एकूण 51 परिणाम
ऑगस्ट 09, 2018
पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. श्रीधर पलंगे (पुणे)...
जुलै 23, 2018
पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत दर्शन मंडळ आणि सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘भजनरंग’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रिडामंच स्वारगेट येथे नुकतेच करण्यात आले होते. या वेळी प्रसिद्ध गायक पंडित सुरेश वाडकर, कार्तिकी गायकवाड, योगिता गोडबोले, आणि राजेश दातार...
जुलै 19, 2018
समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक माळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. संत...
जुलै 17, 2018
डोर्लेवाडी - विठ्ठल नामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे निघालेल्या संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे पिंपळी (ता. बारामती) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पावसाच्या हजेरीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी (ता. १६) बारामतीचा मुक्काम आटोपून सकाळी पालखी...
जुलै 17, 2018
इंदापूर - एचआयव्ही ग्रस्त रुग्ण, विधवा माता यांना त्यांचे हक्क, मूलभूत सुविधा मिळाव्यात तसेच पर्यावरण संतुलनाचा संदेश देत परभणी येथील होमिओपॅथीक ॲकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक तसेच त्यांचे सहकारी आकाश गिते हे सायकलवरून आळंदी, पुणे, पंढरपूर ते कुर्डूवाडी अशी वारी...
जुलै 14, 2018
पुणे - आषाढीसाठी हजारो दिंड्या, पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. परभणीचे डॉ. पवन चांडक सायकलवरून वारी करून एचआयव्ही, एड्‌सबद्दल जनजागृती करत आहेत.  पुण्यातून त्यांनी आज (शुक्रवार) सायकल वारीला सुरवात केली असून, पुणे-आळंदी ते पंढरपूर या मार्गावर ते जनजागृती करणार आहेत.आकाश गीते...
जुलै 14, 2018
बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती.  बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्‍स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,...
जुलै 14, 2018
गराडे - झेंडेवाडी येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून मसाज सेवेचा उपक्रम चालू आहे. या वर्षी सात हजार वारकरी लोकांची मसाज दोनशे शिक्षकांनी केली. दिवे घाटाचे अतिशय अवघड असे चढण चढून आल्यानंतर या ठिकाणी मसाजची जी सेवा मिळाली यामुळे खूप आराम मिळाला...
जुलै 13, 2018
वरवंड - ऊन-सावल्यांच्या खेळात मुखी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झालेले वैष्णव, अशा भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने दौंड तालुक्‍यातील रोटीच्या नागमोडी घाटाचा अवघड टप्पा पार केला. हिरवाईने नटलेल्या घाटात भगव्या पताका व वारकऱ्यांमुळे भक्तीचा मळा फुलला होता.  संत तुकाराम महाराज...
जुलै 13, 2018
सातारा - माउलींच्या दर्शनाच्या ओढीने अलंकापुरीकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांच्या ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील दोन हजार विद्यार्थी वारीत ‘स्वच्छ सेवा’ करणार आहेत. या उपक्रमात प्रत्येक महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील ४० विद्यार्थी...
जुलै 12, 2018
नाशिक : नाशिक सायकलिस्ट असोसिएशनतर्फे उद्या (ता.12) पंढरपूर सायकलवारी निघणार आहे. त्यात, यंदा प्रथमच प्रसाद उत्तेकर हा दिव्यांग युवक नाशिक ते  पंढरपूर सायकल प्रवास करणार आहे.  मुंबईतील रहिवाशी असलेले प्रसाद उतेकर (वय27) हा युवक गेली अनेक वर्षापासून सायकलचा चाहता आहे. नॅब संस्थेत पेपर डिझाईनचे काम...
जुलै 12, 2018
केडगाव - चौफुला (ता. दौंड) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील १० गावांतील भाविकांनी गर्दी केली. गर्दी जास्त असल्याने पालखी सोहळा येथे तासभर विसावला होता. केडगाव येथील नितीन जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील मोरया ढोल ताशा पथकाने ढोल ताशांच्या गजरात पालखीचे...
जुलै 12, 2018
सातारा - माउलींची पालखी शुक्रवारपासून (ता. १३) सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहे. हा पालखी सोहळा लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथे मुक्कामाला असणार आहे. वारीमार्गात संत ज्ञानेश्‍वर व संत तुकाराम यांच्या पालख्या नेमक्‍या कोठे आहेत हे भाविकांना समजावे, तसेच वारकऱ्यांना योग्य वेळी मदत मिळण्याबरोबर विविध...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - समतेच्या संदेशातून समाज जोडणाऱ्या वारी सोहळ्यानिमित्त "विठाई' पुस्तकाचे प्रकाशन आज येथे झाले. अभ्यासपूर्ण लेख आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या छायाचित्रांचा पुस्तकात समावेश आहे. आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात "सकाळ'तर्फे "साथ चल' उपक्रम राबविण्यात येत आहे. हे पुस्तक या उपक्रमाचा भाग आहे. संत...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...
जुलै 07, 2018
लोणी काळभोर : संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, महसूल विभाग व पोलिस प्रशासन अशा सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.  पुणे शहरातील मुक्काम आटोपून ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा...
जुलै 07, 2018
विश्रांतवाडी : साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा या संतांच्या उक्तीप्रमाणे नागरिकांनी श्रीसंत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी परिसरात उत्साहाने स्वागत केले.  आळंदी रस्ता, विश्रांतवाडी आणि परिसर सकाळपासूनच वारकर्‍यांनी व त्यांच्या स्वागतास येणार्‍या नागरिकांनी खुलून गेला होता. अनेक...
जुलै 07, 2018
नेवासे : 'ज्ञानोबा माउली तुकाराम'चा गजर करीत राज्यात शिस्तप्रिय असलेल्या श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील श्री सर्मथ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पायी दिंडी पालखीचे शनिवार (ता. ७) रोजी संत ज्ञानेश्‍वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासेनगरीत दुपारी टाळ- मृदुंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी दिंडीचा...
जुलै 07, 2018
पिंपरी - ‘बोलाऽ, पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’ म्हणताच भागवत धर्माची भगवी पताका फडकवली गेली आणि ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स कंपनी’ यांच्यातर्फे आषाढी वारीनिमित्त आयोजित ‘साथ चल’ दिंडीला शनिवारी (ता. 7) सुरवात झाली.  ‘फिनोलेक्‍स केबल्स...