एकूण 341 परिणाम
जून 22, 2019
पुणे - देशातील मतदारांमुळे भाजप विजयी झालेला नाही, तर ईव्हीएममुळे झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अतुल बहुले, वसंत साळवे, अनिता...
मे 29, 2019
गणुर - आयटीआय वीजतंत्री प्रशिक्षणार्थींना(चांदवड) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून  परीक्षेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने गुण देण्यात न आल्याने नाशिक जिल्ह्यातील १२३ विद्यार्थी आज नाशिक येथे होणाऱ्या परीक्षेला बसता येणार नाही. त्यांचे वर्ष वाया जाणार असल्याची भीती सकाळ ने व्यक्त केली होती.   या...
मे 29, 2019
जुन्नर : येथील तनिष्का गटाच्या पुढाकारातून नागरिकांना जारमधून शुद्ध व थंड पाणी वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली.    माजी नगरसेविका व तनिष्का वैष्णवी चतूर यांच्या बोडकेनगर येथील शिवबा अॅक्वा या प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. या...
मे 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेता, विरोधी पक्ष नेते पदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव...
मे 09, 2019
मालवण - कोळंब पुलावरून सुरू असलेल्या वाहतुकीच्या विषयावरून आज स्वाभीमान व शिवसेना सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. कोळंब पुलासह घरबांधणीची परवानगी ग्रामपंचायतीमार्फतच मिळणार असे आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केले होते. मात्र अद्याप ग्रामपंचायतीकडून अशीच परवानगीच मिळत नसल्याने आमदारांनी जनतेची घोर...
मे 01, 2019
मुंबई - भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांना १५० व्या जयंतीवर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.  दादर पूर्वेकडील दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फाळके यांचे...
एप्रिल 23, 2019
   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद...
मार्च 23, 2019
कऱ्हाड : रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबतची वस्तुस्थिती काय हे रणजितसिंहच सांगतील, मात्र, जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये होते, आहेत व काँग्रेसमध्येच राहतील, असा खुलासा आमदार जयकुमार गोरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, माझा व राष्ट्रवादीचा विषय असून, त्यांच्या पदरात मी...
मार्च 21, 2019
औरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत गेला. जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी व्हिडिओ...
मार्च 16, 2019
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ २००९ पासून खुला झाला. या मतदारसंघाची मते लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरत आली आहेत. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव देशमुखांनी बाजी मारल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी ताकद वाढली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना...
मार्च 12, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत....
मार्च 11, 2019
अहमदपूर (लातूर) : महात्मा फुले विद्यालयाच्या दहावी बोर्ड परीक्षा केंद्रावर सोमवारी (ता. 11) सिलबंद लिफाफ्यात  इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका ऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका निघाल्याने एकच गोंधळ उडाला. शेवटी बोर्डाकडून प्रश्नपत्रिका आल्यानंतर दोन तास उशीराने परीक्षा सुरू झाली. महात्मा फुले...
मार्च 02, 2019
धुळे : गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मतविभाजन झाले. त्यामुळे भाजप- शिवसेना युतीला फायदा झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत किमान 70 टक्के विखुरलेली गेलेली मते एकत्र आणायची असेल तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे. मग युतीचा पराभव अटळ आहे. त्यासाठी सर्वजण एकत्र मोट बांधूया, असे जाहीर...
फेब्रुवारी 25, 2019
मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा मंगळवेढा व सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ या वतीने मंगळवेढा पंचायत समिती समोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केले. या मागण्यात मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदे पदोन्नतीने त्वरित भरावीत, प्रशासनाच्या चुकीमुळे रॅन्डम राउंडला...
फेब्रुवारी 21, 2019
माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जातयं, अडचण केली...
फेब्रुवारी 18, 2019
जुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली.19 फेब्रुवारी पर्यंत हा द्राक्ष महोत्सव सुरू राहणार असल्याचे...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) या वर्षी झालेल्या परीक्षेत जिल्ह्यातील चौघे उत्तीर्ण झाले. यामध्ये उत्पादन शुल्क उपअधीक्षक विभागात सातवे (ता. पन्हाळा) येथील प्रसन्नजित चव्हाण राज्यात प्रथम आले. कक्ष अधिकारी विभागात गारगोटी (ता. भुदरगड) येथील सूरज बेलेकर राज्यात...
फेब्रुवारी 13, 2019
कोल्हापूर - थेट पाईपलाईनच्या कामाची श्‍वेतपत्रिका न काढल्यावरून महापालिका सभेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी याच प्रश्‍नी आक्रमक होऊन सभात्याग केला. महापौरांच्या निषेधाचे पडसाद सभागृहात उमटले. सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी सभा तहकूब केली. घरफाळा, पाणीपट्टी...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : केअरिंग फ्रेंडस या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यभरातील 64 कवींनी 'अधुरे स्वप्न...' या विषयावर आपल्या कविता सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. केअरिंग फ्रेंड्‌स संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त पुणे शाखेतर्फे या...
फेब्रुवारी 04, 2019
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव-पाटील  उंडाळकर गटाचा राजकारणातील तब्बल 47 वर्षांचा टोकाचा संघर्ष कार्यकर्त्यांनी जवळुन अनुभवला आहे. मात्र राजकारणामध्ये कोणीही दिर्घकालाचा शत्रु नसतो या उक्तीप्रमाणे या दोन्ही गटांचे मलकापुर पालिकेच्या निवडणुकीत...