एकूण 39 परिणाम
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जून 01, 2019
रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 21, 2019
बेटा : (खांदे पाडून घरात येत) मम्मा, आयॅम बॅक!  मम्मा मॅडम : (काळजीत पडून) काही होतंय का तुला?  बेटा : (आळस देत) नोप... कंटाळा आलाय फक्‍त!  मम्मा मॅडम : (कसनुसं हसत) चेहरा किती उतरलाय!! मला वाटलं की तब्बेत बरी नाही की काय!!  ेबेटा : (डोकं हलवत) मूड एकदम खराब आहे!!  मम्मा मॅडम : (समजूत घालत) होतं...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 15, 2019
प्रिय नामदार मित्र, निवडणूक प्रचाराच्या सभा आटोपून परतलो असताना काल रात्री सुमारे अडीच वाजता अचानक मला (स्वप्नात) दृष्टांत झाला. एक तेजस्वी आकृती समोर आली आणि म्हणाली, ‘‘वत्सा, तुझ्या मनात खूप विखार भरला आहे. तो काढून टाक. साऱ्या जगताकडे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने पहा! हे जग तुला प्रेमानेदेखील...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 06, 2019
रोम, दिनांक (माहीत नाही) वार (माहीत नाही) : गेले तीन-चार दिवस रोमच्या रस्त्यांवरून हिंडतो आहे. महाराष्ट्रातील मतदान आटोपून तडक विमानात बसून सहकुटुंब इटलीला रवाना झालो. मनात म्हटले, संपली आमची निवडणूक! आता काय तो गोंधळ घाला!! नाही म्हटले तरी प्रचारात भयंकर दगदग झाली होती. महाराष्ट्रातील उन्हापासून...
एप्रिल 24, 2019
प्रिय नवमतदार वाचकांनो, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या महासोहळ्याला (कधीच) प्रारंभ झाला असून, ह्या सोहळ्यात सारा देश (टप्प्याटप्प्याने) सहभागी होत आहे. आतंकवाद्यांकडे जसे ‘आयईडी‘ नावाचे स्फोटक असते, तसे आपल्याही खिशात ‘व्होटर आयडी’, असे उद्‌गार आपल्या सर्वांचे महालाडके प्रधानसेवक श्रीमान नमोजी...
एप्रिल 17, 2019
नका नका मज। ऐश्‍या हाणू लाथां। सडकता माथा। कशापायी।। ऐसा काय माझा। झाला अपराध। आली कशी बाध। लोकतंत्रा।। आम्ही हो आजाद। अभिव्यक्‍त होऊ। वाट्टेल त्या देऊ। शिव्या शाप।। इलेक्षन आहे। इथे सारे माफ। सांगतो साफ साफ। निक्षून की।। देश नव्हे, हे तो। असे न्हाणीघर। येथे सानथोर। निर्वस्त्र की।। मतांचियासाठी।...
एप्रिल 16, 2019
देशाचे प्रधानसेवक श्रीमान नमोजी ह्यांनी आठवड्याभरापूर्वी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे प्रचार सभा घेतली. त्या सभेसाठी ज्या हेलिकॉप्टरमधून ते आले, त्यातून एक संशयास्पद, गूढ एवं काळ्या रंगाचा एक पेटारा गपचूप बाहेर काढण्यात आला व जवळच उभ्या असलेल्या आणखी एका संशयास्पद, गूढ एवं पांढऱ्या रंगाच्या...
एप्रिल 11, 2019
सां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला...
फेब्रुवारी 23, 2019
एक आटपाटनगर होते. तेथील नगरजनांनी नगरात लोकशाही मार्गाने राजा निवडायचे ठरवले. दर पाच वर्षांसाठी राजा नेमण्याचा निर्णय झाला. निवडणूक ठरली. देवदत्त आणि उद्धवदत्त अशा दोघा धडाकेबाज धुरीणांची उमेदवारी जाहीर झाली. मतदान झाले. परंतु, अहो आश्‍चर्य! मतदानात देवदत्तास आणि उद्धवदत्तास समसमान मते पडली. आता...
फेब्रुवारी 07, 2019
प्रि य मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम, दंडवत, मुजरा आणि सा. नमस्कार! फार दिवसांत गाठभेट नाही. आमचे पक्षाध्यक्ष श्रीमान मोटाभाई तूर्त भलतेच काळजीत पडले आहेत. गेले अनेक दिवस ते तुमचा फोन ट्राय करत होते. परंतु, तुमचा फोन व्यग्र असून ‘कृपया प्रतीक्षा करें’ असे सांगण्यात आले. त्यांनी...
फेब्रुवारी 05, 2019
(एक बोधकथा) पू र्वीच्या काळी जंगलात प्राणी राहत असत, तेव्हाची गोष्ट. हल्ली जंगलात नक्षलवादी, तेंदूपत्ता आणि चंदनतस्कर, तडीपार अशा लोकांचा वावर असतो असे म्हणतात. तेव्हा प्राणी असत. जे काही असेल ते असो. गोष्ट फार जुनी नाही, पण बोध घेण्याजोगी आहे. एका निबीड अरण्यात प्राण्यांचे राज्य होते व सारे...
जानेवारी 14, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते !! त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर...
ऑक्टोबर 13, 2018
मा. ना. नानासाहेब फडणवीस यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत प्रणाम. अत्यंत जड अंत:करणाने सदर पत्र लिहीत आहे. पत्राखाली (किंवा वर) नाव लिहिण्याचे माझे धार्ष्ट्य नाही. पत्र निनावी असले तरी ते कृपया प्रातिनिधिक मानावे. कारण तब्बल ४५ आमदार आणि अर्धा डझन खासदारांच्या भावनाच मी येथे शब्दबद्ध करीत आहे. ‘...
सप्टेंबर 18, 2018
नानासाहेब फडणवीस यांसी, कोपरापासून जय महाराष्ट्र. हे आम्ही काय ऐकतो आहो? निवडणुकीनंतरही मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेन, असे तुम्ही नागपुरात जाऊन म्हटलेत? ही खबर आल्यापासून आमच्या संतापास पारावार राहिलेला नाही, नींद सफै उडाली असून आमच्या मातोश्रीगडावरील वातावरण तंग झाले आहे. नाना, नाना, असे आपण...
ऑगस्ट 25, 2018
आदरणीय प्रिय मा. ना. नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत प्रणाम. ठरल्याप्रमाणे केरळात शंभर डॉक्‍टर आणि काही टन औषधे घेऊन गेल्या आठवड्यात (सुखरूप) पोचलो आहे. पुरामुळे इथे प्रचंड नुकसान झाले असून, घराघरांत घुसलेले पाणी निघता निघत नव्हते. अखेर मी येथे येऊन ठेपल्यानंतर पुराच्या पाण्याने काढता पाय घेतला...
जुलै 19, 2018
बेटा : (अत्यंत गंभीरपणे एण्ट्री घेत) मी आलोय मम्माऽऽ...! मैं आ गया हूं!! मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) बरं वाटत नाहीए का बेटा? नेहमीसारखी उत्साहात एण्ट्री झाली नाही तुझी आज! आणि कुठे होतास इतका वेळ? बेटा : (प्रामाणिकपणाने) मी अशा एका व्यक्‍तीबरोबर होतो की वेळ कसा गेला कळलंच नाही!! मम्मामॅडम : (...