एकूण 53 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
स्थळ : मुंबईलगतचे निबीड आरेवन. वेळ : अरण्यात घड्याळ चालत नाही! प्रसंग : मचाणावरचा.पात्रे : निसर्गतज्ज्ञ व विख्यात निसर्ग छायाचित्रकार मि. यूडी थॅकरे व त्यांचे पुत्रवत शिष्य किंवा शिष्यवत पुत्र मास्टर ॲडी! यूडी : (डोळ्याला दुर्बीण लावून कुजबुजत) आह..! ओह!! एहे!! अयाया..!! ॲडी : (उत्सुकतेनं कुजबुजत)...
ऑगस्ट 14, 2019
मा. नानासाहेब फडणवीस यांसी, काल रात्री डिस्कवरी च्यानलवर आपल्या आदरणीय नमोजींचा ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ हा कार्यक्रम पाहिलात का? पाहिला असेलच. देशातील कोट्यवधी लोकांनी तो बघितला. मी तर बोलून चालून पडलो महाराष्ट्राचा वनमंत्री! मला तो बघणे भागच होते. त्या कार्यक्रमात आदरणीय नमोजींनी तात्पुरता भाला...
ऑगस्ट 13, 2019
जिम कॉर्बेटच्या निबीड अरण्यात एक पावसाळी सकाळ होत होती. नुकतेच उजाडत होते. ढगांच्या दाट पडद्याआड सूर्यदेव बेपत्ता होता. जोरदार पाऊस कोसळणार ह्या आशेने उंचच उंच अंजनाचे झाड मोहरून गेले होते. मी नदीच्या दिशेने चालत गेलो. जरा पुढे चालत गेले की नदीचा उतार लागतो. शूटिंगचा क्रू माझ्या आधीच पोचला होता. ‘‘...
जून 21, 2019
सर्वप्रथम आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. देव करो आणि आपणा सर्वांना दीर्घायुरारोग्याचा लाभ होवो. आपल्या हाताची बोटे स्वत:च्या अंगठ्याला हमेशा टेकोत आणि भोजनोपरांत वज्रासनात बसल्यावर पायास रग न लागो!! आपल्याला मयूरासनदेखील जमो आणि आपल्या ताडासनाच्या मुद्रेला कोणीही न हसो...
जून 20, 2019
सर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही नव्हेत. कडकीच्या काळात दिवस कसे काढावयाचे ह्याचे गुह्य आम्ही जाणून घेतले आहे. आमच्या दृष्टीने आर्थिक विवंचना संपुष्टात आली आहे. सांगावयास अतिशय आनंद...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
जून 05, 2019
प्रिय नानासाहेब यांसी, अवांतर बडबड करण्याची आम्हाला सवय नाही. थेट मुद्यावर आलेले बरे असते. राज्यातील निवडणुका तोंडाशी आल्या नसल्या तरी तशा टप्प्यातच आल्या आहेत. (हे म्हंजे सैपाकघरात तळणीला टाकलेल्या बटाटेवड्याच्या वासाने दिवाणखान्यातल्या पाहुण्यांना हैराण करण्यापैकी आहे! असो!!) मुद्दा एवढाच, की...
एप्रिल 18, 2019
आजची तिथी : विकारीनाम संवत्सरे चैत्र शु. त्रयोदशी. आजचा वार : बुधवार की गुरुवार? आजचा सुविचार : अच्छे दिन के मजे उडाओ, नाचो, खाओ, पिओ! आलबेल है सब कुछ लेकिन कौन लगावें व्हिडिओ? .................................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) निवडणुकीच्या धामधुमीत डायरी लिहायला...
एप्रिल 15, 2019
प्रति, मा. वनमंत्री, महाराष्ट्र राज्य,  प्रिय सुधीर्जी, सध्या मी निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. (तुम्ही जरा कमीच व्यग्र आहात, हेही मला दिसते आहे! पण ते असो.) तुम्ही राज्याचे वनमंत्री असल्याने तुम्हाला तातडीने लिहीत आहे. ताडोबा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये शिकाऱ्याने लावलेल्या तारांच्या सापळ्यात...
मार्च 30, 2019
प्रिय मित्र उधोजीसाहेब, शतप्रतिशत नमस्कार. तातडीचे व गोपनीय पत्र पाठवीत आहे. पत्र घेऊन येणारे गृहस्थ माझ्या विश्‍वासातले आहेत. काळजी नसावी! पत्र लिहिण्यास कारण की आमचे कमळाध्यक्ष आदरणीय मा. मोटाभाई हे स्वत: आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या गांधीनगर येथे जाणार आहेत. ‘‘तुम्ही सोबत याल का?’’ अशी...
