एकूण 38 परिणाम
जून 14, 2019
वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की मराठीमध्ये लिखतो आहे, कारण ही जुबान महाराष्ट्रातल्या अनेक मराठी अवामलाही बदन येत नाही, असे मालूम पडले आहे. (खुलासा : ‘धड’ ह्या लब्जचा अर्थ ऊर्दू-मराठी डिक्‍...
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जून 05, 2019
प्रिय नानासाहेब यांसी, अवांतर बडबड करण्याची आम्हाला सवय नाही. थेट मुद्यावर आलेले बरे असते. राज्यातील निवडणुका तोंडाशी आल्या नसल्या तरी तशा टप्प्यातच आल्या आहेत. (हे म्हंजे सैपाकघरात तळणीला टाकलेल्या बटाटेवड्याच्या वासाने दिवाणखान्यातल्या पाहुण्यांना हैराण करण्यापैकी आहे! असो!!) मुद्दा एवढाच, की...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मे 04, 2019
नेमकी तीथ सांगू? विकारी संवत्सरातील चैत्रात कृष्णपक्षातली द्वादशी होती. अगदी टळटळीत दुपार. उन्हे मी म्हणत होती. सूर्य आग ओकत होता...कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड! मोठी नामी वस्ती!! राजियांचा गड हे तो पार्काडाचे हृदय. राजा बोले, पार्काड हाले!! पण द्वादशीचे दिशी मात्र गडावर सक्‍...
मार्च 11, 2019
इतिहास साक्षीदार आहे. तो नेहमी साक्षीदाराच्या पवित्र्यातच असतो. वास्तविक गडी चांगलाच पेंगुळलेला होता. रिकामपणी बसल्या बसल्या माणसाला डुलकी लागतेच. (हो की नाही?) पण धुडुमधडाड स्फोटाच्या आवाजाने इतिहास दचकून जागा जाहला, आणि सर्सावून बसला. सवयीने त्याने कागद खसकन ओढले आणि दौतीत बोरू बुडवोन तो सज्ज...
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
जानेवारी 04, 2019
नवे वर्ष पुणेकरांसाठी अनंत अडचणींचे वर्ष ठरणार, असे संकेत आम्ही आधीच दिले होते. त्याची पहिली चुणूक सक्‍तीच्या हेल्मेटसक्‍तीने मिळाली आहे. हेल्मेटसक्‍तीवर गेले वर्षभर (पुण्यात) बरीच डोकेफोड (पक्षी : चर्चा) झाली असली, तरी काही लोकांच्या डोक्‍यात अजूनही संभ्रम आहे, असे दिसते. हा संभ्रम अधिक वाढावा,...
डिसेंबर 11, 2018
कलियुगातील कमलपत्रावरील ही एक अस्पर्शित लोककथा. कुणीही कुणालाही कधीही न सांगितलेली. कुणीही कुणाकडून कधीही न ऐकलेली कुणीही कधीही कधीही (आजवर) न लिहिलेली अनमर्त्यनामे नगरीत एका असुराने आक्रमण करून थैमान घालून प्रजाजनांना केले ‘त्राहिमाम’ आरंभला एकच विध्वंस. गावाच्या वेशीवरील पर्वताच्या गुहेत राहून तो...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 13, 2018
बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं!  बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या!  मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!!  बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट...
ऑक्टोबर 09, 2018
तारेवर हेलकावे खात काही कावळे बसले होते. राजकीय सभा असणार, हे उघड होते. ‘‘आपण नेमके किती जण आहोत?’’ लकलकत्या डोळ्यांच्या कावळ्याने पहिला सवाल केला. वास्तविक त्याने एका डोळ्याने सगळी मोजदाद आधीच केली होती, पण उगीच खडा टाकून पाहिला इतकेच! ‘‘तेरा...तेरा आहोत!,’’ एक अनुभवी कावळा कावून म्हणाला, ‘‘कमी...
