एकूण 28 परिणाम
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मार्च 11, 2019
इतिहास साक्षीदार आहे. तो नेहमी साक्षीदाराच्या पवित्र्यातच असतो. वास्तविक गडी चांगलाच पेंगुळलेला होता. रिकामपणी बसल्या बसल्या माणसाला डुलकी लागतेच. (हो की नाही?) पण धुडुमधडाड स्फोटाच्या आवाजाने इतिहास दचकून जागा जाहला, आणि सर्सावून बसला. सवयीने त्याने कागद खसकन ओढले आणि दौतीत बोरू बुडवोन तो सज्ज...
फेब्रुवारी 18, 2019
""ह्या इथून सैन्य घुसवलं की थेट इस्लामाबादपर्यंत सरळ रस्ता आहे...,'' त्याने हनुवटीच्या ठिकाणी ब्रशचा पांढरा ठिपका ठेवला आणि सरळ रेघ कानापर्यंत नेली. आपल्या कानाशीच शत्रूराष्ट्राची राजधानी आहे, हे काही मनाला बरे वाटले नाही.  ""समजा, हे लाहोर आहे!'' त्याने नाकावर एक पांढरा ठिपका काढला. ""आणि ही इथे...
नोव्हेंबर 30, 2018
मातोश्रीगडावरील वातावरण तसे थंड होते. हल्ली मुंबईत थंडी पडू लागली आहे, ह्या कल्पनेने महाराजांनी फॅनची नियंत्रण कळ फिरवून "ऑन'वरून "तीन'वर आणली. गडावर सामसूम होती. अयोध्येचा उत्तर दिग्विजय साजरा करून काही दिवस लोटले. प्रवासाचा शिणवटा जवळपास गेला होता. नवी मसलत कोठली हाती घ्यावी? ह्या विचारात महाराज...
नोव्हेंबर 28, 2018
माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’...
नोव्हेंबर 10, 2018
इतिहासापुरुषास नेमकी डुलकी लागत होती, तेव्हाच दाणकन स्फोटाचा आवाज होवोन तो खडबडून जागा झाला. कोर्टाची मनाई असूनही ही माणसे किती फटाके लावितात अं? अशी मनातल्या मनात कुरबूर करोन इतिहासपुरुषाने कूस बदलून डुलकीचे ड्युरेशन आणखी पाच-दहा मिनिटांनी ताणायचे ठरवले. परंतु तसे घडलें नाही. आणखी एका जोरकस दणक्‍...
नोव्हेंबर 07, 2018
(आशा, अपेक्षा आणि इच्छा...) स र्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना दीपावलीच्या (खऱ्याखऱ्या) शुभेच्छा. औंदा दिवाळीचा माहौल टाइट असून, एकमेकांना शुभेच्छा देण्याचा काळ आला आहे. आम्हाला हा काळ भारी प्रिय असतो. कां की, पत्रकारितेचे असिधाराव्रत घेतलेल्या मोजक्‍या पत्रकारांमध्ये आमची जिम्मा होत असल्याने...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
नोव्हेंबर 02, 2018
प्रिय नानासाहेब, जय महाराष्ट्र! वास्तविक आम्ही कधी आपल्याला पत्रबित्र, लखोटे, चिठ्याचपाट्या असले काही पाठवीत नसतो. पण आज आमचा इलाज उरला नाही. गेले काही दिवस आम्ही तुमच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल ऐकत आहोत. नुसते ऐकतच आहोत! हल्ली तर कुणी आम्हास मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारले की आम्ही गाजराची फोड...
जुलै 25, 2018
प्रश्‍न : सध्या रिलॅक्‍स दिसताय..!  उत्तर : मी रिलॅक्‍सच असतो!  प्रश्‍न : महाराष्ट्रात एवढं काय काय घडतंय! तुम्ही इतके रिलॅक्‍स कसे?  उत्तर : कुठं काय घडतंय? मेघा धाडे बिग बॉस झाली, ह्याच्यापलीकडे एक तरी महत्त्वाची घटना घडली आहे का महाराष्ट्रात?  प्रश्‍न : तुम्ही खरे महाराष्ट्राचे बिग बॉस आहात!! ...
मे 15, 2018
कयामत-ए- कांग्रेस, आलमगीर-ए-हिंदोस्तां, शेर-ए-गीर बाश्‍शासलामत नरेंदरशाह मोदीजी के कदमोंतले वझीर-ए-पाकिस्तान शाहीद खाक्‍कान अब्बासी यांच्यातर्फे सौफीसदी (याने की : शतप्रतिशत) कुर्निसात. बहोत अर्से हुए के आपकी मुलाकात नहीं हुई. मी असा बदनसीब की पाकिस्तानच्या कारभाराची रस्सी (याने की : सूत्रे) हातात...
