एकूण 25 परिणाम
मे 06, 2019
रोम, दिनांक (माहीत नाही) वार (माहीत नाही) : गेले तीन-चार दिवस रोमच्या रस्त्यांवरून हिंडतो आहे. महाराष्ट्रातील मतदान आटोपून तडक विमानात बसून सहकुटुंब इटलीला रवाना झालो. मनात म्हटले, संपली आमची निवडणूक! आता काय तो गोंधळ घाला!! नाही म्हटले तरी प्रचारात भयंकर दगदग झाली होती. महाराष्ट्रातील उन्हापासून...
फेब्रुवारी 14, 2019
निरंगी अंधारातील वाटचालीतच कुठल्यातरी अनवट पावलाशी तुला विचारला होता अनंगाचा अन्वयार्थ, तेव्हा सारी लकब पणाला लावून तू फक्‍त हसली होतीस आणि दाखवले होतेस बोट, अलांछन चंद्रबिंबाकडे बिनदिक्‍कत. अनाकार तिमिरघनासारखी उलगडत, मिटत निघून गेलीस, अदृश्‍य झालीस वळणावरती मी मात्र एकटा मोजतो आहे मागे पडणारे...
जानेवारी 31, 2019
नुकतेच ऐकिवात आले की-  कळिकाळाला न डरणारे  क्रांतीची ठिणगी पोटात सामावलेले  जुलूमशाहीच्या चिंधड्या उडवणारे  एक ज्वालाग्राही स्फोटक  क्रांतिकारकांच्या हाती गावले...  सत्तांधांच्या सिंहासनांखाली  पेरलेल्या ह्या स्फोटकाचे  दुष्परिणाम अटळ आहेत.  ह्या स्फोटकाला दर्प आहे,  श्रमिकांच्या घामाचा.  ह्या...
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
जुलै 24, 2018
मिठी हा शब्द उच्चारताच आम्ही गुदमरून जातो. ती उत्स्फूर्त गळाभेट आठवून अंग महिरते. हे हृदयीचे तें हृदयी डेटा ट्रान्स्फर होतो. जिवाशिवाची गाठ पडत्ये. एक अननुभूत थरार देहातून दौडत जातो. हल्लीची समाजमाध्यमे मिठी या विषयाला इतके कवटाळून कां बसली आहेत? हे आम्हाला पडलेले कोडे आहे. मिठी हा विषय संपूर्णत:...
जुलै 22, 2018
नवी दिल्ली - कुमार जागतिक अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत फ्री-स्टाईल प्रकारातही भारतीय मल्लांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. नवीन (५७ किलो), विशाल कालीराम (७०), सचिन गिरी (७९) यांना रौप्य, तर करणला (६५ किलो) ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. विशालने सुरवातीला चीन आणि जपानच्या मल्लांवर आकर्षक विजय...
जुलै 03, 2018
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका ह्यापुढे होणार नाहीत, ही खबर आल्यावर आमच्या मस्तकावर शिळा कोसळली आहे, हृदय शतश: विदीर्ण झाले आहे, मन फाटून गेले आहे!! नियतीने हा काय खेळ चालवला आहे? गेली ९१ संमेलने निवडणुकांसहित विनासायास पार पडली. सेंच्युरीला अवघी आठ संमेलने बाकी...
जून 13, 2018
सांप्रतकाळी पगडी कोणीही घालत नाही, ह्याचे आम्हांस अपरंपार दु:ख होते. आम्ही वगळता कोणाच्याही शिरोभागावर हा दागिना हल्ली दिसत नाही. (पाहा : मजकुराखालील आमचे रुबाबदार चित्र..!) हे...हे...हे...सर्वथा गैर आहे. जगतातील अनेक प्रजाती कालौघात नष्ट जाहल्या. अनेक सत्ता उलथल्या. धुळीस मिळाल्या. तद्वत पगडी हे...
मे 09, 2018
करनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो. विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला...
एप्रिल 09, 2018
सदरील कथेशी प्राचीन बोधकथा लेखक इसापशी काहीही संबंध नाही. हा इ-साप हा इ-मेलच्या जमान्यातला आहे व त्याने लिहिलेली कथा ही बोधकथा नसून इ-कथा आहे. इ-कथा म्हंजे एखादी कथा वाचल्यावर वाचकाला ‘ईऽऽऽ’ असे ओरडावेसे वाटेल ती कथा! अशी एक इ-कथा आमच्या वाचनात आली. तीच येथे सांगत आहो. आता ऐकाच! : जेहेत्ते कालाचे...
मार्च 20, 2018
""ठरलं म्हंजे ठरलं, आमचा संकल्प ठरला!,'' गर्रकन मान वळवत सर्रकन तलवार उपसत भर्रकन वळत राजे म्हणाले, तेव्हा आमचा चेहरा खर्रकन उतरला. राजियांचा संकल्प म्हंजे काळ्या फत्तरावरील रेघ. आता माघारी वळणे नाही. राजियांच्या मुखातील बोल, म्हंजे देवावरचे फूल. खालतें पडता उपेगाचे नाही. ""आपण फक्‍त आज्ञा...
