एकूण 20 परिणाम
मे 17, 2019
नमोजीभाई : (चमकून) जे श्री क्रष्ण...क्‍यारे आव्या मोटाभाई : (घाम पुसत बसून घेत) अमणाज! नमोजीभाई : (आपुलकीने चौकशी करत) शुं कहे छे आपडो बंगाल? मोटाभाई : (पडेल आवाजात) सारु छे! नमोजीभाई : (दिवास्वप्न बघत) तमे तो बहु मेहनत करो छो, मोटाभाई! मोटाभाई : (गुडघे चोळत) थाकी गया!! नमोजीभाई : (सहानुभूतीने) हवे...
मे 11, 2019
प्रिय बोंधु ओरोबिंदोबाबू, नोमोश्‍कार, दिल्लीत प्रोचार जोरात सुरू आहे हे कळले. उघड्या जीपमोधून फिरताना काळजी घ्यावी. रात्र वैऱ्याची आहेच; पण दिवस राक्षसाचा आहे! एका माणसाने जीपच्या बॉनेटवर चढून तुम्हाला लोकशाही थप्पड लगावली, ते बोघून दु:ख झाले. आपल्या महागठबंधनचे शोत्रू किती भोयोंकर आहेत, ह्याची...
मे 04, 2019
नेमकी तीथ सांगू? विकारी संवत्सरातील चैत्रात कृष्णपक्षातली द्वादशी होती. अगदी टळटळीत दुपार. उन्हे मी म्हणत होती. सूर्य आग ओकत होता...कृष्णकुंजगडाच्या पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड! मोठी नामी वस्ती!! राजियांचा गड हे तो पार्काडाचे हृदय. राजा बोले, पार्काड हाले!! पण द्वादशीचे दिशी मात्र गडावर सक्‍...
मार्च 30, 2019
प्रिय मित्र उधोजीसाहेब, शतप्रतिशत नमस्कार. तातडीचे व गोपनीय पत्र पाठवीत आहे. पत्र घेऊन येणारे गृहस्थ माझ्या विश्‍वासातले आहेत. काळजी नसावी! पत्र लिहिण्यास कारण की आमचे कमळाध्यक्ष आदरणीय मा. मोटाभाई हे स्वत: आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या गांधीनगर येथे जाणार आहेत. ‘‘तुम्ही सोबत याल का?’’ अशी...
जानेवारी 11, 2019
आर्थिक मागास ऊर्फ कडका विधेयक पार्लमेंटात पास झाल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला, अश्रूनीर डोळां वाहू लागले, अक्षरश: भरून पावलें...एरव्ही आम्हा कडका कंपनीला कोण विचारतो? परंतु आपल्या "घर्कानघाटका' अवस्थेचा सहानुभूतीने विचार करणारा कुणीएक देवदूत दिल्लीत (जाऊन) बसला आहे, ह्या कल्पनेने आधार...
नोव्हेंबर 26, 2018
धूळधुरोळा उडवत, विजयपताका फडकवत विद्युतवेगाने दौडणाऱ्या सप्तशुभ्र अश्‍वांच्या दिव्यरथात बसून पवित्र नगरीकडे निघालेल्या त्याच्या भक्‍तिरथाची चाके अंगुळभर हवेतच गरगरत होती... रथाच्या मध्यभागी रथदंडाचा आधार धरत खांद्यावरील अजेय धनुष्याचा, पाठीवरील अक्षय्य भात्याचा समर्थ भार सांभाळणाऱ्या त्या...
सप्टेंबर 08, 2018
सूडभावनेने धगधगणाऱ्या अंबेच्या मुखातून उधळल्या, सहस्रावधी संतप्त ठिणग्या, दात-ओठ खात तिने झटकला तिचा उसळणारा केशसंभार, म्हणाली, ‘‘ हे देवव्रता, चुलीत घाल तुझी ती ब्रह्मचर्याची ढोंगी प्रतिज्ञा... ही प्रतिज्ञा नव्हे, पळवाट आहे, पळवाट! तुझ्या अहंमन्य पुरुषार्थामुळे माझे आयुष्य झाले राखेसमान, मी सूड...
ऑगस्ट 21, 2018
आभाळात घिरट्या घालणाऱ्या गिधांच्या थव्याकडे बघत धनुर्धर पार्थाने हताशेनेच हलवली मान, परंतु युगंधराच्या मागोमाग तो चालू लागला निमूटपणाने. दूरवर पिप्पलीच्या वृक्षातळीं कुरुंचा जत्था दिसत होता... उत्तरायणाच्या प्रतीक्षेत पडलेल्या पितामह भीष्मांचा शरपंजर हळूहळू दृग्गोचर होऊ लागला, तसे पेटकेच येऊ लागले...
ऑगस्ट 03, 2018
""राजे, जिंकलंत! अखेर सत्याचा विजय झाला...,'' मुजरा घालत आम्ही घाईघाईने सुखवार्ता राजियांच्या कानावर घातली. वार्ता कानावर घालून आम्ही डोळे मिटून उभे राहिलो. वाटले होते, एखादे सोन्याचे कडे आपल्या अंगावर भिर्कावले जाईल!! पण कसचे कसचे!! त्याऐवजी ""कायाय?'' अशी रागीट चौकशी तेवढी झाली. चूक आमचीच होती....
