एकूण 49 परिणाम
जून 08, 2019
बकाल झाली पखाल येथील रिक्‍त मनाची शुभ्र मेघुटे चरचरणाऱ्या चराचरामधि जीवित्वाची शिळी संपुटे कंठकोरड्या आकांताला मुक्‍या मनाची तुटकी ढाल दुष्काळाचे गाणे म्हणता भवतालाचा चुकतो ताल निष्पर्णाच्या फांदोऱ्यावर घरटे शेणामेणाचे मुग्ध कावळी तशात बघते स्वप्न आपुल्या पिल्लांचे उडता उडता एक पारवा धुळित कोसळे...
मे 17, 2019
नमोजीभाई : (चमकून) जे श्री क्रष्ण...क्‍यारे आव्या मोटाभाई : (घाम पुसत बसून घेत) अमणाज! नमोजीभाई : (आपुलकीने चौकशी करत) शुं कहे छे आपडो बंगाल? मोटाभाई : (पडेल आवाजात) सारु छे! नमोजीभाई : (दिवास्वप्न बघत) तमे तो बहु मेहनत करो छो, मोटाभाई! मोटाभाई : (गुडघे चोळत) थाकी गया!! नमोजीभाई : (सहानुभूतीने) हवे...
मे 15, 2019
प्रिय नामदार मित्र, निवडणूक प्रचाराच्या सभा आटोपून परतलो असताना काल रात्री सुमारे अडीच वाजता अचानक मला (स्वप्नात) दृष्टांत झाला. एक तेजस्वी आकृती समोर आली आणि म्हणाली, ‘‘वत्सा, तुझ्या मनात खूप विखार भरला आहे. तो काढून टाक. साऱ्या जगताकडे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने पहा! हे जग तुला प्रेमानेदेखील...
एप्रिल 20, 2019
हे मौला, तू सोडव गा ही अवकाळाची गणिते अंधाऱ्या वाटेवरती तू पेटव ना ते पलिते भेगाळ भुईच्या पोटी दडलेले उष्ण उसासे माध्यान्ही कण्हते सृष्टी शेवटल्या श्‍वासासरिसे विहिरींचे सुकले कंठ वाऱ्याला नुरले त्राण माळावर निवडुंगाचे करिते का कुणि अवघ्राण? भेगांचे दूर नकाशे भूवरी कोण आखेल? शुष्काच्या साम्राज्याची...
मार्च 09, 2019
बेटा : (अत्यंत उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण..! मम्मा, आयॅम बॅक!! मम्मामॅडम : (कामात व्यग्र) हं...हं! बेटा : (निरुत्साहाने) ‘हंहं’ काय? आयॅम बॅक हे माझं पोलिटिकल स्टेटमेंट आहे!! मम्मामॅडम  : (नव्या उमेदीने) आता स्टेटमेंटची नाही, ॲक्‍शनची गरज आहे!! साडेचार वर्षं ज्याची वाट पाहत होते, ते इलेक्‍शन...
मार्च 08, 2019
ब्रेड अँड रोझेस, बाई ब्रेड अँड रोझेस! घोषणा ऐकून पोरी अजून किती उत्साहित होतेस? शंभर वर्ष होऊन गेली अजूनही तुझे तेच! तेच कष्ट, तेच दु:ख तश्‍शीच लागते ठेच! तुझ्या आधीच्या काही जणी होत्या घास ‘‘नुसता घास नको, शेठ हवा गुलाबाचा सुवास!’’ पोटासाठी घास हवा, गंध! अन्यायाच्या कोठडीत नशीब आहे बंद! ब्रेड अँड...
फेब्रुवारी 15, 2019
कृष्णकुंजगडावर आज सक्‍काळच्या पारीच जाग होती. राजे उठून बसले असावेत, हे इतिहासाने ओळखले. इतिहासाचे ह्या इलाख्यावर भारी लक्ष असते. कां की, इथूनच साऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाची मंत्रणा चालते. इतिहासाने दुर्बीण डोळियांस लावोन पाहिले. राजे उठून स्नानादी कर्मे आटोपून फ्रेशावस्थेत व्यंग्यचित्र...
फेब्रुवारी 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. (बुद्रुक)  (सौभाग्यवती कमळाबाई (त्यातल्या त्यात) लगबगीने हालचाली करत आवराआवर करत आहेत. दासदासींना सूचना देत आहेत. "चला,चला, तयारीला लागा!', बाई, बाई कित्ती उशीर झाला...आवरायला नको का?' वगैरे बडबड एकीकडे चालू आहे. दुसरीकडे सारखं दरवाजाकडे टुकून पाहात आहेत. अब आगे...) ...
जानेवारी 17, 2019
पहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं मोडलेल्या, प्रेटोरियन दंडुक्‍याने पिचलेल्या रोमन साम्राज्यात आधी झाली असह्य कुजबूज, मग झाली आदळआपट आणि त्यातूनच पेटला जनतेचा जळजळता हुंकार. ‘‘नीरोनं जायला...
डिसेंबर 18, 2018
(अर्थात सदू आणि दादू...) दादू : (संतापून फोन फिरवत) हलो...कोण बोलतंय? सदू : (शांतपणे फोन उचलत) मीच! दादू : (करड्या आवाजात) मी कोण? सदू : (शांत सुरात) मीच! दादू : (दातओठ आवळत) सद्या, माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव! माझ्या वाट्याला गेलास तर याद राख! सदू : (थंडपणाने) मी कशाला आड येऊ? दादू : (डरकाळी मारत...
