एकूण 25 परिणाम
जून 22, 2019
लीडस्‌ : तीन दिवसांपूर्वी सर्वाधिक षटकारांच्या विक्रमासह 397 धावांचा डोंगर उभा करणाऱ्या इंग्लंडला आज 233 धावांचे आव्हान पेलले नाही. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेने संभाव्य विजत्यांच्या शर्यतीत असलेल्या इंग्लंडला धक्का देऊन स्वतःचा दुसरा विजय मिळवला.  तिनशे धावा सहजतेने करण्याची क्षमता...
जून 16, 2019
लंडन : भारताकडून झालेल्या पराभवाचा धक्का सहन करत सलग तिसऱ्या सामन्यात त्रिशतकी धावसंख्या उभारणाऱ्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव केला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील आपल्या मोहिमेला अधिक बळ दिले. कर्णधार ऍरॉन फिन्चनने दीडशतक मिशेल स्टार्कचे चार बळी निर्णायक ठरले.  प्रथम...
मे 06, 2019
पुणे : सकाळ सोसायटी क्रिकेट लिग स्पर्धेत दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या शतकाची नोंद झाली. श्रीनिवास ग्रीनलॅंड कौंटी बी संघाच्या मयूर मानकर याने ही कामगिरी केली. त्यामुळे त्याच्या संघाचा मिथिला नगरीविरुद्ध विजय झाला. सिराटेक ग्रीन्स आणि सूर्यगंगा यांच्यातील सामना टाय झाला. त्यामुळे स्पर्धेतील रंगत कायम...
डिसेंबर 23, 2018
जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.  प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या होऊ घातलेल्या चौ-वार्षिक निवडणुकीत उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. पहिल्या यादीमध्ये सरचिटणीस पदाच्या उमेदवारास कार्याध्यक्षपदाची उमेदवार घोषित केले तर त्यानंतर अवघ्या 16 तासांनी दुसऱ्यांदा पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर करताना,...
ऑगस्ट 10, 2018
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासनात उलथापालथ झाल्यानंतर लोढा समितीने सुचवलेल्या दोन महत्त्वपूर्ण शिफारशींमध्ये बदल करून नव्या घटनेचा ड्राफ्ट आज सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. ‘एक राज्य एक मत’ आणि दोन टर्ममधील विश्रांतीचा (कूलिंग) कालावधी यामध्ये बदल करून न्यायालयाने...
जुलै 30, 2018
डंम्बुला - वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि फिरकी गोलंदाज ताबरेझ शम्सी यांच्या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा विजय सुकर झाला. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धचा हा सामना 5 गडी राखून जिंकला.  रबाडा आणि शम्सी यांच्या गोलंदाजीपुढे प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव 35 षटकांत 193 धावांतच आटोपला....
जुलै 24, 2018
कोलंबो - श्रीलंका क्रिकेट संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेचा 200 धावांनी पराभव केला. या दुसऱ्या विजयासह त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली.  श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका संघावरील हा 2006 नंतर मिळविलेला मोठा विजय ठरला. ऑफ स्पिन गोलंदाज रंगना हेराथ...
जुलै 06, 2018
नवी दिल्ली - एक राज्य एक मत आणि कूलिंग काळ (दोन टर्ममधील कालावधी) या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. दोन वर्षांपूर्वीच्या मूळ निकालात कोणताही बदल होणार नाही, परंतु या दोन शिफारशींमध्ये काही प्रमाणात फेरबदल करण्याचे संकेत सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती...
