एकूण 76 परिणाम
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 02, 2019
जळगाव ः आपण विधानसभा निवडणूक लढविणार नाही, अशी जाहीर घोषणा यापूर्वी करणारे शिवसेना नेते माजी आमदार सुरेशदादा जैन यांनी अखेर आपली घोषणा मागे घेत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ते शिवसेनेच्या तिकिटावरच विधानसभा लढवतील, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन...
मे 24, 2019
नव पक्ष, नवे चिन्ह आणि मागच्या पराभवाची शिदोरी घेऊन लोकसभा लढवणे हे स्वाभिमानच्या दृष्टीने आव्हान होते. नारायण राणे यांनी बेधडक कार्यशैलीनुसार ते स्वीकारले; पण पूर्ण ताकद लावूनही ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरले. गेल्या वेळच्या पराभवापेक्षाही कणकवली मतदारसंघात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात घटलेले...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे...
मे 16, 2019
मार्मिक टिप्पणी, चपखल भाषा आणि मतदारांच्या मर्मावर बोट ठेवणारी शब्दचित्र कळा यामुळे लोकसभा निवडणुकीत जाहिरातयुद्ध रंगले. मात्र त्यात कोणत्याही पक्षाकडे ठोसपणे मांडता येईल, असा वास्तव दाखवणारा आणि टणत्कार असणारा संदेश नव्हता, हेही तितकेच खरे. रा जीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला ‘...
एप्रिल 02, 2019
क्रिकेटमध्ये एखाद्या संघाला स्पर्धेतील सामन्यात आपले सामन्यातील अस्तित्व टिकावयाचे असल्यास त्याला विजय मिळविण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, नाही केले तर तो स्पर्धेतून बाद होईल. यासाठी अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास "करो या मरो' अशी स्थिती त्या संघासमोर असते. त्याचप्रमाणे रावेर लोकसभा मतदार...
मार्च 18, 2019
वडगाव निंबाळकर - राजकारणाचे जोडे बाजुला ठेउन धनगर समाजाच्या विविध पोटजातीमधील सर्वांनी एकत्र या. एकीचे बळ आपल्याला पुढे घेउन जाईल असे मत आमदार दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केले.  शेगर धनगर समाजाच्या राज्य अध्यक्षपदी सुनिल भगत यांची निवड झाली याबद्दल नुतन पदाधिकाऱ्यांचा नागरी सत्कार समारंभ कोऱ्हाळे...
मार्च 17, 2019
लोकसभेच्या धुळे मतदारसंघात सर्वांचे लक्ष कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे लागले आहे. यात माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील या पिता-पुत्राभोवती निवडणूक केंद्रित झाल्याने रंगत वाढते आहे. असे असले तरी पक्षाच्या उमेदवारीवरून धुळे विरुद्ध नाशिक जिल्ह्यात सुरू असलेला संघर्ष, तसेच पाडापाडीच्या...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 11, 2019
देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
डिसेंबर 14, 2018
नागपूर : राफेल विमान खरेदीच्या विरोधात दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण करू नये. या निकालावरून विरोधकांनी बोध घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांना दिला आहे. गेल्या काही...
डिसेंबर 11, 2018
देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम व तेलंगणा या पाच राज्यांतील निकालाचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. या निकालाने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तीन राज्यांत भाजपचा सपशेल पराभव झाल्याने राहुल गांधींचे नेतृत्वावरही आता जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे, असेच म्हणावे लागेल....
नोव्हेंबर 26, 2018
धुळे ः भारतीय जनता पक्षाने राज्यात विरोधकांना नमवून नाशिक, कोल्हापूर, जळगाव, महापालिका कब्जात घेतल्या आहेत. आता धुळे महापालिकेतही भाजप सर्व ताकदीनिशी रणांगणात उतरला आहे. परंतु शहरात भाजपच्या आमदारांनीच पक्षाला खुले आव्हान दिल्याने "भाजप' विरुद्ध "भाजप' अशीच लढत रंगणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार...
ऑक्टोबर 19, 2018
पणजी : गोवा मंत्रिमंडळातून अॅड फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना वगळल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेला पेच वाढत चालला आहे. पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या राजकारणात लक्ष घालत होते, अाता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लक्ष घालत असूनही, त्यांनाही हा गुंता सोडवता आलेला...
ऑक्टोबर 08, 2018
बंगळूर - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणारी लोकसभा व विधानसभेची पोटनिवडणूक म्हणजे सत्ताधारी काँग्रेस-धजद युती व भाजपमधील वर्चस्वाची लढाईच ठरणार आहे.  राज्यात भाजपच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी काँग्रेस व धजदमध्ये युतीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत; तर भाजपने पोटनिवडणूक जिंकून राज्यात...
सप्टेंबर 27, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात भिडणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांनी गावगाढयात मात्र राढा केला असून सरपंचपद आणि सत्ता मिळविण्यासाठी सोयीची होईल अशी युती करत सत्ता मिळविली. त्यामध्ये आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या तिन्ही...
सप्टेंबर 24, 2018
चिपळूण - आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत हजर राहिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांचे नाव न घेता त्यांच्यावर राजकीय निशाणा साधला. सामंत आणि निकम यांच्यात राजकारणापलिकडची मैत्री होती. मात्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या...
सप्टेंबर 16, 2018
पणजी - रविवार आणि गणेशोत्सवाचे दिवस असूनही गोव्याची राजधानी पणजी शहर आज गजबजलेले आहे. आजारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची खाती अन्य मंत्र्यांकडे कशी द्यावीत किंवा मुख्यमंत्र्यांचा उत्तराधिकारी कसा निवडावा यासाठी शहरात सकाळपासून राजकीय नेते, कार्यकर्ते यांची ये जा सुरु झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती...