एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
सप्टेंबर 30, 2019
एक घर होतं. त्यात पतीपत्नी आणि त्यांची दोन मुलं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी राहात होते. कालांतराने दोन्ही मुलांची लग्नं झाली. दाम्पत्याच्या घरात आता सून आली. घर गजबजलेलं असायचंच. पण, का कोण जाणे पूर्वीसारखा चिवचिवाट नव्हता तिथे. त्याची जागा आता धुसफुसीने घेतली होती. घरात कुरबुरी वाढल्या. कोणाच्याच...
सप्टेंबर 29, 2019
पुणे - कोणत्याही राज्याच्या विकासात शहरीकरण, उद्योग, शिक्षण, कायदे व सुव्यवस्था, प्रशासन, आरोग्य, शेती, संस्कृती, पर्यावरण आदी मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांना एकत्र करीत पुढील पाच वर्षांसाठी राज्याला दिशा देण्यासाठी पुणे इंटरनॅशनल सेंटरने प्रगतिशील महाराष्ट्र : धोरणात्मक पथदर्शिका (२०१९-२०२४) तयार...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक, ता. 6- नवी पिढी घडविण्याच्या प्रक्रीयेतील शिक्षकांनी वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी आपण काम करतं आहोत याची जाणीव ठेवताना तासाला बदलणाऱ्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. शाश्‍वत स्वरुपाचा विकास हवा असल्यास महापालिका व खासगी शाळांमधील दरी कमी होवून संवाद घडावा....
जुलै 27, 2019
चोपडा ः येथील विवेकानंद विद्यालयालतील विद्यार्थ्यांनी आभासी सूर्यमालेचा अनुभव घेत स्वत: ग्रह आणि सूर्यमाला हाताळली. थ्रीडी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या किमयेतून हा आगळावेगळा प्रयोग राबवून शाळेने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे.  विद्यालयात विविध उपक्रम राबवणारे कलाशिक्षक...
मे 08, 2019
कोल्हापूर - दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या २०१८ मधील ग्रंथ आणि काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सुचिता खल्लाळ (नांदेड) व संजीवनी तडेगावकर (जालना) यांना काव्य पुरस्कार तर ग्रंथ पुरस्कारामध्ये संग्राम गायकवाड, दिनकर कुटे, संपत देसाई, दत्ता घोलप, आलोक जत्राटकर, महादेव कांबळे याच्या पुस्तकांची...
सप्टेंबर 17, 2018
औरंगाबाद : निजामाच्या राज्यातील जनता रझाकारांच्या जुलमाला कंटाळली होती. इंग्रजांच्या दास्यातून भारतमातेला मुक्त करण्यासाठी देशभर लढे सुरू होते. हैदराबाद प्रांतातील जनतेला त्यात प्रत्यक्ष सहभागी होता येत नसले तरी गणेशोत्सवातून समाजजागृती तर करता येईल, असा विचार शहरातील तरुणांनी 1925 च्या सुमारास...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - स्थलांतरित पक्ष्यांविषयी सर्वत्र कुतूहल असते. गेल्या दोन वर्षांत भारतातून काही पक्षी परदेशात स्थलांतरित झाले. त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात वेगळेच भाव खदखदत आहेत. ते स्थलांतरित पक्षी म्हणजे विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि इतर मंडळी. त्यांचे व्यंगचित्र... तर अच्छे दिन आगे हैं, असे सांगणारा...
जून 24, 2018
संगीताचं जग कलेच्या स्तरावर मनोज्ञ, सुंदर असलं तरी त्याची व्यावहारिक वाट ही ("साथीदार कलाकारां'च्या बाबतीत तरी) काही रमणीय नव्हे; किंबहुना संवेदनशील माणसाला ती अंतर्यामी दुखावत जाणारीच आहे, याचा अनुभव मला येत गेला. व्यावहारिक फायद्यासाठी स्वत:च्या विचारमूल्यांना मुरड घालत तडजोड करणं मला मानवणारं...
