एकूण 27 परिणाम
मे 31, 2019
आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत...
एप्रिल 23, 2019
तुम्हाला सांगायला हरकत नाही, परवा नाक्‍यावर भेटला बार्ड! कटिंग पीत बसला होता निर्ममपणे रहदारी पाहात ...पुढे केलं व्हिजिटिंग कार्ड! मला पाहताच चपापला, उगीच थोडा ओशाळला, ‘गुड मॉर्निग’ घातला, तर ओठांवर हसू आणत किंचितसा मिशाळला... खुर्चीखाली पाय हलवत (बुटकाच होता तसा) म्हणाला साहेबी तोऱ्यात, ‘‘गुड...
मार्च 01, 2019
आमचे आध्यात्मिक तारणहार इम्रानखांसाहेब औलिया ह्यांची कदमबोसी करून, मत्था टेकूनच आम्ही येथे आलो आहो! नुकतीच आमची औलियासाहेबांशी मुलाकात झाली. तो एक दैवी अनुभव होता, येवढेच आम्ही तूर्त म्हणू. बाबा, औलिया आदी लोगांना गाठून त्यांचा अनुग्रह मिळवण्याचा आम्हाला जबर्दस्त शौक आहे. तसे आम्ही अनेक बाबालोग...
जानेवारी 03, 2019
प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांची ९५ मिनिटांची म्यारेथॉन मुलाखत सवासो करोड जनतेने टीव्हीस नाक लावून पाहून घेतली. वास्तविक मुलाखतीची घोषणा झाली, तेव्हा पोटात केवढा गोळा आला होता; पण सुदैवाने कोठलीही अनर्थकारी घोषणा मुलाखतीदरम्यान झाली नाही. सदर ९५ मिनिटांच्या मुलाखतीत प्रधानसेवकांनी जनतेच्या मनातील...
डिसेंबर 08, 2018
वनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी ठरल्याप्रमाणे व अपेक्षेनुसार टी-वन ऊर्फ अवनी वाघिणीचा खून झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिला असून, सदर खून करणाऱ्या मारेकऱ्यास ऊर्फ...
नोव्हेंबर 22, 2018
‘‘फॉ...फॉ..फ्वॉ..,’’ आम आदमी म्हणाला. ‘‘का?..क्‍वॉ..?’’ आम्ही विचारले. ‘‘...पण डोळ्यात डायरेक्‍ट मिरचीची पूड फेकणं योग्य आहे फ्वॉ?,’’ रडवेल्या आवाजात आम आदमीने आम्हाला विचारले आणि आमचे काळीज गलबललेच. हे खरेच होते. माणसाने आपला निषेध व्यक्‍त करावा, पण असा? छे, भलतेच! शिवाय मिरचीची पूड हा सैपाकघरातला...
नोव्हेंबर 17, 2018
मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या अथवा पाहिल्या (अथवा वाचल्या) असतील. स्वातंत्र्योत्तर काळात अशा किमान दीडेक हजार प्रकारच्या वाचवा मोहिमा निघाल्या, त्यातील काही वाचल्या, म्हंजे यशस्वी...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
ऑगस्ट 08, 2018
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम:..रोज हा मंत्र १०८ वेळा लिहिण्याचा संकल्प आहे. तथापि, आज त्याची गरज नाही. कारण आज भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन जाहले. एक सोडून दोन-दोन भगवंत !! किती कृतकृत्य वाटते आहे !! आजचा दिवस सुवर्णाच्या (सोनियाच्या नव्हे !) अक्षरात लिहून ठेवावा असा आहे. ज्या दोघा दैवतांची आयुष्यभर...
जून 15, 2018
तसे पाहू गेल्यास आमच्यासारखे हरहमेशा चिंतनात बुडालेले आध्यात्मिक लोक प्राय: बैठ्या प्रकृतीचेच असतात. विश्‍वाची चिंता करणे हे तितकेसे सोपे नसते. पण आम्ही त्यात महारथ हासिल केली. त्यासाठी कष्ट उपसले. बालपणी आम्ही ह्या कामासाठी फडताळात जाऊन बसत असू. परंतु फडताळात झुरळांनी उच्छाद मांडल्याने ती जागा...
जून 05, 2018
‘बहूनि मे व्यतीतानि, जन्मानि तवचार्जुन:। तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परमतप:।।’ श्‍लोकार्थ : भगवद्‌गीतेतील वरील श्‍लोक सर्वांना माहीत असेलच. त्याचा एक ‘सुबोध’ अर्थ असा की ‘अरे पार्था, परमतपा, माझा जन्म मे महिन्यातला असून तू चार जूनचा आहेस. मी तुझ्यापेक्षा थोडा मोठा आहे हे उघड असल्याने माझा...
