एकूण 775 परिणाम
जून 18, 2019
बाळासाहेबांना सकाळी जाग आली. काय करायचे आहे लौकर उठून? असा विचार करून त्यांनी कूस बदलली. तेवढ्यात आठवले, आज अधिवेशनाचा दिवस! मा. बाळासाहेब ताडकन उठून बसले. बाप रे! आज केवढे तरी काम आहे... दुष्काळावरून सरकारला धारेवर धरायचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांबद्दल काय केलेत ते सांगा, असा खडसून जाब...
जून 17, 2019
स्थळ : विमान टु अयोध्या, हवेत!  काळ : तोदेखील हवेतच!  प्रसंग : उडता!  पात्रे : आपलीच लाडकी!!  (...विमान उडत आहे. मा. उधोजीसाहेब डोळे मिटून काहीतरी पुटपुटत आहेत. अधून मधून ते कुर्सी की पेटी नीट बांधली आहे की नाही, हे तपासून बघत आहेत. त्यांच्या शेजारच्या सीटवर चि. विक्रमादित्य खिडकीतून खाली बघत आहेत...
जून 15, 2019
ती विकारी संवत्सरातली ज्येष्ठ शुद्ध द्वादशी होती. तशी इतिहासात मुळी नोंदच आहे. ह्या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रात कोणाला ठाऊक नाही? सारा महाराष्ट्र हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक होता. असो. सकाळीच एक सर येऊन गेली होती. हवा ढगाळ होती हे उघडच आहे. ढगाळ नसताना सर कुठून येणार? साधे लॉजिक आहे. सर येऊन...
जून 14, 2019
वझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की मराठीमध्ये लिखतो आहे, कारण ही जुबान महाराष्ट्रातल्या अनेक मराठी अवामलाही बदन येत नाही, असे मालूम पडले आहे. (खुलासा : ‘धड’ ह्या लब्जचा अर्थ ऊर्दू-मराठी डिक्‍...
जून 13, 2019
मुख्यमंत्री श्रीमान नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत नमस्कार. मी आपल्या पक्षाचा साधासुधा व निरलस व निरपेक्ष कार्यकर्ता असून अन्य आमदारांप्रमाणेच मलाही लोकांनी मोदीलाटेत निवडून दिले व आमदार केले आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी गेली साडेचार वर्षे लोकांची निरपेक्ष व निरलस सेवा केली. (पदाची...
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जून 11, 2019
स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान. वेळ : ठरलेली! काळ : ठहरलेला! प्रसंग : गोठलेला. पात्रे : सौभाग्यलंकारमंडित वज्रचूडेमंडित सौभाग्यवती कमळाबाईसाहेब आणि साक्षात राजाधिराज उधोजी महाराज! ............... (बाईसाहेबांच्या अंत:पुरात गडबड उडाली आहे. झोपाळ्यावर टेचात बसून बाईसाहेब भराभरा फर्माने रवाना...
जून 10, 2019
हे करुणाकरा, तू आहेस का?  आणि असलास, तर कुठे आहेस?  दीडवितीच्या ह्या दीडशहाण्या  दुनियेत दीडदमड्यांसाठी  दीडदोन वर्षांच्या लहानग्यांच्या  मुरगळणाऱ्या,  नकोश्‍या अर्भकांना जन्मताच  बादलीत बुडवणाऱ्या,  येणाऱ्या पिढ्यांची जागीच खुडणी  करू पाहणाऱ्या  ह्या...ह्या...ह्या...महान देशात  जेव्हा दहाएक...
जून 08, 2019
बकाल झाली पखाल येथील रिक्‍त मनाची शुभ्र मेघुटे चरचरणाऱ्या चराचरामधि जीवित्वाची शिळी संपुटे कंठकोरड्या आकांताला मुक्‍या मनाची तुटकी ढाल दुष्काळाचे गाणे म्हणता भवतालाचा चुकतो ताल निष्पर्णाच्या फांदोऱ्यावर घरटे शेणामेणाचे मुग्ध कावळी तशात बघते स्वप्न आपुल्या पिल्लांचे उडता उडता एक पारवा धुळित कोसळे...
जून 07, 2019
स्थळ : मातोश्री वनविश्रामगृह, वनक्षेत्र वांद्रे सर्कल. वेळ : ...तशी आरामाचीच. काळ : (गुहेत) पहुडलेला. पात्रे : व्याघ्रसम्राट उधोजीसाहेब आणि तेजतर्रार चि. विक्रमादित्य. ....................... विक्रमादित्य : (दार ढकलून आत येत) हाय देअर... बॅब्स, मे आय कम इन? उधोजीसाहेब : (बंदूक साफ करत) नोप... मी...
