एकूण 49 परिणाम
जून 09, 2019
चेतन भगत...नुसतं नाव जरी घेतलं तरी तरुणाईचे कान टवकारतात. तो काय बोलतो, काय लिहितो याकडे अवघ्या तरुणाईचं लक्ष असते. आजची तरुण पिढी पुस्तके वाचत नाही, अशी चर्चा नेहमी झडते. पण कोट्यवधी तरुण-तरुणींनी त्याच्या पुस्तकांची पारायणे केली आहेत. त्याच्या नऊ कादंबऱ्यांचा खप सत्तर लाखांहून अधिक आहे. भारतातील...
मे 26, 2019
काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या महाराष्ट्रात आता कॉंग्रेसजनांपुढे नेतृत्त्वाचा पेच निर्माण झाला आहे. या राज्यात पक्षाचा गाडा जोमाने हाकण्यासाठी नवे नेतृत्त्व पक्ष शोधणार का, दुसऱ्या फळीला संधी देणार, या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. राज्यात एखादी सभा घ्यायची तर, राज्यातील फायरब्रॅन्ड नेता...
मे 23, 2019
लोकसभा 2019 'लाव रे तो व्हिडीओ' या वाक्यानं अवघ्या महाराष्ट्राचे कान टवकारले अन् राज ठाकरे यांच्या सभा दणाणून गाजल्या. 'मेरी बात सबूत के साथ' म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेचं हसू करुन सोडलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 'मनसे फॅक्टर' लोकसभा निवडणूकीच्या निकालात पारडं...
मे 18, 2019
29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. लातूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा कमळच लातूर राखीव लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून येणार आहे....
मे 14, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर...
मे 07, 2019
दुष्काळ येताना कधीच एकटा येत नाही. त्याच्याबरोबर अनेक परिणामकारी गोष्टी येत असतात. गेल्या वर्षी पाऊस न पडल्यानं गावचं रंगरूप हळूहळू पालटलं. हिरवं शेत ओसाड पडत गेलं. पाणी आटलं, डोगर उघडे पडत गेले, गावात हळूहळू दुष्काळानं डोकं वर काढलं. त्यामुळे स्वत:चं आस्तित्व टिकवण्यापासून लेकरासारखं वाढवलेल्या...
एप्रिल 22, 2019
परंपरागत पांढऱ्या रंगाचा खास सुदानी पेहराव आणि कानात चंद्राच्या आकारातील सोन्याची भली मोठी रिंग घातलेली २२ वर्षांची अला सालेह सध्या सुदानी जनतेच्या असंतोषाचे प्रतीकच बनली आहे. सुदानची राजधानी खार्टुममध्ये मोटारीच्या टपावर उभारून घोषणा देत लष्करी सत्ताधीश बशीर यांच्या पोलादी राजवटीला आव्हान देणाऱ्या...
एप्रिल 14, 2019
सर्व दृष्टीनं प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत निरंतर ज्ञानसाधना करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञाननिष्ठेचा एका उत्तुंग आदर्श उभा केला. हजारो वर्षांपासून उपेक्षित आणि वंचित राहून अज्ञानाच्या अंधःकारात चापडणाऱ्या लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पेरून बाबासाहेबांनी त्यांचं जीवन उजळून टाकलं. ज्ञानी...
एप्रिल 07, 2019
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करून भाजपवर जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक केला. या त्यांच्या हल्ल्याने भाजपला पुरते घायाळ केले असून मुंबईतील भाजप उमेदवारांच्या पोटात गोळाच आला असेल यात शंका नाही.  मनसेची दिशा ठाकरे यांनी कालच्या...
एप्रिल 07, 2019
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील पाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका करून भाजपवर जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक केला. या त्यांच्या हल्ल्याने भाजपला पुरते घायाळ केले असून मुबंईतील भाजप उमेदवारांच्या पोटात गोळाच आला असेल यात शंका नाही.  मनसेची दिशा ठाकरे यांनी कालच्या...
फेब्रुवारी 01, 2019
सन 2002 मध्ये ऐन परिक्षेच्या आदल्या दिवशी शाह फैजलच्या वडिलांची कुपवाडात दहशतवाद्यांनी हत्या केली. परिस्थीतीला तोंड देत तो एमबीबीएस झाला. 2009 मध्ये यूपीएससीत देशात प्रथम आला. काश्मीरचा युथ आयकॉन असलेल्या शाह फैजलने आता दहा वर्षांनंतर प्रशासकीय सेवेचा राजीनामा देवून थेट राजकारणात उडी घेतली आहे. या...
जानेवारी 23, 2019
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या...
जानेवारी 15, 2019
नरेंद्र मोदी सरकारने खुल्या गटातील गरिबांना सरकारी  नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थांत दहा टक्के आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेऊन राजकीय ‘मास्टरस्ट्रोक’ मारल्याचे बोलले जात आहे. कोणतेही सरकार निवडणूक जवळ आली, की विशिष्ट वर्ग, समाज वा जात यांना खूश करून त्यांची बहुसंख्य मते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असते....
जानेवारी 09, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर परिसरात दोन आखाडे प्रसिद्ध आहेत. एक कुस्त्यांचा आणि दुसरा राजकारणाचा! छत्रपती शाहू महाराजांच्या प्रोत्साहनामुळे कुस्तीची जिंदादिल परंपरा इथं कायम आहे, तर यशवंतराव चव्हाणांसारख्या द्रष्ट्या नेत्यामुळे इथं विस्तारलेला सहकार आणि त्याभोवती फिरणारं राजकारण...
डिसेंबर 23, 2018
आज एक कलाकार म्हणून समाजात वावरताना, अजूनही खूप काही काम करायचं आहे, याची सतत जाणीव होत असते. कुठंतरी एक आंतरिक अपूर्णता वाटत असते. हीच अपूर्णता मला दररोज ऊर्जा देण्याचं काम करते आणि अधिकाधिक रियाज करण्यास भाग पाडते. नावीन्याचा ध्यास मला सतत उत्साही आणि आनंदी ठेवतो. दररोज झटून रियाज करून हातातून...
डिसेंबर 11, 2018
'अॅटॅक इज बेस्ट पॉलिसी ऑफ डिफेन्स' हा युद्धशास्त्रातील एक महत्त्वाचा नियम आहे. राजकीय कुरुक्षेत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी युद्धशास्त्रातील याच नियमाप्रमाणे व्यूहरचना आखत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करण्याचे धोरण अवलंबले आणि त्यांच्या या रणनीतीला चांगलेच यश मिळाल्याचे आज...
नोव्हेंबर 11, 2018
देशापुढं आणि राज्यापुढं अनेक प्रश्‍न असले, तरी ते सोडवण्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची आहे. समाज आणि देशाला एक ठेवणाऱ्या नीतिमूल्यांवर आधारित आंतरिक प्रेमाचा झरा शाळा आणि महाविद्यालयांतल्या भावी पिढ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.  दीपावलीचे फटाके आनंदानं उडवून झाले, तर पणतीच्या...
नोव्हेंबर 04, 2018
वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आलेले प्रेरक अनुभव, सामाजिक भान बाळगत केलेले जगण्याविषयीचे सकारात्मक प्रयोग, राबवले जात असलेले विधायक उपक्रम, तरुणाईच्या यशोगाथा आदींविषयीचं कथन करणारं हे नवं सदर. चंदनशेतीचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या तरुणाची यशोगाथा या पहिल्या लेखात. शिकून-सवरून पुढं करायचं काय, हा गंभीर...
ऑक्टोबर 28, 2018
"पत्रकारिता हे व्रत आहे. त्यापुढे आर्थिक, भौतिक बाबी तुच्छच समजायला हव्यात. प्रत्येक नीतिमान पत्रकार अदृश्‍य समाजसेवक असतो. उपजीविकेपुरतं माणूस कुठंही कमावतो; परंतु पत्रकारांनी खूप श्रीमंत होण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटत नाही. समाजात वावरताना सर्वांत असूनही त्यानं नसल्यासारखं राहावं. या अलिप्त...
सप्टेंबर 30, 2018
पुण्यातल्या आशिष कासोदेकर या अवलियानं लेह-लडाख भागात होणारी "ला अल्ट्रा' ही शर्यत विक्रमी वेळेत पूर्ण केली. तब्बल 333 किलोमीटरची ही अचाट शर्यत आणि तीही प्राणवायूचं प्रमाण कमी असणाऱ्या भागात. सलग 72 तासांमध्ये आशिषनं ही शर्यत पूर्ण केली. ही आगळीवेगळी शर्यत पूर्ण करताना आशिषनं काय तयारी केली, कुणाची...