एकूण 1004 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
ऐक सामान्य माणसा, कां डोके फिरल्यासारखा वागतोस? गोडबोल्या थापांना सहजी  कसा भुलतोस? रिकाम्या पोटाची आठवण नाही राहात? रोजची पर्वड लक्षात नाही राहात? ऐक माझ्या राजा, आपल्या जुत्यात राहा माझं ऐकशील तर सुखाच्या दिशा आहेत दहा! तीनशे सत्तरचा आणि तुझा मुळात संबंध काय? पुलवामाच्या हल्ल्यात  तुझे कोणी गेले...
ऑक्टोबर 15, 2019
कधी एकदा इलेक्‍शनचा उपचार पार पडतो आणि पोटभर जेवतो, असे झाले आहे. गेल्या फारा दिवसांत चाऱ्ही ठाव म्हणतात, तसे जेवलेलो नाही. वडापाववर किती दिवस काढणार? इलेक्‍शननंतर अवघ्या पाच आणि दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार असल्याने आम्ही आतुर (आणि भुकेले) आहो! पाच-दहा रुपयांत फुल्ल जेवण मिळण्याची ही सोय...
ऑक्टोबर 14, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४२ आश्‍विन पौर्णिमा. आजचा वार : संडेवार. आजचा सुविचार : चांद को क्‍या मालूम चाहता है उसे कोई चकोऽऽओओओओर!! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) आज काय लिहू या डायरीत माझ्या? सारे शब्दच संपले! आज कोजागरी पौर्णिमा... को जागर्ति असे विचारीत फिरायची...
ऑक्टोबर 12, 2019
दादू : सदूऽऽऽ..! सदू : बोल दादूऽऽ...! दादू : सध्या पावसापाण्यात हिंडतोहेस...छत्री घे हो! सदू : तू रेनकोट घे! दादू : मी छत्री आणि रेनकोट दोन्ही सोबत ठेवतो! ऊन पडलं की छत्री, पाऊस पडला की रेनकोट! सदू : बामची बाटली पण जवळ ठेवत जा! पडसं झालं तर उपयोगी येईल! दादू : तू रुमाल ठेवतोस ना? सदू : रुमालाशिवाय...
ऑक्टोबर 11, 2019
मुक्‍काम पुणे. बाहेरचा गडगडाट आणि कलकलाट ऐकून किंचित चिडक्‍या (म्हंजे नेहमीच्या) स्वरात साहेबांनी विचारले, ‘‘कोण आहे रे तिकडे? काय गडबड आहे?’’ ‘काही नाही, थोडे ढग आहेत, साहेब! उगीच गडबड करताहेत,’’ एका कडवट सैनिकाने चाचरतच उत्तर दिले. साहेबांनी प्रारंभी दुर्लक्ष केले. गरजेल तो बरसेल काय? पण ढग बरसले...
ऑक्टोबर 09, 2019
(भाग दुसरा आणि फायनल!)  खंडेनवमीचा दिवसभर साहेबांना आम्ही अनेक प्रश्‍न विचारले. उत्तरादाखल त्यांनीही अनेक प्रश्‍न आम्हाला विचारले. प्रश्‍नाखातर आम्ही त्यांना यथाशक्‍ती उत्तरे दिली. हे साधारणपणे उत्तरपत्रिका वाटून झाल्यानंतर तीन तासांत त्यावरून प्रश्‍नपत्रिका सेटिंग करण्यापैकी होते. पण तरीही मुलाखत...
ऑक्टोबर 08, 2019
मंद दिव्याच्या अर्धवट अंधार कम उजेडात प्रत्यक्ष साहेब बसलेले. चेहऱ्यावर गंभीर भाव. अवघ्या महाराष्ट्राचे भविष्य जणू समोर बसलेले. त्यांच्या पुढ्यातील स्टुलावर आम्ही! आमच्या चेहऱ्यावर अष्टमीचा दिवसभराचा उपास ‘लागल्या’ची कळा. परंतु, फैनाबाज कुर्ता आणि पायजम्यातील ती मूर्ती पाहून प्रथम आम्ही (...
ऑक्टोबर 07, 2019
स्थळ : आरेवनातील मचाण, आरे. वेळ : काळरात्रीची! प्रसंग : लढाईचा. पात्रे : महाराष्ट्राचे समंजस नेते श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (आडवे झोपून) बॅब्स...भयंकर अंधार आहे नै? उधोजीसाहेब : (विनंतीयुक्‍त आवाजात) मी दमलोय रे! त्यातून उगीच अंधाराबिंधाराचं काही बोलू नकोस ना!!...
ऑक्टोबर 05, 2019
नगरचौकात दुतर्फा उसळलेल्या अफाट गर्दीतील सहस्रावधी डोळ्यांना दूरवर दिसू लागला एक ठिपका... आरोळ्या आणि जयजयकाराच्या घोषणांनी निनादला आसमंत. समुद्राच्या लाटांसारख्या उन्मनी शुभ्र अश्‍वाच्या पाठीवर मांड ठोकून नगराकडे उत्सुक टापा टाकत आलेल्या राजपुत्राने मग आपल्या निळ्या डोळ्यांनी नीट बघितली आपल्या...
ऑक्टोबर 04, 2019
मा. पक्षाध्यक्ष, स. न. वि. वि. अत्यंत विचित्र परिस्थितीत हे पत्र लिहीत आहे. मोबाइल फोन बंद करून ठेवला आहे आणि लॅंडलाइनचा फोनही काढून ठेवला आहे. घराचे दरवाजे व खिडक्‍या कडेकोट बंद आहेत. हट्टाने दाराची बेल वाजवणाऱ्याला ‘साहेब घरात नाहीत’ असे सांगण्यास कुटुंबाला बजावून ठेवले आहे. (कुटुंबदेखील पदरात...