डिसेंबर 13, 2018
बेटा : (जबरदस्त एण्ट्री घेत) टाडाऽऽऽ...टाडा टाडा टाडाऽऽऽ...!!! मम्मामॅडम : (हर्षभरित होत्साती) आओ मेरे लाल!! जियो मेरे लाल!!.. तुझ्यासाठी काय करू? तुला कुठे कुठे ठेवू? बेटा : (खुशीत) क्‍यों दिखाया की नहीं जलवा!! मम्मामॅडम : (दोन्ही गालांवर हात ठेवत) खर्रर्रच! मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू?...
डिसेंबर 05, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० कार्तिक कृष्ण द्वादशी. आजचा वार : ट्युसडेवार. आजचा सुविचार : युतीचे तोरण चढे...गर्जती तोफांचे चौघडे! ............................... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कालचा दिवस सुवर्णाक्षरात कुठेतरी लिहून ठेवावा लागेल. मन कसे तृप्त झाले...
ऑक्टोबर 17, 2018
आजची तिथी : विलंबीनाम संवत्सरे श्रीशके १९४० आश्‍विन शुद्ध सप्तमी. आजचा वार : ट्यूसडेवार. आजचा रंग : ये लाल रंग कब मुझे छोडेगाऽऽ..! आजचा सुविचार : साकी की क्‍या जरुरत, क्‍या मानी है मयकदे के,                       मेरे दर पे आज मेरी सरकार आ रही है... ......... नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८...
सप्टेंबर 29, 2018
संधिकालच्या अनंगरंगी अंतरातल्या व्योमपटावर रात्र साकळे दहादिशांतुन वस्तीमधल्या छताछतांवर चांदणरात्री चांदणवेळी, फुलास आल्या चंद्रवेलिवर रक्‍तदेठिच्या पहाटपंखी प्राजक्‍ताच्या शुभ्रफुलांवर क्षितिजावरती फुटे तांबडे त्या दिवसाच्या प्रारंभावर चराचराच्या श्‍वासामध्ये आणि तयाच्या उच्छ्वासांवर पहाटसमयी...
सप्टेंबर 18, 2018
नानासाहेब फडणवीस यांसी, कोपरापासून जय महाराष्ट्र. हे आम्ही काय ऐकतो आहो? निवडणुकीनंतरही मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेन, असे तुम्ही नागपुरात जाऊन म्हटलेत? ही खबर आल्यापासून आमच्या संतापास पारावार राहिलेला नाही, नींद सफै उडाली असून आमच्या मातोश्रीगडावरील वातावरण तंग झाले आहे. नाना, नाना, असे आपण...
ऑगस्ट 04, 2018
वझीर-ए-आजम-ए-हिंदोस्तॉं, मसीहा-ए-आम जनाब नमोजी, तहेदिलसे (याने की : हृदयतळापासून) आपल्याला शुक्रिया (धन्यवाद) अदा करण्यासाठी हे खत लिखत (लिहीत) आहे. मेहेरबानी असावी. "एक ना एक दिन पाकिस्तानचा वझीरे-आजम बनेन' असे ख्वाब (स्वप्न) मी बचपनसे (बालपणापासून) पाहत होतो. ते आता साकार झाले आहे, ही उपरवाल्याची...
ऑगस्ट 03, 2018
""राजे, जिंकलंत! अखेर सत्याचा विजय झाला...,'' मुजरा घालत आम्ही घाईघाईने सुखवार्ता राजियांच्या कानावर घातली. वार्ता कानावर घालून आम्ही डोळे मिटून उभे राहिलो. वाटले होते, एखादे सोन्याचे कडे आपल्या अंगावर भिर्कावले जाईल!! पण कसचे कसचे!! त्याऐवजी ""कायाय?'' अशी रागीट चौकशी तेवढी झाली. चूक आमचीच होती....
जुलै 16, 2018
सकल सौभाग्यवती सालंकृत पैठणीअवगुंठित कमळाबाई अंत:पुरात रागेरागे येरझारा घालत आहेत. मधूनच बंद दाराकडे पाहत आहेत. दाराशी दबक्‍या पावलाने साक्षात उधोजीराजे येतात. अब आगे...  उधोजीराजे : (नाजूकपणे कडी वाजवत)...कडी!  कमळाबाई : (बंद दाराकडे पाहत) हुं:!!  उधोजीराजे : (मिशीवर बोट फिरवत) आम्ही आलो आहोत......
जुलै 14, 2018
(चाल : गीताई) ऐका ऐका सुजन ऐका कहाणी थोर ही असे कानास टोचली तरिही, ओठाशी येतसे हसे गीताग्रंथ वितरणी या, घडले ते महाभारत उदंड पेटला वाद, भलते झाले पराजित भगवद्‌गीता ग्रंथ मोठा तत्त्व-सत्त्व यशोधरा वांचता नित्य ही गीता, गोची जाई दिगंतरा जीवनाचे कळे गुह्य, बदल होई बाह्यांतरी गीतेने साधते सर्व, स्वप्न...
जून 27, 2018
(एक पाणीदार पत्रव्यवहार...) आ दरणीय मा. साहेब (वांद्रे) यांस, जय महाराष्ट्र. घाईघाईने पत्र लिहिण्यास कारण की मी एक साधासुधा महापौर आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत मजबूत पाऊस पडून काही ठिकाणी पाणी तुंबल्यासारखे दिसले. गेल्या चोवीस तासांत मुंबईत २३१ मिमी इतका पाऊस नोंदला गेला असला, तरी कुलाबा, भायखळा...