एकूण 134 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नागपूर : सुपर स्पेशालिटीचा हृदय विभाग असो, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी किंवा किडनी विभाग, पाच राज्यातील गरिबांसाठी "सुपर' वरदान ठरले आहे. मागील अडीच वर्षात येथील नेफ्रोलॉजी विभागात 57 व्यक्‍तींना किडनी प्रत्यारोपणातून जीवदान मिळाले. विशेष म्हणजे यातील 75 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त महिला किडनी दानकर्त्या आहेत...
ऑक्टोबर 20, 2019
आष्टी (बीड) - आचारसंहिता काळात विनापरवाना मूक मोर्चा काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश धस, आमदार तथा भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, त्यांचे पती विजय गोल्हार तसेच इतर चार-पाचजणांवर आष्टी पोलिसांत रविवारी (ता. 20) गुन्हा दाखल...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 02, 2019
जायकवाडी (जि.औरंगाबाद ) : पैठण तालुक्‍यातील 55 गावांसाठी भगीरथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजनेच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांनी मंगळवारी (ता. एक) पाहणी करून समाधान व्यक्त करीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना येत्या रब्बी हंगामात खेर्डा प्रकल्पात पाणी...
सप्टेंबर 29, 2019
वणी (जि. यवतमाळ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भरारी पथकाने रोख रक्कम जप्तीचा धडाकाच लावला आहे. गेल्या शुक्रवारी (ता.27) व रविवारी (ता. 29) या दोन दिवसांत निवडणूक भरारी पथकाने पाच लाख रुपये जप्त केले. दरम्यान, गेल्या पाच दिवसांत यवतमाळ जिल्ह्यातून आतापर्यंत 58 लाखांची रोकड जप्त करण्यात आली...
सप्टेंबर 22, 2019
उस्मानाबाद : नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यांना सुलभरीत्या दर्शन मिळावे, यासाठी विविध विभागांनी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले....
ऑगस्ट 29, 2019
नेरळ : रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि कोंढाणे धरणाचे पाणी कर्जत तालुक्‍यालाच मिळावे, या मागण्यांसाठी कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी उपोषण सुरू केले होते. रस्त्यांची कामे सुरू झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी (ता. २७) उपोषण मागे घेतले. कोंढाणे मुद्द्यावर न्यायालयीन लढाईसाठी तयार असल्याचे सांगत...
ऑगस्ट 29, 2019
सातारा  ः शांतता समितीच्या बैठकीत पालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात. यामुळेच अतिक्रमित टपऱ्या हटविल्या जात नाहीत, असा आरोप होऊन 24 तास उलटत नाहीत तोवर पालिकेच्या (कै.) अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलातील पार्किंगच्या जागेत साताऱ्यातील एका गुंडाने गणेशमूर्ती विक्रीचा स्टॉल उभारला आहे. पालिकेच्या...
ऑगस्ट 28, 2019
सातारा ः सातारा शहरात जागोजागी झालेली अतिक्रमणे, पदपथावर टाकलेल्या टपऱ्या, या टपऱ्यांत चालणारे अवैध व्यवसाय आदींसह वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेचा पाढाच आज नागरिकांनी वाचला. नगरपालिकेचे कर्मचारी हप्ते घेतात, असा आरोपही बैठकीत करण्यात आला. या आरोपांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी...
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : राज्यात पूरपरिस्थिती असताना महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाडींना नाश्‍ता व गरम आहाराच्या पुरवठ्यासाठी बचतगटांकडून निविदा मागविल्याने गावखेड्यातील बचतगटांना यात सहभागी होता आले नाही. अशा परिस्थितीत निविदा काढण्यामागचे नेमके कारण काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 9 ऑगस्टला दिलेल्या...
ऑगस्ट 01, 2019
शिर्डी : ग्रामीण महाराष्ट्रात गेल्या सत्तर वर्षांत झाले नाही, एवढे काम चार वर्षांत केले. पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असून, गावांचे उर्वरित प्रश्‍न सोडविणार आहोत. सरपंचांचे मानधन तिपटीने वाढविले आहे. तुम्हाला तिप्पट दिले, आता तुम्ही आम्हाला तिप्पट द्या, असे सूचक आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
जुलै 24, 2019
भंडारा : वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून थकबाकीचे बिल मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी जिल्हा कोषागारातील वरिष्ठ लिपिक प्रकाश इसराम पटले याने पाच हजारांची लाच मागितली. बुधवारी त्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. यातील तक्रारकर्ता शासकीय कर्मचारी आहे....
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
एप्रिल 10, 2019
खामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सांगता करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने काका यांनी चिमुकल्या मुलीच्या हस्ते आपले उपोषण...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
मार्च 07, 2019
मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे 30 जिल्ह्यांमधील अंगणवाडी केंद्रांसाठी खरेदी करण्यात आलेल्या मोबाईल खरेदीमध्ये 65 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. असा गंभीर आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. पंकजा मुंडे या महिला व...
मार्च 07, 2019
पांगरी - बार्शी-पांगरी-उस्मानाबाद हद्दीपर्यतचा राज्यमार्गावर डांबरीकरण करण्यात यावे या मागणी करिता पांगरी पंचक्रोशीतील जनतेने तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास बुधवार (ता.१३) पर्यंत सुरूवात करणार असल्याची ग्वाही सहाय्यक अभियंता सुनिता पाटील व ठेकेदारचे...
मार्च 03, 2019
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीचे सर्वोच्च न्यायालयातील खटले लढण्यासाठी आणखी एक ज्येष्ठ वकिल नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले. मराठा आंदोलनानंतर मराठा...