एकूण 23 परिणाम
जुलै 04, 2019
"मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्‍त करण्यासाठी, शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्‍त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी...मी पुन्हा येईन, माझ्या युवामित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी, माझ्या बळिराजाचे हात बळकट करण्यासाठी... मी पुन्हा येईन, ह्याच निर्धारात, ह्याच...
जून 20, 2019
सर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही नव्हेत. कडकीच्या काळात दिवस कसे काढावयाचे ह्याचे गुह्य आम्ही जाणून घेतले आहे. आमच्या दृष्टीने आर्थिक विवंचना संपुष्टात आली आहे. सांगावयास अतिशय आनंद...
एप्रिल 20, 2019
हे मौला, तू सोडव गा ही अवकाळाची गणिते अंधाऱ्या वाटेवरती तू पेटव ना ते पलिते भेगाळ भुईच्या पोटी दडलेले उष्ण उसासे माध्यान्ही कण्हते सृष्टी शेवटल्या श्‍वासासरिसे विहिरींचे सुकले कंठ वाऱ्याला नुरले त्राण माळावर निवडुंगाचे करिते का कुणि अवघ्राण? भेगांचे दूर नकाशे भूवरी कोण आखेल? शुष्काच्या साम्राज्याची...
एप्रिल 15, 2019
प्रति, मा. वनमंत्री, महाराष्ट्र राज्य,  प्रिय सुधीर्जी, सध्या मी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. (तुम्ही जरा कमीच व्यग्र आहात, हेही मला दिसते आहे! पण ते असो.) तुम्ही राज्याचे वनमंत्री असल्याने तुम्हाला तातडीने लिहीत आहे. ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये शिकाऱ्याने लावलेल्या तारांच्या सापळ्यात...
एप्रिल 10, 2019
कोणे एके काळी (पक्षी : महाभारत काळात) अज्ञातवासात हिंडत राहिलेल्या पांडवांना एकदा मार्गात कृष्णद्‌वैपायन व्यास महर्षी भेटले. नमस्कारादी सोपस्कारानंतर व्यासांनी त्यांना सांगितले, की असे लपतछपत कां फिरता? नजीकच एकचक्रानगरी म्हणून एक गाव आहे. तेथे एका गरीब ब्राह्मणाच्या घरी आश्रित म्हणून रहा. बरे पडेल...
एप्रिल 04, 2019
तीर्थस्वरूप अण्णासाहेबांना कोण ओळखत नाही? आयुष्यातली उणीपुरी पन्नास वर्षे ते जनसेवेत अगदी बुडून गेले आहेत. दारिद्य्र, अज्ञान आणि रोगराईने बुजबुजलेल्या समाजाला हात द्यावा आणि नशिबाच्या खातेऱ्यातून त्यांना कायमचे बाहेर काढावे, ह्या एकमेव उद्देशाने गेली पन्नास वर्षे ते झटत आहेत. गरिबी हटली पाहिजे,...
मार्च 16, 2019
बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!  मम्मामॅडम : (पेपर चाळण्यात मग्न) हं!  बेटा : (घाईघाईने) नुकताच केरळ आणि तामिळनाडूत जाऊन आलोय, म्हटलं!!  मम्मामॅडम : (पेपरवाचन सुरूच) हं हं!!  बेटा : (वैतागून) लुक ऍट मी! मेरी तरफ देखो! माझ्याकडे बघ तरी!!  मम्मामॅडम : (मागे वळून...
फेब्रुवारी 01, 2019
महाराष्ट्राचे (एकमेव) तारणहार श्रीरामभक्‍तसाहेब अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. अधूनमधून फोनच्या डबड्याकडे चमकून पाहत आहेत. खिशातला मोबाइल फोन काढून न्याहाळताहेत. अखिल महाराष्ट्र आज कुणाच्या बरे फोनची वाट पाहत आहे? दूरवर बेल वाजत राहते... ‘‘कोण आहे रे तिकडे? फोन उचला!,’’ साहेब ओरडले. तरीही फोन वाजतच...
जुलै 23, 2018
घाट वलांडुनी। आलो तुझ्या दारी।  वाहिली गा वारी। पायी तुझ्या।।  मारिली मजल। नच घेता श्‍वास।  गाठिली गा वेस । पंढरीची।।  आता विठुराया। देई गा आसरा।  लाविला धोसरा। केव्हाचा म्यां।।  औत नि अस्तुरी । ठेविली माघारी।  आलो तुझ्या दारी। टाकोटाक।।  नको झाला मज । येर भवताप।  लागली गा धाप। धाई धाई।।  नको तो...
जून 18, 2018
प्रिय सहकारी मा. श्री. चंदुदादा कोल्हापूरकरसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास आनंद होत आहे की मी आत्ताच अमेरिकेच्या वारीहून परतत आहे. कधी एकदा घरी येईन, असे झाले आहे. दहा दिवसांत होमसिक झालो! अमेरिकेहून विमानाने भारतात यायला खूप वेळ लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानाने हे अंतर काही तासांत काटता येईल...