जून 06, 2019
आदरणीय बुआ सप्रेम प्रणाम, आपकी बहुत याद सता रही है. तुझ्या घरी मे महिन्याची सुटी चांगली गेली. आता पुन्हा शाळा सुरू होणार. म्हटले, त्या आधी तुला एक छोटेसे खत लिहून टाकावे! उन्हाळ्याच्या सुटीत तू कुठे जाणार? असे मला शाळेतले मित्र विचारत होते, तेव्हा मी अभिमानाने ‘मैं मेरी बुआ के घर जा रहा हूँ’ असे...
जून 05, 2019
प्रिय नानासाहेब यांसी, अवांतर बडबड करण्याची आम्हाला सवय नाही. थेट मुद्यावर आलेले बरे असते. राज्यातील निवडणुका तोंडाशी आल्या नसल्या तरी तशा टप्प्यातच आल्या आहेत. (हे म्हंजे सैपाकघरात तळणीला टाकलेल्या बटाटेवड्याच्या वासाने दिवाणखान्यातल्या पाहुण्यांना हैराण करण्यापैकी आहे! असो!!) मुद्दा एवढाच, की...
जून 04, 2019
हिरमुसलेल्या इतिहासपुरुषाने मलूलपणाने पाहिले. शेजारीच लेखणी धारातीर्थी पडली होती. बखरीचा कागद भेंडोळावस्थेत गतप्राण पडला होता. आता काय लिहायचे? कसे लिहायचे? कधी लिहायचे?...मुळात कां लिहायचे? होत्याचे नव्हते झाले. इतिहास घडता घडता एकदम काहीच्या काहीच होऊन बसले. इतिहासपुरुषाच्या नजरेत नोकरी...
जून 03, 2019
समस्त आर्यमदिरा मंडळाच्या सदस्यांनो, सर्वप्रथम सर्वांना ह्या तळीरामाचा साष्टांग नमस्कार. सदैव "आडव्या' असलेल्या ह्या तळीरामाला साष्टांग नमस्कारच अधिक सोपा जातो, म्हणून थेट साष्टांग प्रणिपातच घातलेला बरा. दोन पायावर उभे राहून खाली वाकताना झोकांडी जाऊन जायबंदी होण्याची शक्‍यता त्यामुळे टळतेच, शिवाय...
जून 01, 2019
रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण...
मे 31, 2019
आदरणीय मा. नमोजीहुकूम साहेब यांच्या चरणारविंदी शतप्रतिशत सा. नमस्कार. सर्वप्रथम आपले मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. मी एक साधासुधा सिंपल खासदार आहे. (तुमच्याच करिश्‍म्याच्या जोरावर) प्रचंड मताधिक्‍याने (ह्यावेळीही) निवडून आलो आहे. ‘ह्या वेळी मंत्रिमंडळात तुमचा नंबर नक्‍की लागणार’ असे मला सांगण्यात येत...
मे 27, 2019
निवडणूकपर्व संपून देशात राजीनामापर्व सुरू जाहले आहे. जो तो राजीनामे तोंडावर फेकू लागला आहे. हे होणारच होते! निवडणुकीतील धक्‍कादायक, अनपेक्षित आणि विपरीत निकालांनंतर आम्हीही तातडीने राजीनामा तोंडावर फेकणार होतो. परंतु राजीनामा नेमका कशाचा द्यावा, हे न कळल्यामुळे बेत नाइलाजाने रद्द करावा लागला. शिवाय...
मे 25, 2019
कुरुंच्या अपार सैन्यासन्मुख दिङ्‌मूढ उभ्या पार्थाचे अचानक पाणावले डोळे... अंतर्मुख होऊन त्याने पाहिले सभोवार तेव्हा, झण्णकन गरगरले व्योम, भवताल आणि शंखगर्जनांच्या, रणदुंदुभींच्या विक्राळात धगधगून उठलेले कुरुक्षेत्र क्षणभर झाकोळले... रथस्तंभ घट्ट पकडून गलितगात्र पार्थाने किलकिल्या नेत्रांनी पाहिले...
मे 24, 2019
दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ...  रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..!  दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास?  रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून!  दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील तुला!  रागा : (...
मे 23, 2019
"निवडणुकीतील दिग्विजयात ज्यांनी ज्यांनी म्हणोन साह्य केले, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले असून, त्यास आवर्जून उपस्थित राहाणेचे करावे ही प्रार्थना', असे निमंत्रण आम्हाला (ही) कमळ पार्टीच्या वतीने पाठवण्यात आले. परंतु आम्ही नम्र टंगळमंगळ केली. "आमच्याऐवजी...