एकूण 56 परिणाम
जून 20, 2019
सर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही नव्हेत. कडकीच्या काळात दिवस कसे काढावयाचे ह्याचे गुह्य आम्ही जाणून घेतले आहे. आमच्या दृष्टीने आर्थिक विवंचना संपुष्टात आली आहे. सांगावयास अतिशय आनंद...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
मे 31, 2019
आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत...
मे 25, 2019
कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे अचानक पाणावले डोळे... अंतर्मुख होऊन त्याने पाहिले सभोवार तेव्हा, झण्णकन गरगरले व्योम, भवताल आणि शंखगर्जनांच्या, रणदुंदुभींच्या विक्राळात धगधगून उठलेले कुरुक्षेत्र क्षणभर झाकोळले... रथस्तंभ घट्ट पकडून गलितगात्र पार्थाने किलकिल्या नेत्रांनी पाहिले...
मे 14, 2019
कुख्यात स्कारामांगाच्या छुप्या तळाचा शोध लावण्यासाठी जेम्स बॉंडला फक्‍त सात मिनिटे पुरेशी ठरली. अत्यंत दुर्गम भागात कुख्यात स्कारामांगाचा तळ असून तेथे बेकायदा शस्त्रास्त्रांचा साठा असून मारेकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते, हे गुपित कमनीय नवयौवना क्रमांक 16 ऊर्फ जुलियाने पहाटे पावणेपाच वाजता हळुवार...
मे 07, 2019
जै उतारावरी वाहे नीर। तळ गाठिता होई अधीर। उन्मळती दोन्ही तीर। उन्मादभावे।। जै नभातुनी ससाणा झेपें। निम्न तळींचे भक्ष्य ढापे। पातळी सोडोनि विक्षेपे। शांतवि भूक।। की नभांगणातील तारका। तुटोनी येता खाली क्षणिका। तेजोमय ग्रहगोलिका। होतसे माती।। जळत जळत पडली उल्का। वातावरणें दाहिली फुका। बघणारे बघती...
एप्रिल 23, 2019
तुम्हाला सांगायला हरकत नाही, परवा नाक्‍यावर भेटला बार्ड! कटिंग पीत बसला होता निर्ममपणे रहदारी पाहात ...पुढे केलं व्हिजिटिंग कार्ड! मला पाहताच चपापला, उगीच थोडा ओशाळला, ‘गुड मॉर्निग’ घातला, तर ओठांवर हसू आणत किंचितसा मिशाळला... खुर्चीखाली पाय हलवत (बुटकाच होता तसा) म्हणाला साहेबी तोऱ्यात, ‘‘गुड...
एप्रिल 13, 2019
आ दरणीय नमोजीहुकूम सतप्रतिसत प्रणाम. आपकी अनुग्या के अनुसार परचार के कार्य में पूरी क्षमता औ’ शक्‍ती के साथ लगा हूं. इस बखत बिहार के कृषकों के जीवन में हरित क्रांती लाने हेतु हम काम में जुटे है...(पुढील मजकुराचा तर्जुमा मराठीत...शुद्ध तूप संपले!) निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण देशभर फिरत आहात,...
एप्रिल 05, 2019
आमचे आराध्य दैवत जे की महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब ह्यांच्या म्यारेथॉन मुलाखतीनंतर आम्हाला चिक्‍कार बोलावणी येऊ लागली असून, ‘आमचीही मुलाखत घ्या’ अशी गळ घालण्यात येत आहे. बरेच पुढारी तूर्त आम्ही वेटिंग लिस्टवर टाकले असून, वन बाय वन एकेकाला घेऊ!! आम्ही घेतलेली साहेबांची मुलाखत देश पातळीवर...
मार्च 26, 2019
करवीरनगरीच्या तपोवन मैदानात आईतवारी झालेल्या महायुतीच्या अति अति अति अति विराट ऐतिहासिक सभेला आम्ही स्वत: जातीने उपस्थित होतो. महाराष्ट्रधर्म चोहीकडे जणू वोसंडून वाहत होता. बराचसा खुर्चीत बसला होता, उरलेला बराचसा मंचावर उपस्थित होता. मंचावरील सर्वांत मागल्या रांगेत डावीकडील माणसाच्या बाजूच्या...
मार्च 06, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ वद्य चतुर्दशी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा सुविचार : प्रयागतीर्थावरी। घेऊनि गंगेमध्ये बुडी। झाली धन्य कुडी। महाराष्ट्राची!! ........................... ।।श्री।। नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे. ) आजपासून जपाची नवी वही सुरू केली आहे....
