एकूण 35 परिणाम
जून 26, 2019
गुड मॉर्निंग, आज बुधवार... वर्किंग डे... दिवसभर कामात व्यस्त राहण्यापूर्वी आम्ही आपल्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत. कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि...
जून 14, 2019
वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की मराठीमध्ये लिखतो आहे, कारण ही जुबान महाराष्ट्रातल्या अनेक मराठी अवामलाही बदन येत नाही, असे मालूम पडले आहे. (खुलासा : ‘धड’ ह्या लब्जचा अर्थ ऊर्दू-मराठी डिक्‍...
जून 01, 2019
रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण...
मे 09, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या आजचं भविष्य, पंचांग आणि दिनविशेष! - जाणून घ्या आजचे दिनमान आणि...
एप्रिल 13, 2019
आ दरणीय नमोजीहुकूम सतप्रतिसत प्रणाम. आपकी अनुग्या के अनुसार परचार के कार्य में पूरी क्षमता औ’ शक्‍ती के साथ लगा हूं. इस बखत बिहार के कृषकों के जीवन में हरित क्रांती लाने हेतु हम काम में जुटे है...(पुढील मजकुराचा तर्जुमा मराठीत...शुद्ध तूप संपले!) निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण देशभर फिरत आहात,...
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
फेब्रुवारी 28, 2019
बेहोषीच्या जलशांना इथे चढे रोज रंग जो तो रमे आपुल्याच मौजमजेमध्ये दंग अशा वेळी काळीज गा माझे फाटुनिया जाय कुठे आणि कशी आता असेल ती वेडी माय? शाळेच्या त्या प्रांगणात अधीमधी दिसते ती उभी राही गोंधळून भांबावली सरसुती काय तिला बोलायाचे, सांगायाचे आहे तिला पुन्हा पुन्हा विचारिते ‘पोरा, तू गा कितवीला?’...
जानेवारी 14, 2019
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) कालचा दिवस मोठ्या गडबडीत गेला. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने दोन दिवस दिल्लीत होतो. पण महाराष्ट्रात राहिलो असतो तर यवतमाळला साहित्य संमेलनाच्या मांडवात जावे लागले असते !! त्यापेक्षा दिल्लीतला मांडव केव्हाही पर्वडला. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर...
जानेवारी 01, 2019
सर्वप्रथम आमच्या लाखो लाखो वाचकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! ज्या अर्थी आपण हा मजकूर सक्‍काळी सक्‍काळी वाचत आहा, त्याअर्थी काल रात्री बारा वाजता आपण शांतपणे झोपी गेला होता. उर्वरितांनी (लिंबूसरबताचे घुटके घेत) आमच्या (नम्र) शुभेच्छा उदारपणे यथावकाश स्वीकाराव्यात. येते नवे वर्ष आपणां...
डिसेंबर 04, 2018
दादू : (खट्याळपणे फोन फिरवत) हालोव...कौन बात कर रहा है? सदूभय्या है का? सदू : (नम्रतेची मात्रा वाढवत) जी, बोल रहा हूं? आपका शुभनाम? दादू : (हसू दाबत) हनुमान चालीसा पढे हैं का? सदू : (कपाळावर आठी) नहीं! क्‍यूं? दादू : (मोकळ्या गळ्याने) जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपिस तिहुं लोक उजागर। सदू : (...
ऑक्टोबर 25, 2018
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रेगड. वेळ : खडाखडीची! प्रसंग : बांका! पात्रे : राजाधिराज उधोजीमहाराज आणि साग्रसंगीत अलंकृत सौ. कमळाबाई. .............................. (कमळाबाईंच्या अंत:पुरात उधोजीराजे ताठ्यातच प्रविष्ट होतात...अब आगे.) उधोजीराजे : (घुश्‍शात) आमची याद केली होतीत? कमळाबाई : (उसासा सोडत)...
ऑक्टोबर 17, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० आश्‍विन शुद्ध सप्तमी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा रंग : ये लाल रंग कब मुझे छोडेगाऽऽ..! आजचा सुविचार : साकी की क्‍या जरुरत, क्‍या मानी है मयकदे के,                       मेरे दर पे आज मेरी सरकार आ रही है... ......... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८...
