एकूण 48 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
मंद दिव्याच्या अर्धवट अंधार कम उजेडात प्रत्यक्ष साहेब बसलेले. चेहऱ्यावर गंभीर भाव. अवघ्या महाराष्ट्राचे भविष्य जणू समोर बसलेले. त्यांच्या पुढ्यातील स्टुलावर आम्ही! आमच्या चेहऱ्यावर अष्टमीचा दिवसभराचा उपास ‘लागल्या’ची कळा. परंतु, फैनाबाज कुर्ता आणि पायजम्यातील ती मूर्ती पाहून प्रथम आम्ही (...
सप्टेंबर 07, 2019
चंदुदादा कोल्हापूरकर : (ऐसपैसपणे) या, या! तुमचीच वाट पाहात होतो! सुभाषाजी देसाई : (सर्द होत) अहो, आमच्याच घरात आमचं स्वागत कसं करता? गिरीशभाऊ महाजन : (वाद न वाढवण्याच्या प्रयत्नात) तुमचं आणि आमचं काही वेगळं आहे का?.. शिवाय आमचे मोदीजी म्हणतात वसुधैव कुटुंबकम! म्हंजे अवघं विश्‍व हे एकच कुटुंब आहे!!...
जुलै 27, 2019
प्रिय मित्रवर्य आदरणीय श्री. रा. रा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. काल रात्री (जागून) बारा वाजताच अभीष्टचिंतनाचा फोन करणार होतो. तेवढ्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागा राहिलो!! परंतु, तुमचा फोन (नेहमीप्रमाणे) औटॉफरीच होता. (उगीचच आम्हाला जागरण मात्र झाले!!) तुमचा फोन औटॉफरीच झाला की (खरोखर) पोटात गोळा...
जुलै 12, 2019
वाचा आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल बुलेटीन  - सर्वांत आधी जाणून आजचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जुलै​ - आषाढी एकादशी विशेष विठ्ठला, जनतेची आणखी 5 वर्षे सेवा करण्याची संधी मिळू दे : मुख्यमंत्री​ विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री...
जून 25, 2019
प्रति,  आदरणीय नानासाहेब फडणवीस ‘वर्षा’ बंगला, मुंबई. महादेय शतप्रतिशत नमस्कार. खालील कविता पावसाळी कविता नव्हे! त्यात महाराष्ट्राची वेदना दडली आहे. ती तुमच्यापर्यंत पोचावी, ही इच्छा. वाचा : मुख्यमंत्रिपदासाठी आपल्यात नको झगडा कारण आपला एकोपा आहे तगडा! मुख्यमंत्री कोण? हा आहे शंभर नंबरी सवाल कारण...
जून 22, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर श्रीशके १९४१ ज्येष्ठ शु. पंचमी. आजचा वार : थॅंक गॉड इट्‌स सॅटरडे. आजचा सुविचार : आलीया ‘योगा’सी । असावे सादर। ‘देवा’वरी भार। घालोनिया।। ............................ नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) अंग मोडून गेले आहे. कूस बदलणे मुश्‍कील झाले आहे. चार...
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जानेवारी 25, 2019
बेटा : (उत्साहाने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक! मम्मामॅडम : (थंडपणाने) हं!..गुड मॉर्निंग!! बेटा : (हातातली प्रवासी बॅग ठेवत) भलतीच धावपळ झाली! पण काम फत्ते करून आलो!! मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) आता कुठलं काम फत्ते करुन आलास? एखादं काम फत्ते केलंस की माझ्याकडे आपल्याच पक्षाच्या...
नोव्हेंबर 21, 2018
प्राणप्रिय परमआदरणीय साहेबांचे साहेब श्रीमान उधोजीसाहेब ह्यांचे चरणारविंदी बालके संजयाजीचा साष्टांग प्रणिपात, त्रिवार मुजरा विनंती विशेष! आपल्या अनुज्ञेनुसार गेल्याच सप्ताहात अयोध्येस येऊन ठेपलो आहे. आपल्या ता. २५ रोजीच्या अचाट, अफाट आणि सारे विक्रम तोडणाऱ्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पूर्ण झाले...
सप्टेंबर 21, 2018
पत्र क्रमांक एक : सर्व संबंधितांसाठी- गेले काही दिवस आम्ही वित्त आयोगातर्फे महाराष्ट्र राज्याची एकंदर आर्थिक स्थिती तपासून पाहात होतो. सर्वप्रथम आम्ही सगळ्या हिशेबाच्या वह्या मागवून लाल लाल रेघा ओढून ठेवल्या. काही प्रश्‍नचिन्हे काढली. जमा-खर्चाच्या नोंदींच्या खतावण्यांवर रागीट इमोजीसुद्धा काढून...