जून 02, 2018
आभाळाला फुटतो पान्हा ओठिं उन्हाच्या उष्ण झळा मांडीवरच्या तान्ह्यासाठी पाणवठ्याला तीव्र कळा कढईमध्ये जीवित फुटते भवतालाची फुटे शेगडी मरुभूमीतील मुसाफिराची स्वप्ने हिरवी आणि बेगडी उन्हे वितळली रस्त्यांमधुनी आयुष्याचे होते डांबर पिपात रटरट सडकेवरती उन्हे ओतते निर्दय अंबर काळोखाच्या विहिरींमधुनी...
एप्रिल 24, 2018
बलात्कारांच्या बातम्यांनी, अत्याचारांच्या अफवांनी मागण्यांच्या मोर्च्यांनी दगडफेक्‍यांच्या दंगलींनी बडबोल्यांच्या बातांनी थापाड्यांच्या थापांनी बापजाद्यांच्या बापांनी उबून गेला कुणी एक, त्याचा अखेर फुटलाच बांध... आभाळाकडे हात उभारुन वाकडे बोट रोखून ओरडला तो खच्चून- ‘‘अरे, तुझ्या काळरात्रीला नाहीच...
एप्रिल 03, 2018
‘‘हा  अन्याय आहे अन्याय!... सरकारच्या नालायकीची शिक्षा विद्यार्थ्यांनी का भोगायची अं?,’’ राजियांनी चवताळून सवाल केला. सारी बैठक स्तंभित झाली. बैठकीच्या खोलीत परीक्षा हॉलमध्ये पसरावा, तसा सन्नाटा पसरला. राजियांचे खरेच होते. वर्षभर मेहनत करून मुलांनी गणिते सोडवावीत आणि पेपरला बसल्यानंतर कळावे की पेपर...
मार्च 20, 2018
""ठरलं म्हंजे ठरलं, आमचा संकल्प ठरला!,'' गर्रकन मान वळवत सर्रकन तलवार उपसत भर्रकन वळत राजे म्हणाले, तेव्हा आमचा चेहरा खर्रकन उतरला. राजियांचा संकल्प म्हंजे काळ्या फत्तरावरील रेघ. आता माघारी वळणे नाही. राजियांच्या मुखातील बोल, म्हंजे देवावरचे फूल. खालतें पडता उपेगाचे नाही. ""आपण फक्‍त आज्ञा...
फेब्रुवारी 19, 2018
स्थळ : कमळ महाल, खाजगीकडील दालन!  वेळ : बिकट.  प्रसंग : कष्टप्रद.  पात्रे : चि. सौ. कमळाबाई आणि...आम्ही!!  भर्जरी पैठणी आणि शालूअवगुंठित सौ. कमळाबाई एकट्याच बसल्या होत्या. चिंतातुर होत्या, अस्वस्थ होत्या. येरझारा घातल्याने त्यांना हल्ली दम फार लागतो. वजन कमी करा, असे डागतरांनी सांगितले आहे, पण...
फेब्रुवारी 17, 2018
महाराष्ट्राचे तारणहार श्रीमान उधोजीसाहेब ह्यांची आणि कारभारी पंत फडणवीसनाना ह्यांची फाल्गुन मासारंभाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक भेट झाली. किंबहुना, ह्याच प्रहरापासून औंदाचा फाल्गुन मास सुरू जाहला, असे म्हटले तरी चालेल! अवघ्या पंधरा मिनिटांची भेट!!! परंतु तीत महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा कंद...
फेब्रुवारी 13, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) सदू : (फोनची चहाटळ सुरवात) म्यांव म्यांव..! दादू : (संयम राखून) बोला! फोन आमच्या मावशीला देऊ का? सदू : (नेहमीच्या चिडचिड्या खर्जात) कोण मावशी? दादू : (ठामपणे) आमची मावशी! तुम्ही म्यांव म्यांव केलंत, मला वाटलं आमच्या मनीमावशीचा कॉल असणार!..आमची मावशी अशीच म्यांव म्यांव करते...
जानेवारी 17, 2018
मम्मामॅडम : (अत्यंत दिलखुलास एण्ट्री घेत)...लो मैं आ गई बेटा! पं. राहुलकुमार : (विनयशीलतेनं) पधारो माई...हे आपलंच घर नाही का? मम्मामॅडम : (खुशीत बॅग खाली टाकत) हुश्‍श!! इतकं बरं वाटतंय ना हल्ली!! तुझ्याकडे सगळा कारभार दिला आणि मी कशी मोकळी झाले!! पं. राहुलकुमार : (डोळे मिटून) प्रवासाने दमून आली...
जानेवारी 06, 2018
(मामुंच्या डायरीचे पान) आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९३९ पौष कृ. चतुर्थी.आजचा वार : आभार देवा आज शुक्रवार!आजचा सुविचार : सुवर्णकाराचेनि मुशी। कांचन पडिले फशी। तेव्हाच शोभे ठुशी। गळ्यामाजी!! - संतकवी नाना. (अर्थ : सुवर्णकाराच्या मुशीत तावून सुलाखून निघालेल्या सोन्याचीच ठुशी नावाचा अलंकार...