मार्च 05, 2019
मुँछे हो तो अभिनंदन जैसी हो...वरना ना हो! विंग कमांडर अभिनंदन ह्यांच्या मिश्‍यांसारख्या (डिट्‌टो टु डिट्‌टो) मिश्‍या बाळगण्याची जबर्दस्त लाट देशभर आली असून आम्हीही त्या दृष्टीने कामाला लागलो आहो! गावोगावचे मिशीमोहन कारागीराच्या खुर्चीत बसून आपापल्या मिश्‍यांना अभिनंदनीय करून घेण्यासाठी (बिनपाण्याने...
फेब्रुवारी 22, 2019
ताई, तुम्हाला कुठली हवी? मोदी साडी की प्रियंका साडी? मार्केटमध्ये नवीन आहे ताई, पुन्हा येणार नाय अशी घडी! साडी दाखवू? बरं बरं! ‘‘अरे गुलाब, ते जुनं बंडल उघड बराच माल उरलाय, त्यातली एखादी चांगली घडी उलगड’’ ताई, ही बघा मोदी साडी आहे की नाही भारी? झगझगीत पॅटर्न, सुरतची प्रिंट रंगसंगती किती न्यारी?...
फेब्रुवारी 21, 2019
वझीर-ए-आजम-ए-हिंद जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसात आपली मुलाकात झाली नाही. बातचीत का रास्ता पुरा बंद झाल्याचे ध्यानात आल्यावर आखरी उपाय म्हणून मी ‘रेडिओ पाकिस्तान’वरून मेरी ‘दिल की बात’ आपल्यासमोर ठेवत आहे. आपल्यासारखा ‘दिल की बात’ हा रेडिओ टॉक करण्याचे मी ठरवले होते,...
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 05, 2019
(एक बोधकथा) पू र्वीच्या काळी जंगलात प्राणी राहत असत, तेव्हाची गोष्ट. हल्ली जंगलात नक्षलवादी, तेंदूपत्ता आणि चंदनतस्कर, तडीपार अशा लोकांचा वावर असतो असे म्हणतात. तेव्हा प्राणी असत. जे काही असेल ते असो. गोष्ट फार जुनी नाही, पण बोध घेण्याजोगी आहे. एका निबीड अरण्यात प्राण्यांचे राज्य होते व सारे...
जानेवारी 23, 2019
सकाळच्या वेळी महापौरांना अचानक जाग आली. पाखरांची किलबिल ऐकत ते पडून राहिले. तेवढ्यात त्यांच्या कानावर परिचित अशी समुद्राची गाज पडली. त्यांना हायसे वाटले. समुद्राचा केवढा आधार आहे, आपल्या मुंबईला!..आणि मुंबईच्या महापौरांनाही!! पण आज समुद्राच्या लाटा अशा रोंरावत का येत आहेत? सुनामि आली आहे का?...
डिसेंबर 08, 2018
वनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी ठरल्याप्रमाणे व अपेक्षेनुसार टी-वन ऊर्फ अवनी वाघिणीचा खून झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिला असून, सदर खून करणाऱ्या मारेकऱ्यास ऊर्फ...
डिसेंबर 01, 2018
प्रिय मित्र नानासाहेब- सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज पहिल्यांदा आम्ही ‘प्रिय’ अशा मायन्यासमेत आपणांस हे खत लिहितो आहो, ह्याची नोंद घ्यावी! ह्याचा अर्थ एवढाच की आम्ही खुशीत आहोत!! महामंडळांच्या खिरापतीत आमच्या तळहातावर दोन चमचे खिरापत (गपचूप) ज्यास्त ठेवलीत. नाणारची जमीन आपण (एकदाची) शापमुक्‍त...
नोव्हेंबर 28, 2018
माझ्या बालमित्रांनो, आज किनई मी तुमच्यासाठी ‘विन की बात’ हा कार्यक्रम सादर करणार आहे. आपले सर्वांचे लाडके नमोआजोबा दर महिन्याच्या शेवटच्या संडेला ‘मन की बात’ ह्या रेडिओ भाषणातून गप्पा मारतात ना, अगदी तश्‍शाच ह्या माझ्या ‘विन की बात’ गप्पा आहेत. ‘विन की बात’ म्हंजे विनोदकाका की बात! इंग्रजीत ‘विन’...