एकूण 40 परिणाम
जून 10, 2019
हे करुणाकरा, तू आहेस का?  आणि असलास, तर कुठे आहेस?  दीडवितीच्या ह्या दीडशहाण्या  दुनियेत दीडदमड्यांसाठी  दीडदोन वर्षांच्या लहानग्यांच्या  मुरगळणाऱ्या,  नकोश्‍या अर्भकांना जन्मताच  बादलीत बुडवणाऱ्या,  येणाऱ्या पिढ्यांची जागीच खुडणी  करू पाहणाऱ्या  ह्या...ह्या...ह्या...महान देशात  जेव्हा दहाएक...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
एप्रिल 12, 2019
प्रिय संकटमोचक गिरीशभौ, काल रात्रीपासून तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. स्विच ऑफ येतो आहे. अंमळनेरात प्रताप मिल कंपाऊण्डमध्ये झालेल्या इलेक्‍शनच्या सभेत घडलेल्या प्रकाराने तोंडचे पाणी पळाले आहे. तिथे जोरदार मारामारी झाली असे दिसते! टीव्हीवर पाहिले. मंचावर बसलेले कोण आणि मंचाच्या खाली...
एप्रिल 11, 2019
सां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला...
मार्च 29, 2019
(एक लघु विज्ञानकथा) स्थळ : टेम्पे टेरा क्षेत्र, ऑलिम्पस मॉन्स ज्वालामुखीच्या मागे, मंगळ ग्रह. वेळ : पृथ्वी प्रमाण वेळेनुसार सकाळी पावणेबारा ते बारा. प्रसंग : तणावपूर्ण. पात्रे : मंगळवासी. प्रधानसेवक इडोम अर्दनेरान आपल्या वातावरणानुकूलित कक्षात बसून होते. ते विश्‍वाचे चिंतन करीत आहेत, असे द्वाराशी...
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
मार्च 13, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाहेब यांना म. पो. ह. बबन फुलपगार (कदकाठी ५ फू. सहा इं, उमर सव्वीस, कमर सव्वीस, छाती सव्वीस, फुगवून सव्वीस) ह्याचा सलाम. लेटर लिहिनेस कारन का की सध्या महाराष्ट्रे राज्यात इलेक्‍शनचे वातावरन असून माहौल टाइट होत असून, सर्व पक्षांमध्ये उलाढाली चालू आहेत, असे एका खबरीने आपल्याला...
मार्च 11, 2019
इतिहास साक्षीदार आहे. तो नेहमी साक्षीदाराच्या पवित्र्यातच असतो. वास्तविक गडी चांगलाच पेंगुळलेला होता. रिकामपणी बसल्या बसल्या माणसाला डुलकी लागतेच. (हो की नाही?) पण धुडुमधडाड स्फोटाच्या आवाजाने इतिहास दचकून जागा जाहला, आणि सर्सावून बसला. सवयीने त्याने कागद खसकन ओढले आणि दौतीत बोरू बुडवोन तो सज्ज...
फेब्रुवारी 23, 2019
एक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य! मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता...
फेब्रुवारी 08, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया. आजचा वार : अनिवार. आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार. ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल राळेगणला जाऊन आलो. सगळा दिवस तिथेच गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय...
जानेवारी 26, 2019
नि वडणूकपूर्व सर्व्हे ह्या विषयावर गहन भाष्य करण्यासाठी आम्ही आज बसलो आहो! (म्हंजे तसेही बसलेलोच असतो, असे कुणी खवचटपणे म्हणेल, पण आम्ही दुर्लक्ष करून बसू!! असो.) निवडणूकपूर्व सर्व्हे आणि निवडणुकीचे अंदाज हा नव्या सहस्त्रकातील लोकशाहीचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व्हेशिवाय इलेक्‍...
जानेवारी 03, 2019
प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांची ९५ मिनिटांची म्यारेथॉन मुलाखत सवासो करोड जनतेने टीव्हीस नाक लावून पाहून घेतली. वास्तविक मुलाखतीची घोषणा झाली, तेव्हा पोटात केवढा गोळा आला होता; पण सुदैवाने कोठलीही अनर्थकारी घोषणा मुलाखतीदरम्यान झाली नाही. सदर ९५ मिनिटांच्या मुलाखतीत प्रधानसेवकांनी जनतेच्या मनातील...
जानेवारी 02, 2019
(खुले पत्र) मा. उधोजीसाहेब, प्रणाम. (शतप्रतिशत हा शब्द तूर्त टाळतो आहो!) आपल्या कृपाशीर्वादाने आमचा कारभार उत्तम चालला असून, आपला महाराष्ट्र सध्या प्रगती करतो आहे. (संदर्भ : टीव्हीवरील जाहिराती) तुमच्या करड्या नजरेखाली काटेकोर कारभार सुरू आहे, हे तुम्हाला कळले असेलच. कारण आमच्या कारभारी मंडळात...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
नोव्हेंबर 16, 2018
गेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या गडबडीत राजकारण आणि समाजकारणाकडे अंमळ दुर्लक्ष झाले; परंतु या पुढे आम्ही यथास्थित लक्ष देऊ. गेले काही महिने सदर मंगलकार्याचे आम्हाला प्रचंड टेन्शन होते....
नोव्हेंबर 13, 2018
बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (टीव्हीवरल्या बातम्या बघण्यात मग्न) हं!  बेटा : (टीव्हीकडे तुच्छतेनं नजर टाकत) काय बघतेस त्या बंडल बातम्या!  मम्मा मॅडम : (समजूतदार सुरात) बघाव्यात... चांगलं असतं! जगात काय चाललंय, ते कळतं!!  बेटा : (अभिमानानं) जी गोष्ट...
ऑक्टोबर 09, 2018
तारेवर हेलकावे खात काही कावळे बसले होते. राजकीय सभा असणार, हे उघड होते. ‘‘आपण नेमके किती जण आहोत?’’ लकलकत्या डोळ्यांच्या कावळ्याने पहिला सवाल केला. वास्तविक त्याने एका डोळ्याने सगळी मोजदाद आधीच केली होती, पण उगीच खडा टाकून पाहिला इतकेच! ‘‘तेरा...तेरा आहोत!,’’ एक अनुभवी कावळा कावून म्हणाला, ‘‘कमी...
सप्टेंबर 25, 2018
माध्यान्हीच्या सुमाराला अखेरची आरती झाल्यावर मांडवातून (एकदाची) हललेली मूर्ती गल्लीच्या तोंडाशीच थांबली प्रहरभर, कारण श्रींच्या निरोपाला येणाऱ्या मंत्रिमहोदयांना झाला (थोडासाच) उशीर भयंकर महत्त्वाच्या कामामुळे. ‘‘पुढच्या वर्षी लौकर या!.’’ असे बाप्पाआधी मंत्रिमहोदयांना सांगायला हवे, अशी खूणगाठ बांधत...
सप्टेंबर 20, 2018
सुधीर्जी मुनगंटीवार्जी, वित्तमंत्री, महाराष्ट्र राज्य विषय : राज्याच्या तिजोरीचा हालहवाल. महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याची आर्थिक पडझड झाल्याच्या बातम्या सर्वत्र ऐकू येत आहेत, परवापासून मी टीव्ही लावू शकलेलो नाही. सतत त्याच बातम्या दिसतात. झोप उडाली आहे! ह्या बातम्यांमध्ये कितपत तथ्य आहे? कृपया...