एकूण 84 परिणाम
जून 14, 2019
वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की मराठीमध्ये लिखतो आहे, कारण ही जुबान महाराष्ट्रातल्या अनेक मराठी अवामलाही बदन येत नाही, असे मालूम पडले आहे. (खुलासा : ‘धड’ ह्या लब्जचा अर्थ ऊर्दू-मराठी डिक्‍...
जून 13, 2019
मुख्यमंत्री श्रीमान नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत नमस्कार. मी आपल्या पक्षाचा साधासुधा व निरलस व निरपेक्ष कार्यकर्ता असून अन्य आमदारांप्रमाणेच मलाही लोकांनी मोदीलाटेत निवडून दिले व आमदार केले आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी गेली साडेचार वर्षे लोकांची निरपेक्ष व निरलस सेवा केली. (पदाची...
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जून 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : ठरलेली! काळ : ठहरलेला! प्रसंग : गोठलेला. पात्रे : सौभाग्यलंकारमंडित वज्रचूडेमंडित सौभाग्यवती कमळाबाईसाहेब आणि साक्षात राजाधिराज उधोजी महाराज! ............... (बाईसाहेबांच्या अंत:पुरात गडबड उडाली आहे. झोपाळ्यावर टेचात बसून बाईसाहेब भराभरा फर्माने रवाना...
जून 05, 2019
प्रिय नानासाहेब यांसी, अवांतर बडबड करण्याची आम्हाला सवय नाही. थेट मुद्यावर आलेले बरे असते. राज्यातील निवडणुका तोंडाशी आल्या नसल्या तरी तशा टप्प्यातच आल्या आहेत. (हे म्हंजे सैपाकघरात तळणीला टाकलेल्या बटाटेवड्याच्या वासाने दिवाणखान्यातल्या पाहुण्यांना हैराण करण्यापैकी आहे! असो!!) मुद्दा एवढाच, की...
जून 01, 2019
रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण...
मे 31, 2019
आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
एप्रिल 12, 2019
प्रिय संकटमोचक गिरीशभौ, काल रात्रीपासून तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो आहे. स्विच ऑफ येतो आहे. अंमळनेरात प्रताप मिल कंपाऊण्डमध्ये झालेल्या इलेक्‍शनच्या सभेत घडलेल्या प्रकाराने तोंडचे पाणी पळाले आहे. तिथे जोरदार मारामारी झाली असे दिसते! टीव्हीवर पाहिले. मंचावर बसलेले कोण आणि मंचाच्या खाली...
मार्च 30, 2019
प्रिय मित्र उधोजीसाहेब, शतप्रतिशत नमस्कार. तातडीचे व गोपनीय पत्र पाठवीत आहे. पत्र घेऊन येणारे गृहस्थ माझ्या विश्‍वासातले आहेत. काळजी नसावी! पत्र लिहिण्यास कारण की आमचे कमळाध्यक्ष आदरणीय मा. मोटाभाई हे स्वत: आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या गांधीनगर येथे जाणार आहेत. ‘‘तुम्ही सोबत याल का?’’ अशी...
मार्च 19, 2019
इतिहासपुरुष रुसला आहे! फुगला आहे! फुरंगटला आहे! त्याने ठरविले आहे की आम्ही आता लिहिणार नाही, आम्ही आता खेळणार नाही, आमची आता ‘टाइम प्लीज’! इतिहासपुरुष उठला आणि पाय हापटत घरात जाऊन फडताळात बसला. डोक्‍याला मुंग्या आल्या की तो असाच फडताळात जाऊन बस्तो!! त्याचे असे झाले की... नियतीचा छान छान खेळ डायरीत...
फेब्रुवारी 20, 2019
आजचा दिवस : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघी पौर्णिमा. शिवजयंती आजचा वार : सुवर्णवार. आजचा सुविचार : आम्ही काय कुणाचे खातो रे, श्रीराम अम्हाला देतो रे..! ................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे. सकाळी उठलो तोच मुळी...
फेब्रुवारी 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. (बुद्रुक)  (सौभाग्यवती कमळाबाई (त्यातल्या त्यात) लगबगीने हालचाली करत आवराआवर करत आहेत. दासदासींना सूचना देत आहेत. "चला,चला, तयारीला लागा!', बाई, बाई कित्ती उशीर झाला...आवरायला नको का?' वगैरे बडबड एकीकडे चालू आहे. दुसरीकडे सारखं दरवाजाकडे टुकून पाहात आहेत. अब आगे...) ...
फेब्रुवारी 07, 2019
प्रि य मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम, दंडवत, मुजरा आणि सा. नमस्कार! फार दिवसांत गाठभेट नाही. आमचे पक्षाध्यक्ष श्रीमान मोटाभाई तूर्त भलतेच काळजीत पडले आहेत. गेले अनेक दिवस ते तुमचा फोन ट्राय करत होते. परंतु, तुमचा फोन व्यग्र असून ‘कृपया प्रतीक्षा करें’ असे सांगण्यात आले. त्यांनी...
फेब्रुवारी 01, 2019
महाराष्ट्राचे (एकमेव) तारणहार श्रीरामभक्‍तसाहेब अस्वस्थपणे येरझारा घालत आहेत. अधूनमधून फोनच्या डबड्याकडे चमकून पाहत आहेत. खिशातला मोबाइल फोन काढून न्याहाळताहेत. अखिल महाराष्ट्र आज कुणाच्या बरे फोनची वाट पाहत आहे? दूरवर बेल वाजत राहते... ‘‘कोण आहे रे तिकडे? फोन उचला!,’’ साहेब ओरडले. तरीही फोन वाजतच...
जानेवारी 23, 2019
सकाळच्या वेळी महापौरांना अचानक जाग आली. पाखरांची किलबिल ऐकत ते पडून राहिले. तेवढ्यात त्यांच्या कानावर परिचित अशी समुद्राची गाज पडली. त्यांना हायसे वाटले. समुद्राचा केवढा आधार आहे, आपल्या मुंबईला!..आणि मुंबईच्या महापौरांनाही!! पण आज समुद्राच्या लाटा अशा रोंरावत का येत आहेत? सुनामि आली आहे का?...
जानेवारी 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.) वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड! प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा. पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि  प्रिं. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत)...
जानेवारी 18, 2019
डिअरम डिअर होम्मिनिष्टरसाएब ह्यांशी, पायलचा नमस्कार. सक्‍काळीच पहाटे पहाटे साडेअकराला बबलूचा मोबाइल आला का ‘‘पगली सोती क्‍या? दिवाली मना! डान्स बार वाप्पिस शुरू होरेले हय’. मी त्याला बोल्ले का ‘सकाळधरनं कोनी भेटलं नाय का? जा मेल्या!’ मी फोन ठेवला. पन बबलू चांगला मानूस आहे. (बबलू रिक्षावाला...
जानेवारी 15, 2019
प्रिय मित्रवर्य उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या आणि (आता तरी) गोड गोड बोला!! युतीची बोलणी (काहीच्या काहीच मागे पडल्याने) मकर संक्रांतीच्या निमित्ताने पुन्हा सुरू करायला हरकत नाही, असे सुचवण्यासाठी हे पत्र लिहीत आहे....