ऑक्टोबर 03, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ आश्‍विन शु. चतुर्थी आजचा वार : गांधीवार! आजचा सुविचार : वैष्णव जन तो तेणे कहिये जे, पीड पराई जाणे रे..! ......................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) खरे तर ॐ महात्माय नम: अशी सुरवात करून डायरी लिहायला सुरवात करणार होतो. तशी...
ऑक्टोबर 02, 2019
मंत्रालयावर सूर्ययान स्थळ - मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक). वेळ - गुड नाइट टाइम! प्रसंग - अत्यंत ऐतिहासिक पात्रे - महाराष्ट्र हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि युवराज चि. विक्रमादित्य * * * विक्रमादित्य - (वाघासारखी एण्ट्री घेत) व्हा ऽऽ ऊ!!! उधोजीसाहेब - (प्राणांतिक दचकून) केवढा दचकलो मी! बाप रे,...
ऑक्टोबर 01, 2019
दादू : (फोन फिरवत) ट्रिंग ट्रिंग..! सदू : (कोरडेपणाने) बोल दादूराया! दादू : (च्याट पडत) नुसत्या रिंगवरून ओळखतोस! कमालचै तुझी!! सदू : (त्रयस्थपणे) उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्याचं काम सोडून शिळोप्याचे फोन का करतोयस? दादू : का? तुला नाहीत वाटतं निवडणुकीची कामं? सदू : (एक पॉज घेत) लौकरच कळेल! दादू...
सप्टेंबर 30, 2019
प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत काळजीपोटी पत्र लिहीत आहे. तुमची पाठ धरली असल्याचे नुकतेच कळले. पाठदुखीचा त्रास किती वाईट असतो, हे मला ठाऊक आहे. मागल्या खेपेला माझी पाठ अशीच धरल्यामुळे जेरीला आलो होतो. तेव्हा काही उपाय करून पाहिले होते, ते तुम्हालाही सुचवावेत, म्हणून हा...
सप्टेंबर 28, 2019
काय वानू कागा। तुझे कवतिक। तू गा अमोलिक। पक्षीराज। बुद्धीचे चापल्य। आणि चतुराई। गुण तुझ्या ठाई। छत्तीस की।। पक्षिणीचा सुस्वरु। नाही तुझ्या गळा। रंग तुझा काळा। कुळकुळीत।। जटायुचा धर्म। गरुडाची झेप। यांच्या स्टोऱ्या खूप। तुझ्या नाही।। गरुड उड्डाणे। जाहाले शहाणे। कावळ्याने म्हणे। उडू नये?।। तुझ्या...
सप्टेंबर 27, 2019
बेटा : (धडाकेबाज एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! आयॅम बॅक, मम्मा!! मम्मामॅडम : (तडफेने कागदपत्रे हातावेगळी करत) ओके! नेऽऽक्‍स्ट! बेटा : नेक्‍स्ट काय? आणखी कोण येणार आहे? मम्मामॅडम : (भानावर येत) तू होय! मला वाटलं व्हिजिटर आहेत कोणीतरी!! हल्ली फार काम पडतं नं मला!! सारखं कुणी ना कुणी भेटायला येत असतं किंवा...
सप्टेंबर 26, 2019
भारताचे परममित्र श्रीमान ट्रम्पतात्या आणि भारताचे फादर श्रीमान नमोजी यांच्यात बंद दाराआड चाललेल्या संवादात अनेक प्रश्‍नांचा ऊहापोह करण्यात आला. या मित्र-भेटीचा तपशील सर्वांना ठाऊक नाही, कारण सदर संवाद बंद दाराआड झाला, हे वर सांगण्यात आले आहेच. तथापि, आम्ही तेथे उपस्थित असल्यामुळे आम्हाला ही चर्चा...
सप्टेंबर 25, 2019
सप्तसागर, सप्तखंड ओलांडून झेलम आणि चिनाबच्या तीरावर राहुटी ठोकून बसलेला मॅसेडॉनचा महायोद्धा, वृद्ध झालेल्या आपल्या अजेय अश्‍वाच्या पाठीवर दणकट थाप मारत म्हणाला : ‘‘मित्रा ब्युसेफालस, वसुंधरेला गवसणी घालण्याचं स्वप्न आता जवळ जवळ पूर्ण झालं! जग जिंकत जिंकत इथवर येताना काय नाही पाहिलं? अंभीराजाची लोचट...
सप्टेंबर 24, 2019
‘हौडी मोदी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ह्यूस्टन येथील एनार्जी स्टेडियमच्या ब्याकस्टेजला उभे होतो. आमचे एकमेव तारणहार आणि विश्‍वगुरू श्रीमान मोदीजी यांची एण्ट्री होण्यास थोडा काळ बाकी होता. भरगच्च स्टेडियमला सामोरे जाण्यापूर्वी आपण एण्ट्री कशी घ्यावी, याचा सल्ला मोदीजी आम्हाला विचारीत होते....
सप्टेंबर 23, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : ‘रात्रीस खेळ चाले’...नंतरची. प्रसंग : भयंकर उत्सुकतेचा. पात्रे : महाराष्ट्राचे तारणहार मा. उधोजीमहाराज           आणि सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई महाराज. ............................ उधोजीराजे : (बंद दाराकडे पाहून खाकरत)  अह...अह...खक...खक! कमळाबाई : (बंद...