ऑक्टोबर 12, 2018
बेटा : (उत्साहात प्रविष्ट होत) ढॅणटढॅऽऽण...मी परत आलोय, माते! मम्मामॅडम : (दचकून) हे काय नवीन? नेहमीसारखं ‘मम्मा, आयॅम बॅक’ नाही म्हणालास? बेटा : (डोळे मिटून) आता यापुढे मी शुद्ध मराठीत बोलायचं ठरवलं आहे!! मम्मामॅडम : (नाक मुरडून) काही नको! कितीही कौतुक केलं तरी तिथली माणसं त्या कमळवाल्यांना आणि...
ऑगस्ट 11, 2018
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान (बुद्रुक.) वेळ : टळून गेलेली! काळ : वेळ टाळलेला! प्रसंग : तेलही गेले, तूपही गेले... टाइप. पात्रे : महाराष्ट्र हृदयसम्राट श्रीमान उधोजीसाहेब आणि चि. विक्रमादित्य ऊर्फ हृदयसम्राट ज्यु. ............................. विक्रमादित्य : (खोलीचे दार ढकलत आत येत) हे...
जुलै 16, 2018
सकल सौभाग्यवती सालंकृत पैठणीअवगुंठित कमळाबाई अंत:पुरात रागेरागे येरझारा घालत आहेत. मधूनच बंद दाराकडे पाहत आहेत. दाराशी दबक्‍या पावलाने साक्षात उधोजीराजे येतात. अब आगे...  उधोजीराजे : (नाजूकपणे कडी वाजवत)...कडी!  कमळाबाई : (बंद दाराकडे पाहत) हुं:!!  उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) आम्ही आलो आहोत......
जुलै 05, 2018
प्रिय चाचा, साष्टांग नमस्कार. तुम्ही (सध्या) कुठे आहात? आय मीन, कुठल्या पक्षात आहात? गेले दोन दिवस तुम्हाला शोधतो आहे. मीच काय, उभ्या महाराष्ट्रात तुमची शोधाशोध सुरू झाली असून, तुम्हाला हुडकण्यासाठी तपास पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. सर्व पक्षांतील लोक तुम्हाला धुंडत असून, ‘तुम्ही आपल्या पक्षात...
मे 29, 2018
प्रति, श्री. नानासाहेब फडणवीस  यांसी जय महाराष्ट्र. पालघरातील इलेक्‍शन वगैरे आटपून तुम्ही परत मलबार हिलला गेल्याचे कळले. पालघरातील भाषणात तुम्ही ‘सामदामदंडभेद’ असा शब्द वापरला होता. आम्हाला अर्थ कळला नाही. म्हणून आम्ही तुमच्या भाषणाची क्‍लिप लोकांना ऐकवली. म्हटले, ‘‘तुम्हाला ह्याचा अर्थ सांगता येईल...
मे 09, 2018
करनाटकातील इलेक्‍शनच्या निकालांसंदर्भात बराच धुरोळा उडाला असून, धुळीच्या वादळाचा इशारा करनाटक राज्यालाही दिला जावा, अशी आम्ही मागणी करीत आहो. तेथे उडालेली धूळ किती प्रमाणात आहे, हे आम्ही पाहू शकलो नाही, कारण डोळ्यांत धूळ जाण्याचे भय होते. असो. विविध ओपिनियन पोलांनुसार त्रिशंकू विधानसभा जन्माला...
मार्च 13, 2018
नेमकी तिथी सांगावयाची तर श्रीशके १९३९ फाल्गुनातली वद्य अष्टमी. टळटळीत सायंकाळ होती. सायंकाळ कसली, रात्रच ती. वास्तविक ह्या वेळी माणसाने घरी परतावे. बाहेर जाऊ नये! पण शिवाजी पार्कच्या मुलुखात अभिमानाने वसलेल्या कृष्णकुंजगडावर अचानक हालचाल झाली. हुकूम सुटले... चलो, शीव!..शिवतीर्थाकडोन शीवतीर्थाकडे!!...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...