एकूण 43 परिणाम
ऑगस्ट 14, 2019
मा. नानासाहेब फडणवीस यांसी, काल रात्री डिस्कवरी च्यानलवर आपल्या आदरणीय नमोजींचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा कार्यक्रम पाहिलात का? पाहिला असेलच. देशातील कोट्यवधी लोकांनी तो बघितला. मी तर बोलून चालून पडलो महाराष्ट्राचा वनमंत्री! मला तो बघणे भागच होते. त्या कार्यक्रमात आदरणीय नमोजींनी तात्पुरता भाला...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
फेब्रुवारी 08, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया. आजचा वार : अनिवार. आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार. ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल राळेगणला जाऊन आलो. सगळा दिवस तिथेच गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय...
फेब्रुवारी 02, 2019
सकाळी उठलो. घड्याळ बघितले. पुन्हा झोपलो. मनात म्हटले इतक्‍या लौकर उठून काय करणार? माणूस जितके तास जागा राहातो, तितकी त्याची जेवणे जास्त होतात. त्यापेक्षा झोपलेले बरे....घुर्रर्र...पुन्हा उठलो. घड्याळात बघितले. जेवणाची वेळ झाली होती. उठलो. आता चहा प्यावा की डायरेक्‍ट जेवूनच घ्यावे? हा प्रश्‍न पडला....
डिसेंबर 08, 2018
वनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी ठरल्याप्रमाणे व अपेक्षेनुसार टी-वन ऊर्फ अवनी वाघिणीचा खून झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिला असून, सदर खून करणाऱ्या मारेकऱ्यास ऊर्फ...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
डिसेंबर 01, 2018
प्रिय मित्र नानासाहेब- सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज पहिल्यांदा आम्ही ‘प्रिय’ अशा मायन्यासमेत आपणांस हे खत लिहितो आहो, ह्याची नोंद घ्यावी! ह्याचा अर्थ एवढाच की आम्ही खुशीत आहोत!! महामंडळांच्या खिरापतीत आमच्या तळहातावर दोन चमचे खिरापत (गपचूप) ज्यास्त ठेवलीत. नाणारची जमीन आपण (एकदाची) शापमुक्‍त...
ऑक्टोबर 24, 2018
(एक पाणीदार पत्रव्यवहार...) प्रिय गिरीशभाऊ, शतप्रतिशत नमस्कार! अगदी तांतडीने पत्र लिहायला घेतले आहे, कारण अक्षरश: तोंडचे पाणी पळाले आहे. औंदा पाऊस तितकासा चांगला झालेला नाही, हे आपणांस कदाचित माहीत असावे. दुष्काळ नाही तर किमान दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे तरी जाहीर करा, असा आग्रह होत होता. तशी...
सप्टेंबर 27, 2018
फा र्फार्पूवीची गोष्टबिष्ट नव्हे. ही दोनेक वर्षांपूर्वीचीच आहे. एक किनई दरोडेखोर होता. आता हा इसम दरवडेखोर होता की वाटमारी करणारा भुरटा ह्याबद्दल थोडेसे क्‍नफ्यूजन आहे. पण काहीही असेनाका, (हा मराठी शब्दप्रयोग आहे, जपानी नाव नव्हे!) दाखलेबाज गुन्हेगार होता इतके पुरे. आपला हा कथानायक आहे किनई, तो जो...
जुलै 07, 2018
"सांग सांग भोलानाऽऽथ, पाऊस्स पडेल्काय... शाळेभोवती पाणीसाचून्सुट्टी मिळेल्काय...' हे जुने बालगीत गुणगुणतच सकाळ उगवली. बाहेर तुफ्फान पाऊस पडत होता. नागपुरातील रस्ते जलमय झाले होते. घराघरांत पाणी शिरले होते. इतकेच नव्हे, तर रविभवनच्या परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते. विरोधी...
जून 27, 2018
(एक पाणीदार पत्रव्यवहार...) आ दरणीय मा. साहेब (वांद्रे) यांस, जय महाराष्ट्र. घाईघाईने पत्र लिहिण्यास कारण की मी एक साधासुधा महापौर आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत मजबूत पाऊस पडून काही ठिकाणी पाणी तुंबल्यासारखे दिसले. गेल्या चोवीस तासांत मुंबईत २३१ मिमी इतका पाऊस नोंदला गेला असला, तरी कुलाबा, भायखळा...