मार्च 22, 2018
यांगून (म्यानमार) - भारताच्या पंकज अडवानीने आशियाई बिलियर्डस स्पर्धेच्या बाद फेरीतील प्रवेश नक्की केला. त्याने सिंगापूच्या यिओ तेक शीन याला ४-० असे हरवित सलग तिसरा विजय मिळविला. त्याने दुसऱ्या फ्रेममध्ये १०० गुणांचा ब्रेक मिळविला. भालचंद्र भास्कर यानेही दुसरा विजय मिळविताना आँग सान अू याला ४-३ असे...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे - भारत हा साप आणि साधूंचा देश असल्याचा समज आता केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत विविध क्षेत्रांतील हब आणि डेस्टिनेशन म्हणून भारतातील विविध शहरांचा लौकिक वृद्धिंगत होत आहे. याच मालिकेत आता क्रिकेट प्रशिक्षणाची भर पडली आहे. लेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्‍लबच्या संघाने दहा...
जानेवारी 29, 2018
बंगळूर : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या मोसमातील खेळाडूंचा लिलाव रविवारी संपन्न झाला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात १६९ क्रिकेटपटूंची खरेदी झाली आणि त्यासाठी तब्बल ४३१ कोटी ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. अखेरच्या दिवशी जयदेव उनाडकट सर्वांत महागडा खेळाडू ठरला. टी २० क्रिकेटमधील ख्रिस गेल नावाच्या...
डिसेंबर 11, 2017
धरमशाला - भारतीय फलंदाजांचे सदोष तंत्र आणि वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असणाऱ्या वातावरणाचा अचूक फायदा उठवत श्रीलंकेने गेल्या १२ एकदिवसीय सामन्यातील पराभवाची मालिका खंडित केली. कसोटी मालिकेनंतर शुक्रवारी झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांनी भारताचा सात गडी राखून सहज...
डिसेंबर 09, 2017
धरमशाला : भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्यापासून (रविवार) सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वत्र पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्‍यता राज्याच्या हवामान विभागाने काल (शुक्रवार) वर्तविली आहे.  भारत आणि श्रीलंकेमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या...
डिसेंबर 06, 2017
नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे कोटलाच्या खेळपट्टीने भारतीय गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा बघितली. श्रीलंकन फलंदाजांनी केलेला कडवा प्रतिकार करून भारतीय संघाच्या विजयाच्या आशा मोडून काढल्या. धनंजय डिसिल्वाने शतक करून श्रीलंकन लढाईचा मोर्चा सांभाळला. दिवसभराच्या खेळात अथक प्रयत्न करून भारतीय...
डिसेंबर 06, 2017
४१० धावांच्या आव्हानासमोर श्रीलंका ३ बाद ३१ नवी दिल्ली - प्रदूषणाचा त्रास मागे ठेवून विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्ली कसोटी जिंकण्याच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. चंडिमलच्या दीडशतकाच्या खेळीनंतरही पहिल्या डावात श्रीलंकेला ३७३ धावांत रोखले गेले तिथेच गती मिळाली. दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करून...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे : यंदाची 32 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या 3 डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा पुण्याच्या महापौर आणि संयोजन समितीच्या स्वागताध्यक्ष मुक्ता टिळक यांनी आज (सोमवार) केली. या स्पर्धेची घोषणा करण्यासाठी पीवायसी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती.  यंदा या स्पर्धेत एकूण 40 लाख...
सप्टेंबर 22, 2017
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) कारभाराची हंगामी जबाबदारी असलेल्या तिघा पदाधिकाऱ्यांच्या हटवादी भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार टीका तर केलीच; त्याचबरोबर संतापही व्यक्त केला. बीसीसीआयच्या नव्या घटनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर हे पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत...
ऑगस्ट 29, 2017
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाची सूत्रे हाती घेताच पहिल्याच निकालात बीसीसीआयला बॅकफूटवर टाकले. मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या आयपीएलच्या नव्या प्रसारण हक्कांसाठी बीसीसीआय ई-लिलावासाठी उत्सुक होते; परंतु मिश्रा यांच्या खंडपिठाने त्यास सोमवारी स्पष्ट नकार...
ऑगस्ट 28, 2017
पल्लिकल  - जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करणाऱ्या श्रीलंकेला नंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीमुळे तिसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकताना पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या...