एकूण 34 परिणाम
जून 21, 2019
सर्वप्रथम आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. देव करो आणि आपणा सर्वांना दीर्घायुरारोग्याचा लाभ होवो. आपल्या हाताची बोटे स्वत:च्या अंगठ्याला हमेशा टेकोत आणि भोजनोपरांत वज्रासनात बसल्यावर पायास रग न लागो!! आपल्याला मयूरासनदेखील जमो आणि आपल्या ताडासनाच्या मुद्रेला कोणीही न हसो...
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
एप्रिल 24, 2019
प्रिय नवमतदार वाचकांनो, जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या महासोहळ्याला (कधीच) प्रारंभ झाला असून, ह्या सोहळ्यात सारा देश (टप्प्याटप्प्याने) सहभागी होत आहे. आतंकवाद्यांकडे जसे ‘आयईडी‘ नावाचे स्फोटक असते, तसे आपल्याही खिशात ‘व्होटर आयडी’, असे उद्‌गार आपल्या सर्वांचे महालाडके प्रधानसेवक श्रीमान नमोजी...
एप्रिल 11, 2019
सां प्रतकाळी देशात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून प्रचार शिगेला पोचला आहे, हे आपल्याला माहीत आहेच. अत्यंत जबाबदारीने नवीन सरकार निवडण्याची ही वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी आपले डोके शांत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: पहिल्यांदाच हौसेने मतदान करण्यासाठी उत्सुक असलेल्या नवमतदारांनी समजून उमजून आपला...
मार्च 04, 2019
"नया भारत नीडर, निर्भीक अने निर्णायक छे...सांभळ्यो?'' आमचे तारणहार (आमचे काय, सर्वांचेच!) श्रीमान नमोजी ह्यांनी अभिमानाने सांगितले, आणि आम्ही एकदम सांभळलो. छाती फुगून आली. नजरेत आत्मविश्‍वास तरळला. पायात बळ आले. पण हा इफेक्‍ट जेमतेम तीनेक मिनिटेच टिकला. तीन मिनिटांनंतर आम्ही पुन्हा मूळ अवस्थेत आलो...
फेब्रुवारी 05, 2019
(एक बोधकथा) पू र्वीच्या काळी जंगलात प्राणी राहत असत, तेव्हाची गोष्ट. हल्ली जंगलात नक्षलवादी, तेंदूपत्ता आणि चंदनतस्कर, तडीपार अशा लोकांचा वावर असतो असे म्हणतात. तेव्हा प्राणी असत. जे काही असेल ते असो. गोष्ट फार जुनी नाही, पण बोध घेण्याजोगी आहे. एका निबीड अरण्यात प्राण्यांचे राज्य होते व सारे...
डिसेंबर 18, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय? सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच! दादू : (करड्या आवाजात) मी कोण? सदू : (शांत सुरात) मीच! दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख! सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ? दादू : (डरकाळी मारत...
डिसेंबर 03, 2018
""जगभर मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय परिषदा, परिसंवाद वगैरे घडत असतात. विचारांची देवाणघेवाण होते. करारमदार होतात. व्यापारास चालना मिळून विकसनशील देशांसाठी नव्या संधी निर्माण होतात. मानवजातीच्या सर्वंकष विकासासाठी ह्या प्रकारच्या शिखर परिषदांची नितांत आवश्‍यकता आहे, तुम्हीही अशा परिषदांना जायला हवे,'' हे...
ऑगस्ट 17, 2018
भारताच्या राजकारणातील समन्वयाचा, संवादाचा स्वर क्षीण होत असताना अटलबिहारी वाजपेयींचे आपल्यात नुसते असणेदेखील दिलासादायक होते; पण आता तो आधारही नाहीसा झाला आहे. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकीय इतिहासातील एका देदीप्यमान अध्यायाची सांगता झाली आहे. वसाहतींच्या जोखडातून मुक्त झालेल्या देशांमध्ये...
जुलै 20, 2018
प्रीय विनोदकाका ह्यांस शी. सा. न. घर सजाने के लिये हम नर्सरीसे फूल लाते है और घर के फूल नर्सरी में भेजते है... अशी पोएम तुम्ही केली ना? वाचून मी खुप रडलो. विनोदकाका, तूम्ही मला खुप आवडता. लहान मूलांना शाळेत पाठवणारे लोक वाईट असतात. मि शाळेत जात नाही म्हणून मला बाबांनी छत्रीने मारले. मला राग आला....
जुलै 13, 2018
प्रति, सर्वपक्षीय सहकारी- शतप्रतिशत प्रणाम. आपल्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर घोडदौड करत असून, दिवसेंदिवस वेगाने प्रगती करत आहे. (ह्या वाक्‍याला तसा काही अर्थ नाही, पण बरे वाटते इतकेच!) तथापि, इतकी प्रगती करूनही अनेक लोकांना त्याचा आनंद घेता येत नाही, ह्याचे दु:ख होते...
