एकूण 509 परिणाम
जुलै 22, 2019
मिरज - रुग्णसेवेसाठी सेवावृत्तीने आयुष्य व्यतीत केलेल्या रुकडी (जि. कोल्हापूर) येथील डॉ. उद्धव आणि डॉ. प्रज्ञा कुलकर्णी या दांपत्याचा निर्घुण खून झाला. या घटनेला येत्या 7 ऑगस्टला तीन वर्षे पुर्ण होतील. या सेवाभावी दाम्पत्यांच्या स्मृती सभागृहाच्या रुपाने कायम ठेवण्याचे...
जुलै 22, 2019
कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढीला निसर्गातील दुर्लक्षित रानभाज्या ओळखता याव्यात, या अनुषंगाने रानमाया महोत्सवाचे आयोजन केले आहे. 30 जुलैला कुडाळ हायस्कूल येथे हा महोत्सव होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री. देसाई यांनी पंचायत...
जुलै 15, 2019
सातारा : माण मतदारसंघाच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती थोपविण्यासाठी माण व खटाव तालुक्‍यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आज (सोमवार) साताऱ्यात एकत्र आले. या सर्वांनी आगामी विधानसभा निवडणुकीतून गोरे बंधू हटावची शपथ घेतली. खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात माणमधील सर्वपक्षीय आज (...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 10, 2019
कोल्हापूर - जोतिबाच्या डोंगरावर ते दर रविवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत चर खोदत होते. जाता-येता काही लोक चौकशी करत होते; पण पुढे जात होते. असे चर तुम्ही दहा-पंधरा जण किती दिवस खोदणार? त्यात किती पाणी साठणार? त्यामुळे अशी किती झाडे जगणार? असेही तिरकसपणे विचारणारे त्यात काही जण होते; पण त्याकडे लक्ष न...
जुलै 08, 2019
सांगली - प्रत्येक गावापर्यंत जाऊन तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून केलेले मजबूत संघटन हीच भाजपची ताकद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगितलीय. या बळावरच विधानसभेला पुन्हा आपण ताकद दाखवू, असा विश्‍वास भाजपचे प्रदेश संघटन मंत्री विजय पुराणिक यांनी व्यक्त केला.  जिल्हा...
जुलै 07, 2019
नागपूर : महापालिकेच्या परिवहन समितीसह इतर दहा विशेष समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी आज निवडणूक पार पडली. कॉंग्रेस व बसपा अंतर्गत वादामुळे सदस्यांच्या नावाची शिफारसही करण्यात अपयशी ठरल्याने अपेक्षेप्रमाणे दहाही विशेष समित्यांवर सभापती व उपसभापतींची अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे यातील तीन सभापती...
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
जून 29, 2019
नाशिक : आयपीएस होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या सागरसमोर नियतीने भलतेच काही वाढून ठेवले. ऐन उमेदीच्या काळात असाध्य अशा पायाच्या कर्करोगाशी झगडा त्याला करावा लागतोय. मात्र, अशाही स्थितीमध्ये त्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या काही मिनिटे आधी त्याचे आवडते नायक नाशिकचे पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे...
जून 21, 2019
कडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नीता देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी राजू उर्फ प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटक्याची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला. नगरपंचायतीच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 14, 2019
कुडाळ - ‘‘पत्रकार समाजातील सुख-दुःखात नेहमी अग्रेसर असतो. या आधुनिक युगात मोबाईलच्या वापराने घराघरात पत्रकारिता पोचली आहे. पत्रकारांच्या प्रश्‍नांना आज प्राधान्य देणे गरजेचे असून शासनाने कायदे व विविध योजना पत्रकारांसाठी अमलात आणाव्यात’’, असे प्रतिपादन जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केले...
जून 10, 2019
कोल्हापूर - बेकायदा देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली. तानाजी महादेव पालकर (वय ३६, रा. नांगरे माळ, पाडळी खुर्द, ता. करवीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह आठ जिवंत काडतुसे, असा ४० हजारांचा मुद्देमाल जप्त...
जून 09, 2019
लातूर - सचिन तेंडुलकर इंजिनिअर झाला असता किंवा लता मंगेशकर डॉक्‍टर झाल्या असत्या तर..? एक चांगला खेळाडू किंवा चांगली गायिका भारताला मिळाली नसती. त्यामुळे आवड आणि संधी यांची सांगड घालून तुम्हीही तुमचे करिअर निवडा; पण त्यात यश मिळवायचे असेल तर धडपड, कष्ट याला पर्याय नाही, असा सल्ला करिअर तज्ज्ञांनी...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हा...
जून 06, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज कोल्हापुरात पक्षाच्या विजयी 18 खासदारांसह सहकुटुंब अंबाबाईचे दर्शन घेऊन देवीसमोर नतमस्तक झाले. मंदीरात आल्यानंतर श्री. ठाकरे यांचे स्वागत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. देवस्थान...
जून 06, 2019
कोल्हापूर - यशवंत सहकारी बॅंकेच्या आपटेनगर शाखेतील ६२ हजारांच्या लुटीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आज यश मिळाले. बॅंकेच्या पिग्मी एजंटनेच साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून लुटीची रक्कम जप्त केली. दरम्‍यान, तपासात कळंबा परिसरातून पाच वर्षांपासून गायब...
जून 03, 2019
रत्नागिरी/लांजा - निवसर (ता. लांजा) येथे उपसा करण्यासाठी विहिरीमध्ये खाली उतरलेले तिघे गुदमरले. ही दुर्घटना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. विहिरीत उतरणे धोकादायक असल्यामुळे त्या तिघांचे आतमध्ये नेमके काय झाले आहे हे समजू शकलेले नाही. तिघांना आतून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न रात्री...
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात...