एकूण 17 परिणाम
फेब्रुवारी 02, 2019
सकाळी उठलो. घड्याळ बघितले. पुन्हा झोपलो. मनात म्हटले इतक्‍या लौकर उठून काय करणार? माणूस जितके तास जागा राहातो, तितकी त्याची जेवणे जास्त होतात. त्यापेक्षा झोपलेले बरे....घुर्रर्र...पुन्हा उठलो. घड्याळात बघितले. जेवणाची वेळ झाली होती. उठलो. आता चहा प्यावा की डायरेक्‍ट जेवूनच घ्यावे? हा प्रश्‍न पडला....
जानेवारी 17, 2019
पहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं मोडलेल्या, प्रेटोरियन दंडुक्‍याने पिचलेल्या रोमन साम्राज्यात आधी झाली असह्य कुजबूज, मग झाली आदळआपट आणि त्यातूनच पेटला जनतेचा जळजळता हुंकार. ‘‘नीरोनं जायला...
जानेवारी 10, 2019
बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक! मम्मामॅडम : (कागदपत्रं चाळण्यात बिझी...) हं! बेटा : (आळस देत) सुटलो! संपलं एकदाचं ते हाऊस! मम्मामॅडम : (कामाच्या तंद्रीत...) लोक उगीचच हौसमौज असं म्हणतात! ॲक्‍चुअली बिलकुल मौज नसते हौसमध्ये! बेटा : (डोकं चोळत) सुट्टीवर जावं असं...
नोव्हेंबर 27, 2018
माझ्या तमाऽऽम मावळ्यांनो, सरदारांनो, दरकदारांनो... आणि माता-भगिनीन्नो, आपल्या कृपाशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जोरावरच आम्ही श्रीराम मंदिराचे शिवधनुष्य खांद्यावर पेलिले आहे. (टाळ्या आणि कुचकट हशा!) पाठीवरल्या भात्यात मुबलक बाण आहेत!! (हिप हिप हुर्रेची ओरड) भारताच्या सर्व प्रश्‍नांवर मंदिर हा एकमेव...
जुलै 18, 2018
आजची तिथी : विलंबिनाम संवत्सरे, श्रीशके १९४०, आषाढ शुद्ध पंचमीआजचा वार : ट्यूसडे विदाऊट मिल्क !आजचा सुविचार : दूध दूध दूध दूध...पीता है इंडिया ! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) माणसाने आयुष्यात काहीही व्हावे, पण महाराष्ट्राचा कारभारी होऊ नये. नागपूरला आल्यावर दिवस जरा बरे जातील...
जुलै 07, 2018
"सांग सांग भोलानाऽऽथ, पाऊस्स पडेल्काय... शाळेभोवती पाणीसाचून्सुट्टी मिळेल्काय...' हे जुने बालगीत गुणगुणतच सकाळ उगवली. बाहेर तुफ्फान पाऊस पडत होता. नागपुरातील रस्ते जलमय झाले होते. घराघरांत पाणी शिरले होते. इतकेच नव्हे, तर रविभवनच्या परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते. विरोधी...
जून 30, 2018
सकाळ होती, दुपार किंवा असेल संध्याकाळ रिपरिप होता पाऊस तेव्हा होती हवा ढगाळ अवचित सर ती आली मोठी, पाऊस होता खोटा लयीत बरसे जणू दिवाणा विणकर चालवि धोटा वळून पाहिले मीही आणिक थक्‍क जाहलो तेव्हा खरेच विणकर बसला होता मुखात होता दोहा सुरेल विणकर गात राहिला सुरेल त्याची वाणी मुखातूनी अन्‌ सदैव त्याच्या...
फेब्रुवारी 03, 2018
गेलाबाजार डझनावारी अर्थतज्ञ पैदा झाले असून, त्यांस डझनावारी टीव्ही च्यानलांवरून अर्थसंकल्पाचे सखोल विश्‍लेषण करताना पाहून आम्ही हतबुध्द झालो आहो, क्षुब्धबुध्द झालो आहो, विषण्णबुध्द झालो आहो!! (हल्ली कोणी असले शब्द वापरते काय? आम्ही थोरच आहो, ह्याचा हा पहिला पुरावा!!) इतक्‍या प्रचंड लोकसंख्येला...
नोव्हेंबर 07, 2017
""आम्ही औडत नै वाटतं!,'' "बॉबी'ने फुरंगटून विचारले, तेव्हा आम्ही थोडे कावरेबावरे झालो. "' छे, छे, असं काही नाही. आज ही ज्यूली म्हणाली की आमची टेष्ट करा...म्हटलं आज ज्यूली तं ज्यूली...बॉबी तो अपनीच है नाऽऽ,'' आम्ही तिची प्रेमाने समजूत घातली. पण तिच्या नाकावरचा राग काही गेला नाही. महाराजा...
ऑक्टोबर 26, 2017
महाराष्ट्राचे कारभारी मा. ना. नाना फडणवीस ह्यांच्या कारकीर्दीस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही अखिल महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन करतो. कां की त्यांच्यामुळेच ही कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. त्याचप्रमाणे आम्ही खुद्द मा. ना. नाना ह्यांचेही आभार मानतो. कां की ते नसते तर तीन वर्षे कशी गेली असती...
सप्टेंबर 01, 2017
स्थळ : मातोश्री, वांद्रे. काळ : आलेला! वेळ : सांगून न येणारी! प्रसंग : बांका!! विक्रमादित्य : (हातात आयफोन नाचवत) बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (घाईघाईने पांघरुणात शिरत) नको! मी आता कपाळाला बाम लावलाय!  विक्रमादित्य : (गंभीर चेहऱ्यानं) कुछ बात करनी थी! उधोजीसाहेब : (पांघरूण डोक्‍यावर घेत)...
जुलै 31, 2017
टमाटे हे फळ आहे की भाजी (की फळभाजी?) हा एक संशोधनाचा विषय आहे. आम्हांस विचाराल तर टमाटे हे टमाटे आहेत. टमाट्यास भाजी म्हटले तर फळवादींचे (नशीब) फळफळते, आणि त्यास फळ असे संबोधले तर "भाजीझम'वाले करपतात. टमाटे ही लालुंग्या रंगाची रसरशीत फळसदृश भाजी किंवा भाजीसदृश फळ आहे, तो एक खाण्यायोग्य सामान्य,...
जून 10, 2017
कुंद रात्रीच्या तिरक्‍या चाली  काळोखाची असह्य गदमद  राखेमधले निपचित इंगळ  उगाच होते मनात सदगद  दूर कुठेतरी काळोखातच  कुत्र्यासम ओरडती रस्ते  कडेस पडल्या नि:श्‍वसितांचे  सौदे पडती वाजीव सस्ते  उगाच खडखड करते केव्हा  कुंद रात्रीचे कळकट बरतन  रात्र रिकामी, गात्र निकामी  निरर्थकाचे चिल्लर स्पंदन  छतास...
जून 08, 2017
सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे, सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी आम्ही चर्चा करणार नाही... खरा पाऊस असतो सायबेरियाहून येणाऱ्या फ्लेमिंगोसारखा...पाहुणा. तूर्त पडणाऱ्या पावसाच्या सरी शतप्रतिशत लोकल असून त्यांच्यामुळे रानात मोर रडतात, व त्यांस हकनाक पोरे होतात. ...हे पतन आहे, पर्जन्य नव्हे! तेव्हा, खऱ्या...
जून 06, 2017
रात्र काळोखी होती, वैऱ्याची नव्हे! हवा ढगाळ होती, टाईट नव्हे!! वातावरण कुंद होते, धुंद नव्हे!! अशा अवकाळी दोन सावल्या एकमेकांशी कुजबुजत होत्या...कोण बरे हे दोघे? इतिहासाने त्यांची नावे नोंदवून घेतली आहेती. एक होता सदाजी, दुसरा जयाजी. दोघेही महाराष्ट्राच्या दौलतीचे रणझुंजार गडी. तेगबहाद्दर....
मे 03, 2017
हवामानाचा अंदाज आला नाही की अनर्थ होतो. ह्या बेभरवशी हवामानामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सुगीच्या दिवसात थोडे उगी बसावे, त्या काळात महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आज तुरीच्या पोत्यांवर पहारे देत बसावे लागत आहे, ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? ये जालीम हवा!! हवेसारखी घातकी...
नोव्हेंबर 10, 2016
बरे केले देवा। नाही केले गोते। होत्याचे नव्हते। असते झाले।। बरे तरी आम्ही। ऐसे चाकरमानी। बांधील इमानी। पगाराशी।। आम्हा घरी धन। चिल्लर थोडकी। बाकीची कडकी। बारमाही।। कधीमधी दिसे। पाचशेची नोट। नशिबात खोट। कायमची।। कुणाला ठाऊक। हजाराचे काय। फाटक्‍यात पाय। सदैव हो।। कोठुनिया आणू। नोटांची पुडकी। नुरे गा...