सप्टेंबर 18, 2018
नानासाहेब फडणवीस यांसी, कोपरापासून जय महाराष्ट्र. हे आम्ही काय ऐकतो आहो? निवडणुकीनंतरही मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेन, असे तुम्ही नागपुरात जाऊन म्हटलेत? ही खबर आल्यापासून आमच्या संतापास पारावार राहिलेला नाही, नींद सफै उडाली असून आमच्या मातोश्रीगडावरील वातावरण तंग झाले आहे. नाना, नाना, असे आपण...
सप्टेंबर 18, 2018
आंदळकरांनी आपल्या सर्वाधिक कुस्ती मातीत जिंकल्या; पण भविष्यातील आव्हान त्यांनी तेव्हाच ओळखले होते. त्यामुळे "गाव तिथे तालीम' आणि "तालीम तिथे मॅट' हा आग्रह त्यांनी तेव्हापासून धरला. राज्यातील आणि पर्यायाने देशातील कुस्ती प्रगतीच्या वळणावर असतानाच कुस्तीतला हा तारा निखळला आहे. सहा- साडेसहा फूट उंची,...
सप्टेंबर 04, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० श्रावण शु. कृष्णाष्टमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : शिंके लावियेले दुरी, होतो तिघांचे मी वरी, दोन हात सहा हाती, तेव्हा मुखी पडे माती!! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) मराठी माणसाने आयुष्यात काहीही व्हावे; पण महाराष्ट्राचा...
ऑगस्ट 07, 2018
वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर... ...बहिणाबाईंच्या ओव्या गुणगुणत आम्ही छताच्या पंख्याकडे एकटक पाहात पहुडलो आहो. बाहेरील हिरव्यागार मळ्याकडे पाहात आयुष्यातील रखरखाटाचा विचार करतो आहो. मनात गीतासार उमटते आहे...तुम्हे कहां जाना था, तुम कहां पहुंच गये? तुमने क्‍या चाहा...
जुलै 11, 2018
सर्प हा शेतकऱ्याचा मित्र असला तरी आमचे त्याच्याशी फारसे बरे नाही. सर्प म्हटले की आमच्या अंगावर सरसरून काटा येतो. घाबरगुंडी उडून आमची पुंगी वाजत्ये! (खुलासा : पुंगी वाजणे हा एक मुहावरा आहे, त्याचा कुठल्याही क्रियेशी संबंध नाही!) त्यावरून आम्ही शेतकरी नाही, हे कुणालाही सहज ओळखता येईल. सर्प शेतातील...
जुलै 07, 2018
"सांग सांग भोलानाऽऽथ, पाऊस्स पडेल्काय... शाळेभोवती पाणीसाचून्सुट्टी मिळेल्काय...' हे जुने बालगीत गुणगुणतच सकाळ उगवली. बाहेर तुफ्फान पाऊस पडत होता. नागपुरातील रस्ते जलमय झाले होते. घराघरांत पाणी शिरले होते. इतकेच नव्हे, तर रविभवनच्या परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यातही पाणी शिरले होते. विरोधी...
जुलै 05, 2018
प्रिय चाचा, साष्टांग नमस्कार. तुम्ही (सध्या) कुठे आहात? आय मीन, कुठल्या पक्षात आहात? गेले दोन दिवस तुम्हाला शोधतो आहे. मीच काय, उभ्या महाराष्ट्रात तुमची शोधाशोध सुरू झाली असून, तुम्हाला हुडकण्यासाठी तपास पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत. सर्व पक्षांतील लोक तुम्हाला धुंडत असून, ‘तुम्ही आपल्या पक्षात...
जून 21, 2018
विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हाय देअर बॅब्स... मे आय कम इन?  उधोजीसाहेब : (झोपाझोपीच्या तयारीत) नोप ! उद्या भेटू. गुडनाइट !  विक्रमादित्य : (चातुर्यानं) बाकी तुमचं स्पीच एकदम टॉप क्‍लास झालं हां !  उधोजीसाहेब : (चक्रावून) काय टॉप क्‍लास झालं?  विक्रमादित्य : (तोंडाकडे बोटांचा पाचुंदा...
जून 18, 2018
प्रिय सहकारी मा. श्री. चंदुदादा कोल्हापूरकरसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. कळविण्यास आनंद होत आहे की मी आत्ताच अमेरिकेच्या वारीहून परतत आहे. कधी एकदा घरी येईन, असे झाले आहे. दहा दिवसांत होमसिक झालो! अमेरिकेहून विमानाने भारतात यायला खूप वेळ लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानाने हे अंतर काही तासांत काटता येईल...
जून 12, 2018
(एक पत्रव्यवहार...काल्पनिक!) प्रति, श्री. मा. ना. दादासाहेब पाटील, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, बॉम्बे विषय : गोपनीय व महत्त्वाचा. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी मी येत्या शनिवारी आठ-दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जात आहे. येथे (मुंबईत) प्रचंड...