एकूण 26 परिणाम
एप्रिल 28, 2019
चिपळूण - काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदमांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली. आघाडीच्या उमेदवाराचे आलेले प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवले नाही. कदम व त्यांच्या समर्थकांनी दुसऱ्या पक्षाचे काम केले. कदमांनी पक्षविरोधी कारवाईची परंपरा कायम जपली. यामुळे कदम यांची...
फेब्रुवारी 09, 2019
औरंगाबाद - पुरवठादार कंत्राटदाराच्या कराराची मुदत 30 नोव्हेंबर 2018 ला संपुष्टात आल्याने राज्यातील पहिली ते आठवीमधील सुमारे सव्वादोन कोटी विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार अडचणीत आला आहे. आगाऊ घेतलेला साठा 31 जानेवारीला संपल्यामुळे धान्य, इतर साहित्य पुरवठा न झाल्याने बहुतांश शाळांत पोषण आहाराचे वाटप...
जानेवारी 08, 2019
पुणे - कुटुंबातील तरुण मुलाच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे पंधरा दिवस शाळेला सुटी घेणारी नववीतील विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांना शाळेच्या मुख्याध्यापिकेने अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना लुल्लानगर येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये घडली. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षण...
नोव्हेंबर 11, 2018
देऊर (धुळे) : धुळे व साक्री तालुक्यातील नवनियुक्त 198 पोलिस पाटलांना नियुक्तीपत्र नुकतेच देण्यात आले आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तपत्र मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.   प्रातांधिकारी कार्यालयात आदेश नियुक्तीपत्र  वाटप उमेदवारांना मंंडळाधिकार्यांमार्फत देण्यात आले....
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - जिल्ह्यातील शिक्षकांनी किरकोळ रजा घेताना ती किमान दोन दिवस अगोदर मंजूर करून घ्यावी आणि त्यानंतरच रजेवर जावे. मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांनी आपल्या शाळांमधील शिक्षकांची रजा मंजूर केल्याबाबतची माहिती मेसेज, व्हॉट्‌सॲप, ई-मेल किंवा भ्रमणध्वनीद्वारे संबंधित तालुक्‍याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना...
ऑगस्ट 10, 2018
जळगाव ः आर्थिक विषयांवर निर्णय घेऊन त्यास मंजुरी घेण्याकरिता जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याचे नियोजन सुरू आहे. त्यानुसार सभा घेण्याचे नियोजन 23 ऑगस्टला झाले असताना सभा अचानक रद्द करण्यात आल्याचा प्रकार झाला. यात अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ही प्रक्रिया होत असून, अध्यक्षांकडून नकार...
मे 21, 2018
सायखेडा - एक महिला रात्री डॉक्‍टरांनी मृत घोषित केली. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेण्यासाठी नाकाला लावलेला व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि प्राण गेलेली महिला प्रत्यक्षात जिवंत असल्याचे आढळले. चांदोरीतील एका महिलेबाबत घडलेली ही घटना रविवारी (ता. २०)...
मे 17, 2018
कोंढाळी - बाजार चौकातील जिल्हा परिषद शाळेची जुनी जीर्ण इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्‍यता आहे. जीर्ण इमारत पाडण्याची विनंती दहा वर्षांपासून होत असताना जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.  १९७० साली ही इमारत बांधण्यात आली. पटसंख्या वाढल्याने वर्गखोल्या वाढल्या. आज शाळेत ३००...
मे 16, 2018
उरुळी कांचन : स्त्री-पुरुष समानता मानून वळती (ता. हवेली) येथील माजी सरपंच लक्ष्मण कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली कुंजीर परिवाराने साखरपुड्याला जाण्यापूर्वी नववधू झालेल्या पुजाची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. वळती येथील शिवाजी विठ्ठल कुंजीर यांची मुलगी पूजाचा बोरी भडक (ता. दौंड) येथील शांताराम ...
मे 16, 2018
पुणे - राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी व खासगी कार्यालयात महिला काम करत असलेल्या ठिकाणी लैंगिक छळास प्रतिबंध करणाऱ्या समित्यांची स्थापना करणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बंधनकारक आहे. मात्र अशा समित्यांची स्थापनाच झाली नाही. तर नोडल संस्था असलेल्या राज्याच्या महिला व बाल विकास आयुक्तालयात तब्बल...
एप्रिल 27, 2018
कोल्हापूर - गेले काही दिवस गाजत असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामप्रकरणी राज्य सरकार तोंडघशी पडले. या परिसरातील ‘नो डेव्हलपमेंट झोन आरक्षित’ जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला दिलेला स्थगिती आदेश दहा दिवसांत मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढविली. त्यामुळे येथील अतिक्रमण...