नोव्हेंबर 09, 2017
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी शतप्रतिशत प्रणाम. फारा दिवसात गाठभेट नाही. आपल्या सरकारला (आपल्या हं!) तीन वर्षे पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचे विशेष अभिनंदन आणि आभार. तुमचा दृश्‍य हात आमच्या पाठीशी नसता तर तीन वर्षे निभली नसती, हे सत्य आहे. कुठेतरीच नेऊन ठेवलेला महाराष्ट्र आपण दोघांनी लायनीवर...
ऑक्टोबर 26, 2017
महाराष्ट्राचे कारभारी मा. ना. नाना फडणवीस ह्यांच्या कारकीर्दीस तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही अखिल महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन करतो. कां की त्यांच्यामुळेच ही कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरली. त्याचप्रमाणे आम्ही खुद्द मा. ना. नाना ह्यांचेही आभार मानतो. कां की ते नसते तर तीन वर्षे कशी गेली असती...
ऑक्टोबर 23, 2017
  नमो नम: नमो नम: नमो नम:...परमश्रद्धेय नमोजी आणि आदिदेव अमितभाई ह्यांच्या कृपेने औंदा दिवाळी चांगली गेली. दोघांनाही मोबाईलवर मेसेज पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दोघांनीही "सेम टु यू' असा सेम टु सेम रिप्लाय केल्याने जीव भांड्यात पडला! सकाळी मोबाईल स्विच ऑन केला, तर आमच्या कणकवलीच्या...
ऑक्टोबर 19, 2017
सर्वप्रथम सर्वांस दिवाळीच्या हार्दिक आणि अनेकानेक शुभेच्छा! (अनेकानेक द्यायला काय जाते? फुकट आहेत.) महाराष्ट्रातील आमच्या लाखो वाचकांना हे एव्हाना ठाऊक आहेच की आम्ही शतप्रतिशत याने की अगदी बालपणापासून याने की अगदी हाडाचे पत्रकार आहो. पत्रकारिता आमच्या धमन्यांतून अहर्निश सळसळत असते व बातमीचा वास...
ऑक्टोबर 18, 2017
कुठे दिवाळी ऐन भरातील उच्छावाचा कैफ अनावर लखलखणाऱ्या लक्ष दिव्यांची कुठे उगवते पहाट मंथर कुठे दिवाळी अस्मानातील आतिषबाजी आणिक धूर सुग्रासाच्या मेजावरती ऐन सुगीला येतो पूर कुठे दिवाळी ठुमकत येते अचूक उतरते गात्री गात्री नवी नवेली नवथर...
ऑक्टोबर 12, 2017
स्थळ : मातोश्री, वांद्रे संस्थान. वेळ : रात्रीची. प्रसंग : दिवाळीपूर्वीचा. पात्रे : दिवाळीपूर्वीचीच. विक्रमादित्य : (धाडकन बेडरुमध्ये घुसत) बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (धाडकन पांघरुणात घुसत) नोप!.. विक्रमादित्य : (कुरकुरत) मला काहीतरी इंपॉर्टंट विचारायचंय...
मे 18, 2017
इतिहास साक्षी आहे. नेमकी तीथ सांगावयाची तर वैशाख शुक्‍ल नवमी श्रीशके 1938. संवत्सर हेमलंबी. पहाटे अकरा-साडेअकराचा सुमार होता. शिवाजीपार्कावरील "राजगडा'ला जाग येत होती. झुंजुमुंजूची सोनेरी किरणे राजियांच्या मंचकापर्यंत पोहोचली आणि अवखळपणे त्यांच्या डोळ्यांशी बागडू लागली. चावट कुठली!! खुशाल...
मार्च 16, 2017
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८ माघ कृष्ण शुध्द तृतीया. आजचा वार : भेंडीगवार. आजचा सुविचार : शिमग्याच्या मिषें। पालथी गा मूठ। बाकी लयलूट। होत आहे।। देवा नारायणा। नको मला दिल्ली। गल्लीतली बिल्ली। गल्लीतचि ठेवा।। नमो नम: नमो नम: नमो नम: (१०५ वेळा लिहिणे.) कालच्या धुळवडीच्या दिवसापासून...
मार्च 09, 2017
नको विश्‍वनाथा। अंत आता पाहू। किती काळ साहूं। निवडणुका।। किती आजे काके। चुलते नि मामे। दंगल ही जमे। रणांगणी।। बापालागीं आता। पुत्र विचारीना। बाप जुमानीना। कोणालाही।। काय वानूं आता। काकाचे करतूत। त्याला सियासत। म्हणताती।। सायकलीचे टायर। जाले गा पंक्‍चर। त्यामाजी सत्वर। पंप मारी। इतुक्‍यात येई। आणि...