ऑक्टोबर 05, 2018
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : अंतिम युद्धाची. प्रसंग : समर! पात्रे : खणखणीत...आय मीन, राजाधिराज उधोजीमहाराज आणि त्यांचा कदीम सेवक मिलिंदोजी फर्जंद. .......................... उधोजीराजे : (त्वेषाने प्रविष्ट होत) कोण आहे रे तिकडे? मिलिंदोजी फर्जंद : (आरामशीर येत) बोला म्हाराज...काय...
सप्टेंबर 12, 2018
एक होता केकु. मोठा लोभस होता. खोडकर असला तरी केकु सगळ्यांना आवडायचा. ‘केकुऽऽ’ अशी हाक मारली की चटकन कान टवकारून बघायचा. नक्‍की कुठे बघायचा हे जाम कळायचे नाही. केकु जसजसा मोठा होत गेला, तसतसा अधिकाधिकच केकु झाला!! परप्रांतीय किंवा उपरा कुणी आला की केकुने त्याचा डासा काढलाच म्हणून समजा. घरी आलेले...
सप्टेंबर 01, 2018
उपरोक्‍त मथळा वाचून काही जणांच्या भिवया नुसत्याच वर जातील, काही जणांच्या तळपायाची आग मस्तकी पोहोचेल, तर काही जण आम्हांस भक्‍त म्हणोन हिणवतील. पण आम्ही काही बोलणार नाही. फक्‍त गालातल्या गालात मुस्करू. डोळे मिटून मान डोलावू आणि म्हणू- कशी केली गंमत! होय, नोटाबंदीचा फियास्को झाल्याची टीका सर्वत्र होत...
जुलै 31, 2018
‘हवे शुं करवानुं?,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे काही उत्तर नव्हते. हवे शुं करवानुं? अब क्‍या करें? आता काय करायचे? व्हाट्‌ टुडू?... वास्तविक हा सनातन आणि वैश्‍विक सवाल आहे. ह्या एका प्रश्‍नाचे उत्तर...
जुलै 12, 2018
(‘चांदोबा’ची गोष्ट...) एक आटपाट नगर होतं. तिथं एक लक्ष्मीदत्तनामक राजा राज्य करीत असे. सुवर्णवतीनामक त्याची लाडकी व एकमेव राणी होती. प्रजाजनांचं दुखलंखुपलं पाहावं, हवं ते उपलब्ध करून द्यावं, नाममात्र शुल्क घेऊन साऱ्या सोयीसुविधा द्याव्यात, हे त्याचं ब्रीद होतं. साहजिकच प्रजाजन सुखी होते. ‘तुम्ही...
जून 13, 2018
सांप्रतकाळी पगडी कोणीही घालत नाही, ह्याचे आम्हांस अपरंपार दु:ख होते. आम्ही वगळता कोणाच्याही शिरोभागावर हा दागिना हल्ली दिसत नाही. (पाहा : मजकुराखालील आमचे रुबाबदार चित्र..!) हे...हे...हे...सर्वथा गैर आहे. जगतातील अनेक प्रजाती कालौघात नष्ट जाहल्या. अनेक सत्ता उलथल्या. धुळीस मिळाल्या. तद्वत पगडी हे...
मे 31, 2018
मित्रांनो, आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. लोकशाही म्हंजे लोकांनी लोकांसाठी चालविलेली लोकांची शाही ! लोकशाही ही एक यंत्रणा असते. याचा अर्थ ती यंत्रावर अवलंबून असते. त्यांना ईव्हीएम यंत्रे असे म्हणतात. ईव्हीएम यंत्राचा शोध खूप वर्षांपूर्वी भारतातच कोणीतरी लावला. त्याच्या जनकाचे नाव मतदानासारखेच...
मे 11, 2018
गेली दोन वर्षे मी ह्या कपाटात पडून आहे. आसपास राहणाऱ्या कुर्त्यांशी कधी बोललो नाही. कोपऱ्यात पडलेल्या शालीकडे ढुंकूनही पाहिले नाही. शालीचा आगाऊपणा मला मुळीच आवडत नाही. तिने दोन-चारदा माझ्याशी संभाषण छेडण्याचा प्रयत्न केला. पण मी दुर्लक्ष केले. कुर्ता काय, शाल काय... माझे स्थान ह्यांच्यापेक्षा वरचे...