एप्रिल 10, 2018
वाबळेवाडीत यंदापासून टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग शिक्रापूर, (ता. शिरूर, पुणे): राज्य सरकारच्या "ओजस शाळा' उपक्रमात वाबळेवाडी (ता. शिरूर) जिल्हा परिषद शाळेची निवड झाली आहे. यामुळे या शाळेत इयत्ता आठवीचा वर्ग या वर्षी सुरू होणार असून, टप्प्याटप्प्याने बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत....
मार्च 25, 2018
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : शंभर टक्के मागसवर्गीय विद्यार्थी असलेल्या दसेगाव (ता. चाळीसगाव) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एका शिक्षिकेला चार वर्गाची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. या संदर्भात "सकाळ'मध्ये वस्तुनिष्ठ वृत्त झळकल्याने त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापती पोपट भोळे...
जानेवारी 21, 2018
मुरबाड (ठाणे) - मुरबाड तालुक्याच्या सह्याद्री पर्वत रांगेजवळ असलेल्या कोळोशी व कोळोशी वाडी येथील प्राथमिक शाळा पट संख्या कमी असल्याने शासनाने बंद केली होती. परंतु पर्यायी शाळा 2 किलोमीटर लांब असल्याने लहान मुले तेथे जायला तयार नव्हती. कोळोशी व कोळोशी वाडी येथील दोन्ही शाळांचे विद्यार्थी एका शाळेत...
जानेवारी 02, 2018
पाली : सुधागड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कुणाल पवार यांनी अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत केले. कुणाल यांनी सपत्नीक, आई व भावासोबत जळगाव येथील रेल्वे स्थानक, एस.टी स्टॅण्ड व मंदिराबाहेर बसणाऱ्या निराधार, गरीब व गरजू लोकांना अन्नदान व मिठाईचे वाटप करुन नववर्षाचे स्वागत केले....
नोव्हेंबर 30, 2017
पाटण - जिल्हा बदलीने बाहेर गेलेल्या दोनशे शिक्षकांच्या रिक्त जागा, जिल्हा परिषदेत हजर मात्र सोयीची शाळा मिळण्यासाठी दबा धरून बसलेले शिक्षक, अनेक तक्रारी असणारे, शाळा बुडविणारे आणि वेळेत शाळेत न जाणारे शिक्षक... अशा प्रकारांमुळे पाटण तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकांवर कुणाचाच वचक राहिल्याचे दिसत नाही...
ऑक्टोबर 25, 2017
संगमनेर ते अकोले डांबरी रस्ता खड्डेमय; काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर तळेगाव दिघे (जि. नगर) : कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील संगमनेर ते अकोले या भागात डांबरी रस्त्यावर अनेक मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसाठी मोठी अडचण होत असून, अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तातडीने संगमनेर ते अकोले या डांबरी...
ऑगस्ट 22, 2017
कोल्हापूर - शासनाच्या नवीन धोरणानुसार होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय शिक्षण क्षेत्रात गेल्या चार-पाच महिन्यांपासून चर्चेत आहे. या बदली धोरणावर सोशल मिडीयातून दररोज चारोळी, वात्रटिका, कविता, विडंबन अशा भरघोस पोस्ट पडत आहेत.  जिल्हा परिषद शाळातील प्राथमिक शिक्षकाच्या बदल्या ग्रामविकास...
ऑगस्ट 03, 2017
कणकवली - शिक्षण हक्क कायद्यानुसार मुख्याध्यापकांच्या ऐवजी समायोजन करण्यात येणाऱ्या तालुक्‍यातील ५१ उपशिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आजच हरकती नोंदवून उद्या (ता. ३) शिक्षकांचे समायोजन करण्याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून निघाल्याने बदलीस पात्र ठरलेल्या शिक्षक, संघटनांचे प्रतिनिधी आणि...
जुलै 06, 2017
रत्नागिरी - शाळेमध्ये वेळेवर न येणाऱ्या दोन शिक्षकांना त्या दिवशी रजा मांडण्यास सांगून सभापती सुभाष गुरव यांनी शिक्षकांनाच धडा शिकवला आहे. शैक्षणिक कामामध्ये चुकारपणा, शाळेत वेळेत न येणे अशा तक्रारी शिक्षकांविरुद्ध वारंवार ग्रामस्थ व पालक करीत आहेत. गेले काही महिने पंचायत समितीच्या सभेमध्ये हा विषय...