एकूण 73 परिणाम
जुलै 18, 2019
औंध - सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील सारथी सामाजिक विकास संस्थेमार्फत ‘सारथी हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत यावर्षी गगनबावडा, महाबळेश्वर, माण, खटाव, पाटण या सर्व तालुक्‍यांत असणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १५ शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.  गेली तीन...
जुलै 16, 2019
नागठाणे - शाळेसाठी दररोज आठ किलोमीटरची पायपीट करणारा, शिक्षणासाठी पाच ओढे ओलांडणारा दुर्गम भागातील युवक भारतीय नौदलात भरती झाला आहे. आकाशाला गवसणी घालाणारे त्याचे हे यश सर्वांसाठी कौतुकाचा विषय बनले आहे. नितीन बाबूराव ढवळे हे आहे या युवकाचे नाव. नितीन म्हाते मुरा (ता....
जुलै 16, 2019
नानीबाई चिखली - मराठी शाळेत शिकून ‘त्या’ बंधूंनी आज उंच भरारी घेतली आहे; मात्र, ही भरारी मातीतील शाळेत शिकून घेतली, याची जाणीव त्यांनी नेहमीच ठेवली. म्हणूनच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी सुमारे दीड लाख रुपये खर्चून संपूर्ण शाळाच रंगवून दिली. यामुळे सुवर्णमहोत्सवी वर्षात वाटचाल...
जुलै 12, 2019
नागपूर - जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव गुरुवारी झालेल्या अवयवदानातून आला. ६३ वर्षीय निवृत्त कर्मचारी सुधीर डांगे यांच्या यकृत दानातून ४३ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले. न्यू इरा हॉस्पिटलमध्ये यकृत...
जुलै 10, 2019
कोल्हापूर - जोतिबाच्या डोंगरावर ते दर रविवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत चर खोदत होते. जाता-येता काही लोक चौकशी करत होते; पण पुढे जात होते. असे चर तुम्ही दहा-पंधरा जण किती दिवस खोदणार? त्यात किती पाणी साठणार? त्यामुळे अशी किती झाडे जगणार? असेही तिरकसपणे विचारणारे त्यात काही जण होते; पण त्याकडे लक्ष न...
जुलै 04, 2019
पुणे - बॅटमोबिल कार ही सुपरहिरो "बॅटमॅन' चित्रपटातील संकल्पना असून, तरुणवर्गात या संकल्पनेविषयी आकर्षण आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची किमया पुण्यातील विद्यार्थ्यांनी केली आहे. हॅण्डमेड प्रकारातील ही देशातील पहिलीच बॅटमोबिल टम्बलर कार असल्याचे विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शकांनी सांगितले...
जून 11, 2019
पुणे - नागरिकांना स्वस्त आणि पर्यावरणपूरक अशी ‘इलेक्‍ट्रिक सायकल’ पुण्यात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बनवली आहे. या सायकलसाठी येणारा खर्च अत्यंत माफक असल्याने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू विद्यार्थांना तसेच अन्य गरजवंतांना ही सायकल उपयुक्त ठरू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे. शहरातील ऑल इंडिया...
जून 06, 2019
जळगाव - वाढते तापमान, पाण्याचा प्रचंड तुटवडा यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने बिघडत असल्याचे सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात येऊ लागले आहे. आपण गंभीरपणे पर्यावरण रक्षणाची काळजी घेतली नाही, तर आगामी काळात भीषण परिस्थिती निर्माण होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. याच संभावित धोक्‍याची जाणीव करून...
मे 23, 2019
येरवडा - मानसिक आजारातून बरे होऊनही संतोषला (नाव बदलले आहे) कुटुंबीय घरी घेऊन जात नव्हते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे एका हॉटेलने त्याला नोकरी दिली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तो तेथे काम करीत आहे. बरे झालेल्या मनोरुग्णाचे राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे पुनर्वसन करण्यात...
मे 17, 2019
कोल्हापूर - आईच्या मृत्यूनंतर तिच्या त्वचेचा इतर गरजू रुग्णांना उपयोग व्हावा, म्हणून भूमकर कुटुंबीयांनी मंदाकिनी सुरेश भूमकर (वय ८३) यांच्या त्वचेचे दान दिले. मृत्यूनंतर अवयवदान, देहदान, नेत्रदान जरूर केले जाते; पण कोल्हापुरात मृत्यूनंतर प्रथमच त्वचादान केले गेले. मंदाकिनी भूमकर यांच्या मृत्यूनंतर...
मे 14, 2019
टाकळी हाजी - नथानी कुटुंबाच्या पुढाकारातून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्तीवर राहणाऱ्या १५ आदिवासी कुटुंबांना रेलफोर कंपनीमार्फत स्लॅबची मोफत घरे बांधून देण्यात आली. दरम्यान, शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी समाज झोपड्या करून राहतात. कवठे येमाई येथे हिलाळ...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे...
मे 08, 2019
पुणे - सुक्‍या कचऱ्याच्या एकाच प्रकल्पातून जनरेटर आणि वाहनांच्या वापरासाठी इंधन, वीज, बांधकामासाठी वीटा तयार करण्यात महापालिकेच्या घोले रस्त्यावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पात यश आले आहे. केरळ सरकारनेही त्याची दखल घेतली असून, त्रिसूरमध्ये या धर्तीवर प्रकल्प सुरू होत आहे. या पद्धतीचा शहरातील हा पहिलाच...
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प व्याजदराने वित्त पुरवठा केला जात...
मे 06, 2019
सातारा - समाजातील गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांचे शिक्षण पैसा आणि मार्गदर्शनाअभावी अडू नये, गरीब व गरजू महिलांना सन्मानाने जगता यावे, यासाठी सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोसायटीच्या वतीने शेकडो महिला आणि विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची मदत केली जात असून, आजही हा सामाजिक बांधिलीचा दिवा सोसायटीने...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 26, 2019
पुणे - शहरात सर्वत्र वीज आणि कचऱ्याचा प्रश्‍न भेडसावत आहे; मात्र ब्राव्हुरिया सोसायटीच्या सदस्यांनी तक्रार करत न बसता स्वत:च त्यावर उपाय शोधून प्रथम सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यानंतर ओला कचरा व्यवस्थापन प्रकल्प चालू केला. त्यामुळे ओल्या कचऱ्याची समस्या सुटली आणि सौरऊर्जा प्रकल्पातून सदनिकाधारकांना मोफत...
एप्रिल 22, 2019
पुणे -  रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षामध्ये (आयसीयू) मुलावर उपचार सुरू होते. शेतीत काबाडकष्ट करणारे त्याचे वडील रुग्णालयात मुलगा केव्हा बरा होईल, हा विचार करीत बसले होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खुर्चीजवळच भरपूर नोटा पडलेल्या दिसल्या. क्षणभरही मन विचलित होऊ न देता त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ही...
एप्रिल 11, 2019
पुणे - आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा तब्बल वीस वर्षांनी तेलुगू मडेलवार धोबी समाजात समावेश करून घेण्यात आला. याबाबत खडकी न्यायालयात दाखल असलेला खटला तडजोडीतून मिटविला. बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा बुधवारी समाजात समावेश करून घेण्यात आला. या वेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - अपार्टमेंटमध्ये वॉचमन असलेल्या सखाराम यांना चक्कर आली. दवाखान्यात नेले, मेंदू विकाराची लक्षणे दिसली. शस्त्रक्रियेचा खर्च पुढे आला. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. ते वाचून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले. २५० रुपयांपासून २५ हजारांची रक्कम देत काही लाखांची रक्कम जमा झाली. सखाराम लहू धुमाळ...