फेब्रुवारी 28, 2019
बेहोषीच्या जलशांना इथे चढे रोज रंग जो तो रमे आपुल्याच मौजमजेमध्ये दंग अशा वेळी काळीज गा माझे फाटुनिया जाय कुठे आणि कशी आता असेल ती वेडी माय? शाळेच्या त्या प्रांगणात अधीमधी दिसते ती उभी राही गोंधळून भांबावली सरसुती काय तिला बोलायाचे, सांगायाचे आहे तिला पुन्हा पुन्हा विचारिते ‘पोरा, तू गा कितवीला?’...
फेब्रुवारी 25, 2019
जे श्री क्रष्ण! आजची आपली ही शेवटची "मन की बात'! पुन्हा तुम्हाला हा आवाज ऐकू येईल की नाही, हे निवडणुकीनंतरच ठरेल!! गेल्या 14 फेब्रुवारी रोजी आम्ही कुठे होतो? उत्तराखंडातील जिम कॉर्बेट अभयारण्यात होतो, एवढे धूसर आठवते. मधल्या चार तासांत आम्ही काय करत होतो, असा राष्ट्रीय सवाल आहे. त्याला उत्तर...
फेब्रुवारी 08, 2019
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० माघ शु. द्वितीया. आजचा वार : अनिवार. आजचा सुविचार : केल्याने उपोषण, मनुजा चातुर्य येतसे फार. ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) काल राळेगणला जाऊन आलो. सगळा दिवस तिथेच गेला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला काय...
फेब्रुवारी 05, 2019
(एक बोधकथा) पू र्वीच्या काळी जंगलात प्राणी राहत असत, तेव्हाची गोष्ट. हल्ली जंगलात नक्षलवादी, तेंदूपत्ता आणि चंदनतस्कर, तडीपार अशा लोकांचा वावर असतो असे म्हणतात. तेव्हा प्राणी असत. जे काही असेल ते असो. गोष्ट फार जुनी नाही, पण बोध घेण्याजोगी आहे. एका निबीड अरण्यात प्राण्यांचे राज्य होते व सारे...
जानेवारी 23, 2019
सकाळच्या वेळी महापौरांना अचानक जाग आली. पाखरांची किलबिल ऐकत ते पडून राहिले. तेवढ्यात त्यांच्या कानावर परिचित अशी समुद्राची गाज पडली. त्यांना हायसे वाटले. समुद्राचा केवढा आधार आहे, आपल्या मुंबईला!..आणि मुंबईच्या महापौरांनाही!! पण आज समुद्राच्या लाटा अशा रोंरावत का येत आहेत? सुनामि आली आहे का?...
डिसेंबर 18, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय? सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच! दादू : (करड्या आवाजात) मी कोण? सदू : (शांत सुरात) मीच! दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख! सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ? दादू : (डरकाळी मारत...
डिसेंबर 08, 2018
वनमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय : पांढरकवडा वनक्षेत्रातील नरभक्षक अवनी ऊर्फ टी-वन वाघिणीचा सरासर निर्घृण खून झाल्याचा अहवाल ह्याबाबत. आधी ठरल्याप्रमाणे व अपेक्षेनुसार टी-वन ऊर्फ अवनी वाघिणीचा खून झाल्याचा अहवाल राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने दिला असून, सदर खून करणाऱ्या मारेकऱ्यास ऊर्फ...
नोव्हेंबर 17, 2018
मु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या अथवा पाहिल्या (अथवा वाचल्या) असतील. स्वातंत्र्योत्तर काळात अशा किमान दीडेक हजार प्रकारच्या वाचवा मोहिमा निघाल्या, त्यातील काही वाचल्या, म्हंजे यशस्वी...
नोव्हेंबर 06, 2018
मिसेस वाघ : (पंजा उडवत) अहो, शुक शुक!... मि. वाघ : (गुरमाळलेल्या आवाजात) ऊंऽऽ.... मिसेस वाघ : (मिश्‍या फेंदारून) मेलं सतत काय ते लोळत पडायचं? उठा की आता!! मि. वाघ : (डोळे मिटूनच) अजून पाचच मिनिटं!! मिसेस वाघ : (वैतागून) दिवाळीच्या दिवसांत कसली मेली ती इतकी झोप? उठा, तोंडबिंड घ्या विसळून!! मि. वाघ...
ऑक्टोबर 06, 2018
कारभारी फडणवीसनाना यांस, हंगाम बहुत बडबोलीचा चालू आहे, असे साहेबकानीं आले आहे. उचलली जिव्हा टाळ्यांस लाविली ऐसे वर्तन उपेगाचे नाही, हे बरे ध्यानी धरणे. आपणांस राज्याचे कारभारीपद दिल्हे, ते मऱ्हाटी दौलतीचा रखरखाव निगुतीने व्हावा म्हणोन. फुकाफुकी बेलपत्रे वाहत हिंडण्याची हौस असेल, तर काशीयात्रेस...