मार्च 14, 2018
आदरणीय मा. ना. गडकरीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. माझे नाव विठोबा आठबावनकर असे असून, माझी उभी हयात डोंबिवलीतच गेली असून, एमायडीसीची हद्द ही आमची राष्ट्रीय सरहद्द आहे. (पलीकडल्या भूभागाला आम्ही डोंबिवली मानत नाही!) आख्खे गाव मला ‘बडा फास्ट’ या नावाने ओळखते. (खुलासा : आठ बावन ही ‘बडा फास्ट’ म्हणून मराठी...
मार्च 10, 2018
भर माध्यान्हाच्या उन्हात तप्त झाली होती रोमच्या चौकातील काळीशार फरसबंदी, इतस्तत: सांडला होता उग्र, प्रज्वल, प्रच्छन्न संताप... त्या भयाण झळांचा झोत अंगावर घेत सम्राट कॉन्स्टण्टाइनने उभवली तलवार आणि रोखले टोक धारदारपणे चौकाच्या मध्यभागी उभ्या असलेल्या पुतळ्याकडे... गळ्याच्या शिरा ताणत ओरडला तो :...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...
जानेवारी 04, 2018
भिंतीवरील कभिन्न सावलीप्रमाणे वाकून ऑथेल्लो ओरडला दु:खभराने... "पुट आऊट द लाइट, अँड देन पुट आऊट द लाइट! विझवू दे मला आधी हा दिवा, मग मालवू दे ही शांतपणे तेवणारी मंद ज्योत... माझ्या निरागस डेस्डेमोनाची... हे कृत्य शक्‍य आहे, फक्‍त अज्ञाताच्या काळोखातच. तेव्हा काळोख करा रे आधी कुणीतरी!'' बंद करा......
ऑगस्ट 30, 2017
गेले दोन महिने देशभर डोकलाम डोकलाम अशी आरडाओरड चालू असताना आम्ही शांतपणे हाक्‍का नूडल खात बसलो होतो, ह्याचे कोणालाही आश्‍चर्य वाटेल. पण आम्ही निश्‍चिंत होतो. कारण एक दिवस हे भांडण आम्हालाच सोडवावे लागणार, ह्याची खात्री होती. तसेच घडले. चीन आणि भारत ह्यांच्यातील भांडणाचे प्रमुख कारण काड्या हे आहे...
जुलै 15, 2017
काही थोर (पक्षी : पुण्याच्या) शास्त्रज्ञांनी अवकाशातील सुदूर दीर्घिकासमूहांचा शोध लावला असून तिचे नामकरण "सरस्वती' असे केल्याचे वृत्त वाचकांच्या वाचनात आले असेलच. सदर कामगिरीबद्‌दल आम्ही आमच्या सर्व खगोल संशोधकांचे हार्दिक अभिनंदन करतो, तसेच ज्यांच्यामुळे हा शोध लावण्यात अपरंपार मदत झाली त्या...
एप्रिल 04, 2017
मतदान यंत्रात काहीतरी घोटाळा असल्याचे धादांत खोटे, मनघडंद आणि बेछूट आरोप करणाऱ्या नतद्रष्ट पक्षांचा शतप्रतिशत निषेध करुनच आम्ही सदरील मजकूर लिहावयास घेतला आहे. मतदान यंत्रात कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही आणि होणारही नाही. किंबहुना हे यंत्र संपूर्णत: घोटाळाप्रूफ आहे, ह्याबद्दल आमच्या मनात आता...
एप्रिल 03, 2017
(एक ऐतिहासिक नाट्यप्रवेश...)  स्थळ : अर्थात मातोश्री महालाचा सेट, वांद्रे संस्थान.  वेळ : साधारणत: "खुलता कळी खुलेना' संपल्यावर.  काळ : भोजनोत्तर.  प्रसंग : बांका...आणि नाट्यपूर्ण  पात्रे : सांगायला पाह्यजे? आपले नेहमीचेच यशस्वी कलाकार!!  (अंक तिसरा, प्रवेश शेवटून तिसरा : राजाधिराज उधोजीराजांचा...
मार्च 10, 2017
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांस शतप्रतिशत नमस्कार.  सर्वप्रथम महिला दिनाच्या शुभेच्छा. महिला दिनाचा पवित्र मुहूर्त साधून आपण मुंबई महापालिकेत येऊन गेलात असे कळले. पालिका सभागृह ते मलबार हिल अंतर काही फार नाही. चहाला आला असतात तर बरे झाले असते. पण आता राहू दे. महापालिकेत जाऊन आपण आपल्या डोळ्यांदेखत...