एकूण 269 परिणाम
जुलै 14, 2019
देशाच्या "चांद्रयान 2' या मोहिमेसाठी आवश्‍यक असलेला आणि यानाचा अवकाशात झेपावण्यासाठी मदत करणारा "बूस्टर' हा भाग पुण्याजवळच्या वालचंदनगर इथल्या "वालचंदनगर इंडस्ट्रीज'मध्ये बनवला गेला आहे. संरक्षणविषयक अनेक उत्पादनं विकसित करणाऱ्या आणि स्थानिक मराठी कामगारांच्या जोरावर चालणाऱ्या या कंपनीनं अनेक...
जुलै 12, 2019
आषाढ महिन्यात राज्यभरातील पावलांना आस लागते पंढरपूरच्या विठुरायाची. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या दिशेने निघतात. याच वेळी काही साहसी मंडळी अचाट धाडस करून इतिहासाचा एक एक पदर उलगडत, एका शौर्याच्या स्मृती जागवतात. पन्हाळा-पावनखिंड मोहीम असे या धाडसी उपक्रमाचे नाव आहे. कोल्हापुरातील काही ध्येयवेडी...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
मे 27, 2019
गेले काही दिवस निवडणुकीचा हंगाम होता. वर्तमानपत्रे व वाहिन्यांवर मत-मतांतरे रंगली. राजकारणाच्या पार्श्वभूमीवर समाजकारणाशी निगडित एक कार्यक्रम बघायला मिळाला. समाजभान जपणारा अभिनेता आमीर खान याने सुरू केलेल्या "पाणी फाउंडेशन'च्या उपक्रमाविषयीचा हा कार्यक्रम "तुफान आलंया' नावानं सादर झाला. गेली काही...
मे 19, 2019
"एकला-चलो-रे', "थेट एव्हरेस्ट-त्याआधी-आणि-त्यानंतर-काहीच-नाही' असे गिर्यारोहणातील पायंडे बाजूला सारत महाराष्ट्रातील मराठी युवकांची एक संस्था अष्टहजारी शिखरचढाईत इतिहास घडवते आहे. जगातील सर्वांत उंचीची 14 पैकी सात शिखरे सर करत या संस्थेनं निम्मं ध्येय साध्य केलं आहे. ही संस्था, त्यांची कार्यपद्धती,...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 12, 2019
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अकरावीच्या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देणारा, एकविसाव्या शतकासाठी एक यशस्वी व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी युगानुकूल नवा आशय देणारा, माहिती जाणून घेण्यापेक्षा त्या माहितीवर प्रक्रिया करणारा विद्यार्थी तयार करणारा, भविष्यवेधी...
मे 04, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची आधीची प्रक्रिया व्यापक होती. नव्या प्रक्रियेत अकराशे जणांऐवजी केवळ १९ जणांकडून अध्यक्ष निवडला जात असल्याने संमेलनाध्यक्ष निवड प्रक्रियेचा संकोच झाला आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी...
मे 02, 2019
खारघर : मुलाच्या हृदय संबधित आजारावर श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात मोफत शस्त्रकीया करून नवीन जीवदान मिळत असल्यामुळे देशातील विविध क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या क्रीडापटूनी या सामाजिक उपक्रमात  सहभागी व्हावे असे आवाहन क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी खारघर येथे केले. यावेळी श्री सत्य साई संजीवनी...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याचा विकासामध्ये लोकांना नेमके काय पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत, याचा दस्तऐवज असलेले ‘लोकांच्या नजरेतून लोकसभेचा जाहीरनामा’ ही पुस्तिका आज जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांकडे प्रदान केली. सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या हस्ते...
एप्रिल 08, 2019
जळगाव ः पुलवामा (जम्मू-काश्‍मीर) येथे झालेल्या हल्ल्यात 43 भारतीय जवान शहीद झाले. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सहवेदना निधी संकलित करण्यात आला. यात जळगावातून 22 लाख रुपये निधी संकलित...
एप्रिल 07, 2019
"आम्ही भिकाऱ्यांचे डॉक्‍टर' असं स्वतःला अभिमानानं म्हणवून घेणारं डॉक्‍टर दांपत्य पुण्यात सेवाभावी वृत्तीनं काम करत आहे. रस्त्यावरच्या, वेगवेगळ्या मंदिरांबाहेरच्या भिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहणाऱ्या या दांपत्याविषयी... या सदरात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या "सिग्नलवरचे नटसम्राट' या लेखाला...
मार्च 23, 2019
पंढरपूर : गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात खडतर परिस्थितीमधे उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पंढरपूर येथे सध्या कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर रतनकुमार कवडे यांना महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी 2015 ते ऑगस्ट...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
मार्च 11, 2019
कोल्हापूर - गड-कोटांची भटकंती ही प्रेरणादायी चळवळ असून, ती महाराष्ट्रातल्या घराघरांत रुजावी, अशी अपेक्षा आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांनी येथे व्यक्त केली. मैत्रेय प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जंगलातील वाटाड्या भागोजी ढवण, धाकलू बोडेकर, बारकूमामा यांच्यासह रमण कुलकर्णी...
मार्च 04, 2019
रत्नागिरी - संगीतकलेमुळे माणूस संवेदनशील बनतो. प्रत्येकानेच काही गायक, वादक व्हायला हवे असे नाही. रसिक श्रोतेसुद्धा तयार होणे आवश्‍यक आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मैफल, संगीत कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. याकरीता सांस्कृतिक कार्य संचालनालय पुलं-गदिमा-बाबूजींच्या...
मार्च 04, 2019
कोल्हापूर - स्वप्न बघा... त्यासाठीच्या कष्टाचेही योग्य नियोजन करा आणि जे कराल ते सौजन्यानेच करा... कारण सौजन्याच्या मागेच लक्ष्मी असते... असा मूलमंत्र आज प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे यांनी दिला. दीड तासाच्या या निखळ संवादात त्यांनी आपली रोखठोक मते व्यक्त करताना खणखणीत आत्मविश्‍वास कसा असतो, याची...