मार्च 28, 2018
सर्वपक्षीय, बिगरपक्षीय राजकीय व अराजकीय नेते व कार्यकर्ते आणि सहकारी - अत्यंत गंभीर परिस्थितीत सदर पत्रक जारी करण्याची वेळ आली आहे. उन्हाची तलखी एवढी वाढली आहे, की हा नुसता मार्च नसून, लाँग मार्च वाटावा ! गेल्या महिन्याभरात मुंबईत इतके मोर्चे आले की त्यास गणती नाही. मुंबईचे सोडा, गावोगाव इतके...
ऑक्टोबर 24, 2017
इतिहासास नेमके ठावकें आहे की हे कधी ना कधी घडणारच होते. महाराष्ट्राच्या नवनिर्माणांच्या यज्ञात आमची आहुती पडायचीच होती. हे घटित टिपांवयास तो इतिहासपुरुष कागद आणि बोरु घेवोन जणूं कैक युगें वाट पाहात बसला होता... कार्तिकातील तृतीया होती. टळटळीत सकाळ होती. होय, आमच्या मुंबापुरीत आक्‍टोबरातील...
ऑगस्ट 31, 2017
आय सॅल्युट यू ऑल  मुंबईवालों, आय सॅल्युट यू ऑल!  तुंबलेल्या गर्दीला  थकलेल्या वर्दीला  मेलेल्या म्हशींना  सडलेल्या घुशींना  कुत्र्यांना, मांजरांना  शेळ्यांना, कावळ्यांना  समुद्र उल्लंघून रस्त्यावर  आलेल्या माशांना  पुढाऱ्यांच्या भिजलेल्या  पाणीदार मिश्‍यांना  पाणी ओसरण्याची वाट  पाहणाऱ्या रहिवाश्‍...
जुलै 06, 2017
शालोम...सांप्रत आमचा मुक्‍काम तेल अवीव येथे आहे, हे वेगळे सांगावयाची गरज नाही. इझरेलचे प्रधानसेवक जे की बेन्यमिनभाई नेतन्याहू यांच्या न्योत्यामुळे आम्ही येथे आलो आहो. आमच्या पथकात आमचे प्रधानसेवक श्रीनमोजी हेदेखील आहेत. तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर आमचे भव्य स्वागत झाले, हे आपण...
मे 17, 2017
‘‘सभी यात्रियों का स्वागत है. बाहर का तापमान सदोतीस अंश सेल्सियस है. वैमानिक कॅप्टन प्रफुल्ल पटेल इनकी निगरानी में हम मुंबई से दिल्ली की दूरी करीब दो घंटे में पूरी करेंगे. उडान के समय सभी यात्रियों को भोजन एवं जलपान पेश किया जाएगा. यात्रियों से निवेदन है की वह अपनी कुर्सी की पेटी बांधे रख्खें...’’...
मे 15, 2017
"स्टोरी थोडी काम्प्लेक्‍स आहे, पण लय भारी आहे, साहेब!,'' डायरेक्‍टरनं शर्टाची बाही ओढत सांगितले. निर्मात्याने अंग चोरले. त्याचे लक्ष समोर थंड होत चाललेल्या चहाच्या कोपाकडे होते. डायरेक्‍टरने आधीच चहा मारलेला होता. गेला एक तास डायरेक्‍टरने त्याला खुर्चीत जखडून ठेवले आहे. तेवढ्यात त्याने तीन कोप चहा...
एप्रिल 29, 2017
सबका साथ, सबका विकास हाच आमचा नारा... विकासाच्या रस्त्यावर आम्ही चालतो भराभरा इतकं करतो, तरीही विचारता, -कटप्पाने बाहुबली को क्‍यूं मारा? तुमच्यासाठी लेको आम्ही काय नाही केलं? श्रीहरिच्या कोट्यामधून मंगळयान गेलं हातात घेऊन झाडू, सारा झाडून काढला देश...
एप्रिल 28, 2017
आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर श्रीशके 1938 वैशाख शुक्‍ल प्रतिपदा. आजचा वार : नमोवार...याने गुरुवार! आजचा सुविचार : इतुक्‍यात न येई वरणा!  नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) हे मी माझ्या खासगी डायरीत लिहितो आहे, पण जाहीर बोललो तर पुन्हा नागपूरला "विदर्भ एक्‍स्प्रेस'ने विनारिझर्वेशन जावे...