जुलै 06, 2018
नमोजी : (वाजणारा फोन हळूच उचलत) जे श्री क्रष्ण...कोण छे?  आम आदमी : (खाकरत) मैं हूं जी!!  नमोजी : (पुन्हा हळूच) मैं माने?  आम आदमी : (पुन्हा खाकरत) मैं आम आदमी बोल रहा हूं जी!  नमोजी : (संशयानं) ओळखाण लागत नाय! कोण छो तमे? जरा डिटेल मां बतावो!!  आम आदमी : (खुलासा करत) कशी लागणार ओळख! माझा आवाज...
जून 29, 2018
प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्यांना प्लास्टिकच्या पिशवीत कोंबून तिला डब्बलटिब्बल गाठ मारण्याची उबळ आम्हाला वारंवार येत असून केवळ हवेच्या दाबामुळे प्लास्टिकबंदीच्या निर्णयात सरकारला एक कदम मागे घ्यावा लागल्याने आम्ही खूप कष्टी झालो आहो. प्लास्टिकचा बोळा निघाल्याने आता विकासाचा प्रवाह जोरात वाहू लागून...
जून 12, 2018
(एक पत्रव्यवहार...काल्पनिक!) प्रति, श्री. मा. ना. दादासाहेब पाटील, महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मलबार हिल, बॉम्बे विषय : गोपनीय व महत्त्वाचा. कळविण्यास अत्यंत आनंद होतो की महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी मी येत्या शनिवारी आठ-दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जात आहे. येथे (मुंबईत) प्रचंड...
जून 11, 2018
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (एकशे आठ वेळा लिहिणे) एकही बदली न करता परदेश दौऱ्यावर सटकण्याची ही माझी चार वर्षांतली पहिलीच खेप असावी! निघताना सटासट हातासरशी डझनभर बदल्या करून घ्याव्यात असे वाटले होते. पण आता बदल्या उरल्याच नाहीत, असे पीएने सांगितल्याने नाइलाज झाला. मुंबईचा पाऊस वैताग आणतो. हवामान...
जून 09, 2018
ज्याचेसाठी केला। होता अट्टहास। जीव कासावीस। झाला होता।। तेचि सारे आता। येतसे फळाला। लागती गळाला। काही मासे।। अच्छे दिनांसाठी। छेडियले युद्ध। आम्ही वचनबद्ध। जनतेशी।। गचांडीवरला। हटविला ‘हात’। आणि मन की बात। साध्य केली।। मतदारबंधो। आम्ही आहो छान। आणू अच्छे दिन। विनवितो।। ऐसेचि सांगोनी। ध्येय साध्य...
मे 03, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सर श्रीशके १९४० वैशाख कृष्ण द्वितीया. आजचा वार : ए वेडनसडे! आजचा सुविचार : सुवर्णाला मुशीतील विस्तवाचे भय नसते. त्याला दु:ख असते ते गुंजेत मोजले जाण्याचे- एक सुभाषित (शाळेतील फळ्यावरले...) ....................................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा...
एप्रिल 16, 2018
बने, बने, लोळत काय पडलीयेस अशी? चल, आवर पटकन...सामान बांध! आपल्याला किनई जत्रेला जायचंय! कुठली जत्रा म्हणून काय विचारत्येस? अगं, नाणारच्या जत्रेला जायचंय आपल्याला... ना-णा-र! नानार नाही!! आपल्या फडणवीसनानांमुळे त्या गावाला नानार म्हणतात, असं कोणी सांगितलं तुला?...नाणार कुठेशी आलं म्हणून काय...
मार्च 27, 2018
''ग्हब्रीघॉये आहा याहू न भावा,'' गडकरीसाहेबांनी काढलेले हे उद्‌गार ऐकून बाकी कोणी बुचकळ्यात पडले असते, पण आम्ही नाही. समोरच्या प्लेटीतील गर्मागर्म कचोरी मुखात जाण्यासाठी धडपड करत नसती, तर 'गरीबाघरच्याले असं छळू नये, बापा,' हा त्यांचा उदात्त एवं स्वच्छ उद्‌गार कोणालाही ऐकू आला असता. पण आमचे कान तयार...
फेब्रुवारी 03, 2018
गेलाबाजार डझनावारी अर्थतज्ञ पैदा झाले असून, त्यांस डझनावारी टीव्ही च्यानलांवरून अर्थसंकल्पाचे सखोल विश्‍लेषण करताना पाहून आम्ही हतबुध्द झालो आहो, क्षुब्धबुध्द झालो आहो, विषण्णबुध्द झालो आहो!! (हल्ली कोणी असले शब्द वापरते काय? आम्ही थोरच आहो, ह्याचा हा पहिला पुरावा!!) इतक्‍या प्रचंड लोकसंख्येला...