जून 21, 2018
कोल्हापूर - ‘महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक जडणघडणीत शाहिरांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. नव्या काळात रसिकांची अभिरुची बदलली आहे. त्यामुळे शाहिरांनी राष्ट्रपुरुषांचे पोवाडे गाण्याबरोबर सामाजिक प्रश्‍न मांडणारे पोवाडे गाऊन परिवर्तन घडविले पाहिजे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शाहीर अभ्यासक अंबादास तावरे...
एप्रिल 11, 2018
विटा - येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या नाथाष्टमी उत्सवानिमित्त कुस्ती मैदान झाले. यात राष्ट्रीय विजेता माऊली जमदाडे विरूद्ध भारत केसरी मनजीत खत्री यांच्यात काटा लढत झाली. एक लाख इनामाच्या प्रथम क्रमांकाची ही कुस्ती पाऊणतास चालली. अखेर कुस्ती निकाली न झाल्याने बरोबरीत सोडवण्यात आली. प्रमुख लढतींबरोबरच...
फेब्रुवारी 26, 2018
नाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा "सकाळ कलांगण'...
जानेवारी 21, 2018
गुरुवर्य पंडित जसराजजी यांच्याबरोबर केलेल्या प्रवासात त्यांचे सांगीतिक विचार आणि आयुष्यातले त्यांचे अनुभव ऐकायला मिळायचे. यातून खूपच प्रेरणा मिळायची. वटवृक्षासारख्या कलावंताची अनुभवसमृद्धीही तेवढीच भव्य असते. या ऐकलेल्या अनुभवांतून एक दृष्टी प्राप्त होत जाते. माझी आई डॉ. शोभा अभ्यंकर...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - 'पत्रकार म्हणून जगलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या वास्तवाच्या बळकट आधारामुळे साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांना वेगळेपणा लाभला. त्याबरोबरच त्यांच्या विलक्षण धावत्या, प्रवाही लेखनशैलीमुळे आणि अनोख्या सर्जनशीलतेमुळे त्या कलात्मक उंचीही गाठू शकल्या. असा लेखक खरोखर विरळाच असतो...
जून 12, 2017
मुंबई ; “माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधा सारखे...असे ते नेहमी म्हणत! खरंतर बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे आप्पा स्वत:च होते, असे वीणा देव यांनी सांगताच, कमालीची शांतता पसरली. आणि त्या प्रतिभावंत लेखकाबद्दलचा आदर कमालीचा वाढला. निमित्त होते...
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
मे 11, 2017
गेट वे ऑफ इंडियावर विश्‍वशांती परिषदेचे उद्‌घाटन मुंबई - तलवारीने कुणीच जग जिंकू शकला नाही, हा इतिहास आहे. त्याउलट विचार, शांती, अहिंसा आणि संस्कारांनी जग निश्‍चित जिंकता येते. तथागत गौतम बुद्धांच्या याच विचारांची आज देशासह साऱ्या जगाला आवश्‍यकता आहे. जगाला युद्ध नको, तर बुद्ध हवा आहे, असे...
एप्रिल 16, 2017
श्रीकृष्ण एक अभ्यास प्रकाशक - परममित्र पब्लिकेशन्स, नौपाडा, ठाणे (पश्‍चिम) (९९६९४९६६३४/ पृष्ठं - २२०/ मूल्य - २५० रुपये श्रीकृष्ण हा देव आणि अनेकरंगी व्यक्तिमत्त्व. त्याचे विविध पैलू उलगडून दाखवणारं, त्याच्याविषयी चिंतन करणारं हे पुस्तक. पांडुरंगशास्त्री आठवले, धनश्री लेले, डॉ. यशवंत...
मार्च 19, 2017
योजकस्तत्र दुर्लभ प्रकाशक - ज्ञानेश प्रकाशन, नागपूर (०७१२-२२२७४७९) / पृष्ठं - २२४/ मूल्य - २५० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासाविषयी डॉ. भा. ना. काळे यांनी लिहिलं आहे. मोदी यांचे सुरवातीचे दिवस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचं नातं, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून...
मार्च 14, 2017
नगरदेवळा (ता. पाचोरा) - महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे येथे प्रथमच शाहिरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. १९ मार्चपर्यंत सुरू असलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनीही शाहिरीचे प्रशिक्षण घेत आहेत. शिबिराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, शासनाच्या या उपक्रमाचे सार्थक होत...