुस्तक हे अर्थातच जवळचे वाटत होते. काचेखालची अक्षरे...
एप्रिल 09, 2019
गॅसचा वास आला म्हणून तो बंद केला होता; पण तेवढे पुरेसे नव्हते. कापूर पेटवताच अंगावर जाळ आला. समर्थ रामदासांनी म्हटले आहे, की "जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे.' समर्थांचा अनुभव आपणही रोजच घेत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दुःखाचे प्रसंग येतात. त्याला धीराने तोंड द्यायचे असते...
मार्च 22, 2019
संवेदनशीलता हरवते आहे, अशी चर्चा सुरू असते आपल्या आसपास. तसे काही अनुभव आपणही घेतो. त्याचवेळी सुखद अनुभवही. आपल्यापैकी बरेच जण नोकरीनिमित्त उबर, ओला टॅक्‍सीने प्रवास करीत असतील. मलाही कामानिमित्त असा प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी मी हडपसरहून काम संपवून माझ्या घरी संध्याकाळी परतत...
मार्च 18, 2019
प्रत्येक रुग्णागणिक वेगळा अनुभव डॉक्‍टर घेत असतो. पण एखाद्याचे प्राण वाचवता आले की त्याला लाखमोलाचा आनंद होतो. मांडवगणसारख्या ग्रामीण भागात काम करीत होतो. मांडवगणमधील प्रतिष्ठित असे एक काका कधीमधी गावात भेटायचे. बोलणे चालणे व्हायचे. काका पान खाऊ घालायचे अन्‌ मार्गस्थ व्हायचे. एके दिवशी सकाळपासून...
मार्च 02, 2019
पीएमपीएमएलच्या गाड्यांना अपघात होणे हे नित्यनेमाचे झाले आहे. किमान अपघातग्रस्तांना लगेच वैद्यकीय मदत देण्याइतकी संवेदनशीलता ड्रायव्हर-कंडक्‍टरना शिकवली पाहिजे. रविवार असल्याने सगळीकडे निवांतपणा होता. मी भाभीजींसोबत सकाळी साडेआठच्या सुमारास नियमित तपासणीसाठी औंधमधील रुग्णालयाकडे निघाले होते....
फेब्रुवारी 15, 2019
योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला अन्‌ हृदयावर शस्त्रक्रिया न करता गेली वीस वर्षे उभा आहे. चौतिसाव्या वर्षी मला हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्यामुळे मी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये तपासण्या करून घेतल्या. "हृदयाचे दोन व्हॉल्व्ह लवकरात लवकर बदला,' असे सांगण्यात आले. आर्थिक अडचणीमुळे मी त्या...
फेब्रुवारी 08, 2019
      फास्टफुडचा आहारात अतिवापर,व्यायामाचा अभाव आणि बैठे काम यासारख्या बाबींमुळे सर्वांचीच जीवनशैली बदलली आहे. तात्काळ मिळणाऱ्या अत्याधुनिक उपचार पध्दतीमुळे जीव वाचवणे हे शक्‍य असलेतरी डॉक्‍टरांसाठी ते एक आव्हानच बनले आहे. प्राप्त परिस्थितीत हे आव्हान स्विकारून रूग्णांला ठणठणीत बरे,तंदूरूस्त...
फेब्रुवारी 05, 2019
जीवनातील साथीदार जातो, तेव्हा इतरांनी सांत्वन करूनही मनाची समजूत घातली जात नाही. अहो, ऐकलंत का? तुम्ही अंतराळात गेल्यावर डॉ. शेखर, वंदना, सुलभाबेन, शीलूताई आल्या होत्या. डॉ. शेखर काय म्हणाले, माहीत आहे? "भाभी, मी डॉक्‍टर आहे. मी असंख्य रुग्ण पाहिले आहेत. कित्येक मृत्यू...
जानेवारी 26, 2019
वंदे मातरम्‌ ... रोमांच उभे राहतात. मग आपण वेगळ्या चालीत गायलेले हे गीत इतरांबरोबर गाताना किती आनंद होत असेल! एक शास्त्रीय गायिका म्हणून गेली अनेक वर्षे संगीताची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्याचबरोबरच अर्थशास्त्रात पीएच.डी. असल्यामुळे गेली काही वर्षे मी एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना...
जानेवारी 24, 2019
खरा दागिना कोणता? सोन्याचा की, लखलखीत विचारांचा? सोन्यापेक्षा विचारांने सजणे महत्त्वाचे असते. नखशिखांत दागिने घालून स्त्री-पुरुष जेव्हा सजतात, तेव्हा बघणाऱ्या इतरांना नेमके काय वाटते या प्रश्नाला काही उत्तरे मिळाली. "मला दागिने पाहिजेत. कारण त्यातून आपली प्रतिष्ठा कळते. जेवढे दागिने तेवढी श्रीमंती...
जानेवारी 14, 2019
आजोबा शिक्षक, आई अन्‌ मोठी बहीण शिक्षिका. त्यामुळे शिक्षिकच होण्याची लहानपणापासूनची इच्छा. मी माझे शिकवणे आनंदाने अनुभवले. शिकवण्याबरोबरच खूप शिकत गेले. माझ्यासमोर बसलेले शिष्यगणच माझे गुरू होते. ""बाई, चिल, सगळे छान होणार आहे. नका काळजी करू. आपला नंबर नक्की येणार,'' असा धीर देऊन "चिल' राहण्याचा...