एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री (जि.औरंगाबाद ) : तालुका भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन रविवारी (ता. पाच) सकाळी हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रचाराचा प्रारंभ बोरगाव अर्ज येथील गणपतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फुलंब्री विधानसभा...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही...
ऑगस्ट 20, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेला अपेक्षित यश मिळत असले, तरी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांपैकी उमरगा वगळता उर्वरित तीन मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसलाच झुकते माप मिळते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित विकास आघाडीच्या उमेदवाराला...
जुलै 02, 2019
गोंदिया ः पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात "सबका साथ, सबका विकास व सबका विश्‍वास' या ब्रीदवाक्‍याप्रमाणे कार्य करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर कार्यकर्त्यांनी आता विधानसभा निवडणुकीकरिता कामाला लागावे. मंत्री म्हणून मिळालेली जबाबदारी मोठी आहे. या...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी...
डिसेंबर 10, 2018
वाशीम: दिल्लीपासून गल्लीपर्य॔त सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रिसोड नगरपालिका निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही विस पैकी एकही नगरसेवक भाजपला निवडून आणता न आल्याने भाजपचे जिल्ह्यात काउनडावू सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  रिसोड नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या...
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले.  शोपियॉं जिल्ह्यातील नादिगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांना मिळाली होती....
ऑक्टोबर 04, 2018
वाशीम : ‘पार्टी विथ डिफरन्स’ या घोष वाक्यातून राष्ट्रीय ते गाव पातळीपर्यंत अनुशासनाचा आदर्श सांगणार्‍या भारतीय जनता पक्षालाच आता पक्षांतर्गत ‘प्रोटोकॉल’ आठविण्याची गरज निर्माण झाल्याची भावना याच पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने...
सप्टेंबर 08, 2018
फुलंब्री : भारतीय जनता युवा मोर्च्याच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी देवलाल कचरूसिंग राजपूत यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या आदेशाने महानगरपालिकेचे उपमहापौर तथा भारतीय जनता...
सप्टेंबर 07, 2018
इंदापूर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इंदापूर पोलीस ठाण्यासमोरील मैदानात दि. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस तालुक्यातील हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित राहिल्यामुळे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बळ मिळाले आहे. विधानसभेत हर्षवर्धन  पाटील यांची कमी जाणवते...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - दिवंगत आर. आर. पाटील यांचे तासगाव, डॉ. पतंगराव कदम यांचे कडेगाव, जयंत पाटील यांचे इस्लामपूर यापूर्वी जिंकले. वसंतदादांचे वारसदार असलेल्या प्रतीक व विशाल पाटील यांची सांगली महापालिका जिंकली. आता विधानसभा निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमुक्त करू, असा विश्‍वास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
मे 31, 2018
नवी दिल्ली : देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी आज (ता. 31) पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. पण आजचे निकाल बघता, ते भारतीय जनता पक्षासाठी आनंददायी नाहीत. केवळ पालघर लोकसभा मतदारसंघ व उत्तराखंडमधील थराली लोकसभा मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. तर बाकी...
मे 31, 2018
नवी दिल्ली : आज (ता. 31) देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. पण सुरवात बघता भारतीय जनता पक्षासाठी ही मतमोजणी फारशी आनंदाची नाही, कारण 14 जागांपैकी केवळ दोनच जागांवर भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या कैराना लोकसभा...
मे 11, 2018
भुसावळ - कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रेम हीच माझी प्रेरणा आणि शक्ती आहे. क्लीन चिट मिळाल्याने पक्ष विस्ताराच्या कामासाठी दुप्पट जोमाने कामाला लागणार आहे; असे मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज भुसावळ रेल्वे स्थानकावर केले.  भोसरी जमीन प्रकरणी एसीबीने क्लीन चीट दिल्यानंतर खडसे यांच्या गुडघ्यावर...
एप्रिल 19, 2018
इचलकरंजी - पंचगंगा नदी प्रदुषण होत नसेल तर बैठकीतून उठून थेट पंचगंगेत जाऊ या. आम्ही सर्व जण नदीतील थेट पाणी पितो. तुम्ही ही ते पाणी प्यायले पाहिजे, असे थेट आव्हान आज येथे प्रांतकार्यालयात आयोजित बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. तसेच चुकीचा अहवाल देऊन हातकणंगले-शिरोळ या दोन...
मार्च 13, 2018
अकोला - आगामी जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून भाजपने महापालिका स्थायी समिती सभापतीपदासाठी धक्कातंत्राचा वापर केला आहे. अनपेक्षित निर्णय घेवून स्थायी समिती सभापतीपद विशाल श्रावण इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोध...
डिसेंबर 25, 2017
चेन्नई : तमिळनाडूत "अण्णा द्रमुक'च्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या राधाकृष्णनगर (आर. के. नगर) मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शशिकला गटाचे नेते आणि अपक्ष उमेदवार टी. टी. व्ही. दिनकरन हे विजयी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिनकरन यांच्या विजयामुळे राज्यातील समीकरणेच बदलण्याची शक्‍यता आहे...