एकूण 334 परिणाम
जून 20, 2019
इचलकरंजी - राष्ट्रवादी काँग्रेसने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याची केलेली मागणी निव्वळ हास्यास्पद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच ठेवण्यासाठी इचलकरंजी पालिकेचे कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती कॉंग्रेसचे नगरसेवक...
जून 16, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दिलेली साथ आणि मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांचे आकडे मांडून पुण्यातील आठपैकी सहा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच हवेत, अशी आग्रही मागणी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे शनिवारी केली. परंतु, कॉंग्रेससोबत आघाडी राहणार असल्याचे...
जून 13, 2019
गडहिंग्लज - ""लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांनी जनतेला नको असलेला उमेदवार लादला. ध्यानात ठेवण्याची धमकीवजा भाषा वापरली. ध्यानातच ठेवायचे होते, तर त्यांनी 2009 चा पराभव लक्षात ठेवायला हवा होता. जिल्हा आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला नाही, तो शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे, हे जरूर ध्यानात...
जून 11, 2019
मुंबई -  "ईव्हीएम-व्हीव्हीपॅट या दोन्ही यंत्रांमध्ये काहीच गडबड झाली नाही. मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशिनमध्ये गडबड झाली,' असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत केला. याबाबत मला या क्षेत्रातील अनेक जाणकारांनी याविषयी माहिती दिली असून,...
जून 08, 2019
बाहेरचे सगळे जर पक्षात चालत आले तर भाजपची निष्ठावंत मंडळी नाराज होणार. जर पक्षाला चांगले दिवस आले असतील तर मूळच्या कार्यकर्त्यांना संधी का नाही, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दुसरीकडे विरोधी राजकारणाचीही मोठी कोंडी झाली आहे.  खरे तर लोकसभेचे मुद्दे वेगळे, विधानसभेचे वेगळे; पण येत्या चार महिन्यांत...
जून 03, 2019
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या मुंबई महापालिकेतील उपायुक्त निधी चौधरी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. काँग्रेस...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी...
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी...
जून 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक...
मे 27, 2019
इंदापूर (पुणे) : महाराष्ट्रातील काँग्रेसची पडझड रोखून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच काँग्रेसचे जेष्ठ व युवा नेते यांच्यामध्ये योग्य समन्वय साधून पक्षसंघटन मजबुत करण्यासाठी राज्याचे माजी सहकार व संसदिय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवावी...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर निर्विवाद शिक्कामोर्तब झालं आहे. मोदींची कार्यशैली, त्यांचे निर्णय याबद्दल कुणाचे कितीही मतभेद असले तरी लोकांवर प्रभाव टाकण्याची त्यांची हातोटी, ते घेतील ते निर्णय लोकहिताचे आहेत हे पटवून देण्याचं त्यांचं अफलातून कौशल्य या बळावर...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 10, 2019
सातारा - आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. पण, लक्ष्मण माने वंचित समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचले. वंचितांसाठी झटणाऱ्या सत्प्रवृत्ती समाजात आहेत, तोपर्यंत लक्ष्मण मानेंनी आपले कार्य पुढे सुरू ठेवावे, असा...
मे 05, 2019
मुंबई : नक्षलवादी हल्ल्यात राज्याचे 15 जवान हुतात्मा होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामागे सरकारची नक्षलग्रस्त भागातल्या विकासाबाबतची अनास्था कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते...
मे 04, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून रिकामे झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने राज्यातील दुष्काळावर लक्ष केंद्रित केले आहे. सांगोला येथील दुष्काळ आढावा दौऱ्यानंतर त्यांनी उद्या (ता. 4) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दुष्काळ आढावा बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरात 87 सभा...
एप्रिल 27, 2019
सटाणा : गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्यातील भाजपा सरकारने शेतमालाचा भाव व शेती सिंचनासह शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळेच बळीराजाची मोठी दैना झाली असून राज्यातील 18 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अशा या असंवेदनशील भाजप-शिवसेना महायुतीच्या शासनाचा या...
एप्रिल 27, 2019
नगर : ''लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलून आपण पुढील राजकीय दिशा ठरविणार आहोत. तूर्त पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी दिवंगत वडील बाळासाहेब विखे पाटील यांचे अधुरे राहिलेले काम व स्वप्न सरकारच्या मदतीने पूर्ण करण्याचे ध्येय समोर...
एप्रिल 26, 2019
तळेगाव दाभाडे -  ‘‘देशात सध्याचे राजकारण बदलत असून, १९६७ मध्ये यशवंतराव चव्हाणांनी तरुणांना संधी दिली होती. तोच विचार घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक, संग्राम जगताप, पार्थ पवार, संजयमामा शिंदे, डॉ. अमोल कोल्हे हे नवे चेहरे आणले आहेत. आगामी काळात राज्यातील जनतेचे...