जून 10, 2018
दोन वर्षांपूर्वी "गोइंग इन स्टाइल' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात तीन हीरो होते. तिघंही सत्तरीतले पेन्शनर. पेन्शनीतली बॅंकधार्जिणी दु:खं भोगून हवालदिल झालेले तीन म्हातारे पद्धतशीरपणे एक बॅंक लुटतात, त्याची ही धमाल कहाणी. याच नावाचा, याच कहाणीचा चित्रपट सन 1979 मध्ये येऊन गेला होता....
नोव्हेंबर 17, 2017
स्थळ : एक अज्ञात बंगला, मलबार हिल. वेळ : आता वाजले की बारा! काळ : घोरणारा! पात्रे : कोअर कमिटीची कमळ मेंबरे. फडणवीसनाना : (चिंताग्रस्त चेहऱ्यानं उसासा टाकत)...पंचवीस पाचा किती होतात हो? ुमुनगंटीवारजी : (मोबाइलमध्ये आकडेमोड करत) पंचवीस गुणिले पाच बरोबर....दोनशे पन्नास...
जुलै 08, 2017
मनाचिये गुंती। काळे नि पांढरे। त्याचे गंडेदोरे। आम्हापास।। लिंपियले घर। केले चिरेबंदी। पक्‍की नोटाबंदी। हवाप्रुफ।। तरीही दावू गा। अशी सांदीफट। धंदा तो चखोट। चालू ठेवा।। कैसे कर्ज घ्यावे। आणि बुडवावे। वर ओरडावे। बेंबीदेठ।। किंवा शहाजोग। बुडवावी बॅंक...
जून 28, 2017
आजची तिथी : हेमलंबी नाम संवत्सरे श्रीशके 1939 आषाढ शुक्‍ल चतुर्थी. आजचा वार : पारावार. आजचा सुविचार : द्यावे तुम्हा कर्ज। हाच माझा फर्ज। म्यां हि केला अर्ज। माफीसाठी।। -ह. भ. प. देवेंद्रबुवा. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे. रिफिल संपली...नवी आणणे...
जून 22, 2017
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बुद्रुक. वेळ : सुलह करण्याची. काळ : वेळ पाहण्याचा. प्रसंग : गोड! पात्रे : गोडच!! सालंकृत सौभाग्यवती कमळाबाई नटून थटून गवाक्षापाशी उभ्या आहेत. कुणाची तरी वाट पाहात आहेत! तेवढ्यात नेहमीप्रमाणे राजाधिराज उधोजीराजे प्रविष्ट होतात. अब आगे...
जून 08, 2017
सदरहू पाऊस हा खरा पाऊस नव्हे, सबब, तूर्त पडणाऱ्या सरींशी आम्ही चर्चा करणार नाही... खरा पाऊस असतो सायबेरियाहून येणाऱ्या फ्लेमिंगोसारखा...पाहुणा. तूर्त पडणाऱ्या पावसाच्या सरी शतप्रतिशत लोकल असून त्यांच्यामुळे रानात मोर रडतात, व त्यांस हकनाक पोरे होतात. ...हे पतन आहे, पर्जन्य नव्हे! तेव्हा, खऱ्या...
एप्रिल 28, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके 1938 वैशाख शुक्‍ल प्रतिपदा. आजचा वार : नमोवार...याने गुरुवार! आजचा सुविचार : इतुक्‍यात न येई वरणा!  नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) हे मी माझ्या खासगी डायरीत लिहितो आहे, पण जाहीर बोललो तर पुन्हा नागपूरला "विदर्भ एक्‍स्प्रेस'ने विनारिझर्वेशन जावे...
एप्रिल 10, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके 1939 चैत्र शुद्ध त्रयोदशी. आजचा वार : संडेवार. आजचा सुविचार : बोलणाऱ्याची माती खपते, न बोलणाराचे सोने पडून राहते! नमो नम: नमो नम: नमो नम: (105 वेळा लिहिणे) सकाळपासून चिक्‍कार फोन येताहेत. तुम्ही किती छान दिसता? किती छान बोलता? किती छान...
एप्रिल 06, 2017
प्रिय मित्र उधोजीसाहेब  यांसी शतप्रतिशत मुजरा. फारा दिवसांत गाठभेट नाही. बोलणेचालणेही नाही. (तुमचा फोन बंद लागतो आहे...) प्रारंभी वाटलं, महापालिका निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी आपण सहकुटुंब परदेशी (फोटो काढण्यासाठी) गेला असाल. किंवा नवीन घराच्या बांधकामात सिमेंट-वाळूच्या ढिगाऱ्यातून फिरत असाल. म्हटले...
मार्च 18, 2017
(राजाधिराज उधोजीराजे अंत:पुरात अस्वस्थपणे येरझारा घालीत आहेत. मधूनच तलवारीचे हवेत हात करतात. ‘बघतोच तुला आता!’, ‘अरे मी दोर कधीच कापून टाकलेत!’ ऐशा घोषणा करत कुण्या अदृश्‍य गनिमावर चालून जात आहेत. मध्येच स्टुलावर मटकन बसून ‘अहह! काय हा शाप!’ असे विव्हल उद्‌गार काढत आहेत. अब आगे...) उधोजीराजे : (खोल...