एकूण 95 परिणाम
जून 22, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे. आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।। ............................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार...
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जून 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : ठरलेली! काळ : ठहरलेला! प्रसंग : गोठलेला. पात्रे : सौभाग्यलंकारमंडित वज्रचूडेमंडित सौभाग्यवती कमळाबाईसाहेब आणि साक्षात राजाधिराज उधोजी महाराज! ............... (बाईसाहेबांच्या अंत:पुरात गडबड उडाली आहे. झोपाळ्यावर टेचात बसून बाईसाहेब भराभरा फर्माने रवाना...
मे 23, 2019
"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. "आमच्याऐवजी...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 09, 2019
डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा...
एप्रिल 30, 2019
सलाम, सलाम सबको सलाम, लोकशाहीच्या रक्षणकर्त्यांनो, एक हात जागच्या जागी ठेवून उजव्या हाताने सलाम! मतदान करणाऱ्यांना सलाम मतदान न करणाऱ्यांनाही सलाम एकदाच मतदान करणाऱ्यांना सलाम, दोन-तीनदा मतदान करणाऱ्या लोकशाहीच्या पाईकांना तर आपला कडकडीत सलाम तडाखेबंद व्हिडिओबाजी करणाऱ्यांना सलाम व्हिडिओबाजीची  ...
एप्रिल 08, 2019
नेमकी तीथ सांगावयाची तर विकारीनाम संवत्सरे श्रीशके 1941 चैत्र शुद्ध प्रतिपदा. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्रीखंडाचे यथेच्छ जेऊन तेथल्या तेथे आडवारलेल्या इतिहास पुरुषाला अंमळ डोळा लागत असतानाच अचानक भूकंप जाहल्याप्रमाणे सकल प्रिथिमी आंदोळिली. उत्तर ध्रुवापासोन दक्षिण ध्रुवापरेंत कडाकडा भूमी दुभंगोन...
एप्रिल 06, 2019
सांप्रतकाळी इये देशी इलेक्‍शनप्रीत्यर्थ मुलाखतीचे पेव फुटले असून, आमच्यासारख्या दाखलेबाज मुलाखतकाराला फुर्सत म्हणून उरलेली नाही. सध्या आम्ही इतक्‍या मुलाखती घेऊन ऱ्हायलो आहोत की आमच्यावर जळ जळ जळून काही (पुण्यातल्या) नामवंत मुलाखतकारांनी (पक्षी : सुधीर्जी गाडगीळ) आमच्याशी सध्या बोलणेच टाकले आहे. पण...
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
मार्च 06, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ वद्य चतुर्दशी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा सुविचार : प्रयागतीर्थावरी। घेऊनि गंगेमध्ये बुडी। झाली धन्य कुडी। महाराष्ट्राची!! ........................... ।।श्री।। नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. ) आजपासून जपाची नवी वही सुरू केली आहे....
फेब्रुवारी 20, 2019
आजचा दिवस : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघी पौर्णिमा. शिवजयंती आजचा वार : सुवर्णवार. आजचा सुविचार : आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम अम्हाला देतो रे..! ................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सकाळी उठलो तोच मुळी...
फेब्रुवारी 08, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया. आजचा वार : अनिवार. आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार. ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल राळेगणला जाऊन आलो. सगळा दिवस तिथेच गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय...
फेब्रुवारी 06, 2019
सध्या आम्हाला साडेसाती आहे. मन नुसते उबगून गेले. कुणीतरी सांगितले, की बांदऱ्याला एक दिव्य पुरुष राहतात. त्यांना सारे ‘उठाबाबाजी’ म्हणतात. अत्यंत पॉवरफुल आहेत. सहसा ते कुणाला भेटत नाहीत. पण भेट झाली तर काम झालेच म्हणून जा! आश्‍चर्य घडले. बाबाजींना बहुधा आमची कंडिशन अंतर्ज्ञानाने कळली असावी. त्यांचाच...
जानेवारी 31, 2019
नुकतेच ऐकिवात आले की-  कळिकाळाला न डरणारे  क्रांतीची ठिणगी पोटात सामावलेले  जुलूमशाहीच्या चिंधड्या उडवणारे  एक ज्वालाग्राही स्फोटक  क्रांतिकारकांच्या हाती गावले...  सत्तांधांच्या सिंहासनांखाली  पेरलेल्या ह्या स्फोटकाचे  दुष्परिणाम अटळ आहेत.  ह्या स्फोटकाला दर्प आहे,  श्रमिकांच्या घामाचा.  ह्या...
जानेवारी 26, 2019
नि वडणूकपूर्व सर्व्हे ह्या विषयावर गहन भाष्य करण्यासाठी आम्ही आज बसलो आहो! (म्हंजे तसेही बसलेलोच असतो, असे कुणी खवचटपणे म्हणेल, पण आम्ही दुर्लक्ष करून बसू!! असो.) निवडणूकपूर्व सर्व्हे आणि निवडणुकीचे अंदाज हा नव्या सहस्त्रकातील लोकशाहीचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. सर्व्हेशिवाय इलेक्‍...
जानेवारी 21, 2019
....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (पक्षी : मन) उचंबळले होते. डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहात होते. अंगावर रोमांच उभे राहिले होते...  लाखोंचा जनसमुदाय आणि शेकडो नेत्यांची ती मांदियाळी...
जानेवारी 15, 2019
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड गोड बोला!! युतीची बोलणी (काहीच्या काहीच मागे पडल्याने) मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा सुरू करायला हरकत नाही, असे सुचवण्यासाठी हे पत्र लिहीत आहे....
जानेवारी 14, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते !! त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर...
जानेवारी 11, 2019
आर्थिक मागास ऊर्फ कडका विधेयक पार्लमेंटात पास झाल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अश्रूनीर डोळां वाहू लागले, अक्षरश: भरून पावलें...एरव्ही आम्हा कडका कंपनीला कोण विचारतो? परंतु आपल्या "घर्कानघाटका' अवस्थेचा सहानुभूतीने विचार करणारा कुणीएक देवदूत दिल्लीत (जाऊन) बसला आहे, ह्या कल्पनेने आधार...