जुलै 03, 2018
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका ह्यापुढे होणार नाहीत, ही खबर आल्यावर आमच्या मस्तकावर शिळा कोसळली आहे, हृदय शतश: विदीर्ण झाले आहे, मन फाटून गेले आहे!! नियतीने हा काय खेळ चालवला आहे? गेली ९१ संमेलने निवडणुकांसहित विनासायास पार पडली. सेंच्युरीला अवघी आठ संमेलने बाकी...
मे 30, 2018
सदू : दादूराया, समोर टाकीवर कोण चढलंय रे? दादू : मी इथं तुझ्या शेजारी उभा आहे, त्याअर्थी तो मी नव्हेच ! सदू : हा विनोद होता? दादू : नाही ! टोमणा होता !! सदू : बरं ! मग टाकीवर कोण चढलं असेल? दादू : धर्मेंद्र असावा ! सदू : कोण धर्मेंद्र? दादू : ‘शोले’मधला वीरू ! सदू : मग बसंती कुठे आहे? दादू :...
मार्च 01, 2018
प्रिन्स विक्रमादित्य : (दार ढकलत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन? उधोजीसाहेब : (जड अंत:करणाने) कशाला? नको! विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्यानं) एक गुड न्यूज द्यायची होती!! उधोजीसाहेब : (कटवत) ही गुड न्यूज ऐकायची वेळ नाही! आम्ही ऑलरेडी दु:खात आहोत!! विक्रमादित्य : (कुतूहलानं) तुमच्याकडे बॅड न्यूज आहे...
फेब्रुवारी 24, 2018
(अर्थात, पुन्हा सदू आणि दादू) दादू : सदूऽऽऽ... सदू : अंऽऽऽ... दादू : अरे, मी भाऊ आहे ना तुझा? सदू : हो, दादूराया!! दादू : मग का रे असा वागतोस सूडकऱ्यासारखा? सदू : आता काय केलं मी? रोजगाराच्या नवनव्या संधी शोधणाऱ्या माणसाला सूडकरी म्हणतात का? दादू : तू जे...
फेब्रुवारी 14, 2018
खरेच नाही मजला सखये आठवत काही हल्ली हल्ली जुनी पेठ ती,-बोळ हिंडता उगाच चुकतो मी मग गल्ली! आठवते तुज अजून वेडे? शाळेमधली प्रभात फेरी? मला न काही स्मरते आता, कमाल आहे तुझी मेमरी! आठवतो तुज? तेव्हाचा तो बघाबघीचा खेळचि नवथर? माझी...
ऑक्टोबर 03, 2017
दसऱ्याचे दिशी शिलंगणाचे सोने मन:पूत लुटून आम्ही सारे कडवट शिवसैनिक संतुष्ट मनाने शिवतीर्थावरोन परतत असताना ते नाट्य घडले. त्याचे जाहाले असे की- पाठीमागच्या (जरा खालील) बाजूस लागलेला चिखल झटकत आम्ही मैदानातून उठलो, आणि उच्छाव सोडून निघालो. तीर्थाच्या काठावरच वसले आहे "कृष्णभुवन'...तेथे प्रत्येक्ष...
सप्टेंबर 25, 2017
सांप्रतकाळी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात (पक्षी - मुंबईत) पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीविरोधात आंदोलनाचा भडका उडाला असून, त्यातील एक मशाल आमच्या हाती आहे, हे आम्ही येथे उघडपणे जाहीर करीत आहो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव गडगडत असताना आमच्या भारत देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या रेटने कहर केला...
मे 16, 2017
डेक्‍कनवरील चितळेबंधू ह्यांच्या सुप्रसिद्ध दुकानी दुपारी एक ते चार ह्यावेळेत बाकरवडी आणि तत्सम पदार्थ उपलब्ध राहतील, अशी घोषणा एका बंधूने ठाण्यात जाऊन केल्याचे निदर्शनास आले आहे. गेले, ते दिन गेले!! आरामाची वेळ संकुचित होणे, हे निश्‍चितच अच्छे दिनांचे लक्षण मानता येणार नाही. कोठल्याही बाहुबलीने...
मे 12, 2017
वाचकहो, शाळकरी मुलांसाठी आमचे हृदय आज शतप्रतिशत विदीर्ण झाले आहे. द्रवले आहे. हरवले आहे. ती का मुले आहेत? फुलेच ती!! देवाच्या बागेतील ताटव्यातली छोटी छोटी फुले!! गोड गोजिरी आणि निरागस! मुले कसली, सोनेरी चांदीत लपेटलेली छान छान चाकलेटेच ती! ते का क्‍यालरीज मोजायचे वय आहे? ते तर खेळण्या-बागडण्याचे...
मे 03, 2017
हवामानाचा अंदाज आला नाही की अनर्थ होतो. ह्या बेभरवशी हवामानामुळेच आज महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. सुगीच्या दिवसात थोडे उगी बसावे, त्या काळात महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आज तुरीच्या पोत्यांवर पहारे देत बसावे लागत आहे, ह्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? ये जालीम हवा!! हवेसारखी घातकी...
एप्रिल 12, 2017
मित्रवर्य नानासाहेब- शेवटी (तुमच्या आग्रहानुसार) दिल्लीत येऊन पोचलो. आता (तरी) तुमचा जीव भांड्यात पडला असेल. दिल्लीहून समग्र वृत्तांत कळवा, असे तुम्ही बजावल्याने हे पत्र पाठवत आहे. सुरवातीपासून सांगतो. त्याचे असे झाले की, गेल्या गुरुवारी तुमचे शहंशाह अमितशहा ह्यांचा फोन (मातोश्रीवर) आला. तो चुकून...