एकूण 11 परिणाम
डिसेंबर 10, 2019
अकोला : महापालिका सभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वितुष्ट दिसून आले. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी अमृत अभियानाच्या डीपीआरच्या विषयावरून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत ‘मीच सभा घेणार...’ या मुद्यावरून डिचविण्याचा प्रयत्न केला....
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
सप्टेंबर 16, 2019
जिल्ह्यातील एकमेव मंत्री, सलग दोन वेळा मोठे मताधिक्‍य, कमकुवत विरोधक या आमदार सुरेश खाडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका या निवडणुकांत रिझल्ट दाखवून, गट बांधून, भाजपची मुळे विस्तारून त्यांनी पक्षाला ‘मी दंगलीचा आमदार नाही’ हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्यासमोर आता...
ऑगस्ट 25, 2019
अमरावती : महापालिकेच्या क्षेत्रात 1 लाख 65 हजार घरे असून जवळपास दीड लाख कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही. महापालिकेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 65 हजार अर्ज आले असून सर्वच 65 हजार अर्जदारांना हक्काची घरे मिळतील, असे आश्‍वासन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास...
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
मे 25, 2018
 समतानगरमध्ये ड्रेनेजसाठी खोदकाम झाले; पण काम झाल्यावर रस्त्यांचे डांबरीकरण केले नाही. काम झालेल्या डांबरीकरणाचा दर्जा चांगला नाही. महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही दाद घेतली जात नाही. - विजय पाटील   समतानगर, माणिकनगरसह परिसरात घनकचऱ्याची समस्या आहे. प्रक्रिया प्रकल्पाद्वारे सांडपाण्याची...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....
मे 12, 2017
प्रश्‍न सुटण्याचा आशावाद - २० वर्षानंतर चंद्रकांतदादांच्या रुपाने स्थानिक नेतृत्व  कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याला २० वर्षानंतर याच जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांचा चांगलाच पाठपुरावा होऊ लागला आहे. पंचगंगा प्रदूषणापासून ते शहरातील वाहतूक व्यवस्था, रखडलेले सिंचन...
जानेवारी 21, 2017
सुहास पुदाले यांना बांधकाम, शिंदेंकडे पाणीपुरवठा समिती  पलूस - पलूस नगरपालिका विशेष सभेत विविध विषय समित्यांच्या सभापतिपदी सुहास पुदाले, परशराम शिंदे, विक्रम पाटील, सुनीता कांबळे, रेखा भोरे यांची तर उपसभापतिपदी उज्ज्वला मोरे यांची बिनविरोध निवड झाली.  निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार मधुसूदन...
जानेवारी 17, 2017
पुणे: मुंबई महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सर्व ताकद एकवटली असली तरी पुण्याकडे मात्र त्यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची भावना शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा परिषद या तीन महत्त्वाच्या सत्ताकेंद्रासाठी निवडणुका...
डिसेंबर 30, 2016
धुळे - स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ मध्ये शहराची कामगिरी कशी आहे, यावर शासनाचा निधी अवलंबून असेल. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करा. शहर हागणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक शौचालयांपेक्षा वैयक्तिक शौचालये उभी करा, असा सल्ला स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य अभियान संचालक डॉ....