एकूण 289 परिणाम
जून 09, 2019
नवी दिल्ली : सिलचर-तिरुअनंतपुरम एक्स्प्रेसला आज (रविवार) भीषण आग लागली. या रेल्वेच्या तीन डब्यांना आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस सिलचरहून निघण्यापूर्वी साफसफाईसाठी उभी...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...
मे 20, 2019
बंगळूर - येथील राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न यांच्या घराजवळ गूढ स्फोट होऊन एक व्यक्ती ठार झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीचा देह छिन्नविच्छिन्न झाला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, सिनेमाच्या चित्रीकरणासाठी...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 16, 2019
बंगाल ही प्रबोधनाच्या चळवळीची भूमी. प्रचारात तिथे जे हिंसक प्रकार घडले, त्याने या प्रबोधनापासून आपण किती दूर गेलो आहोत, याची विषण्ण जाणीव करून दिली. दे शातील यंदाच्या ‘लोकशाहीच्या महाउत्सवा’चे सांगता पर्व जवळ येऊन ठेपले असतानाच, पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस...
मे 08, 2019
कोल्हापूर - सदर बाजारात दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत सहा जण जखमी झाले. तलवार, हॉकी स्टिकच्या हल्ल्यासह दगडफेक झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मुलांच्या खेळण्याच्या वादातून रात्री दहाच्या सुमारास हाणामारीचा प्रकार घडला. आरिफ नजीर बेपारी (वय ३४, सदर बाजार), हमीद अल्लाबक्ष बेपारी (३०, सदर...
एप्रिल 30, 2019
निवडणुकांचा एकूण सामाजिक खर्च व संबंधित राजकीय पक्षांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. अशा वेळी पारदर्शी व उत्तरदायित्व असलेले निवडणूक रोखे उपलब्ध करणे, हा राजकीय पक्षांच्या सत्तास्पर्धेत समतोल निर्माण करण्याचा उत्तम मार्ग ठरेल. देशाच्या राजकीय चर्चेतील एक ठळक मुद्दा असतो तो भ्रष्टाचाराचा. आजवर...
एप्रिल 28, 2019
श्रीलंकेत "ईस्टर संडे'च्या दिवशी दहशतवादी गटानं नुकताच तीन चर्च आणि परदेशी पर्यटकांनी गजबजलेल्या तीन आलिशान हॉटेलांवर आत्मघाती हल्ले करून साडेतीनशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. धर्मकेंद्री दहशतवाद जगाच्या कानाकोपऱ्यात थैमान घालत असताना अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडत आहेत. या सगळ्या घटनांची मुळं...
एप्रिल 21, 2019
मी आधीही एका असाधारण उंचीच्या गुन्हेगाराबद्दल वाचलं होतं. माझ्या आठवणीनुसार, त्या गुन्हेगाराच्या उंचीबद्दल मी माझी टिप्पणीदेखील लिहिलेली होती. माझ्या टिप्पणीसह पाठवलेला तो आधीचा रिपोर्ट माझ्याकडं परत पाठवायला मी संबंधित विभागाला सांगितलं. ही गोष्ट आहे सन 2004 च्या मध्यातली. मी पंजाबच्या गुप्तचर...
एप्रिल 14, 2019
निवडणुकीच्या मोसमात जाहीरनामे प्रकाशित करणं हे आता कर्मकांड बनलं आहे. जाहीरनाम्यात काय दिलं आणि त्यातून देशाच्या विकासाचा कोणता आराखडा मांडला यापेक्षा निवडणुकीच्या मैदानात एकमेकांची उणीदुणी काढण्याला, जाहीर वाभाडे काढण्याला अधिक महत्त्व येते आहे. निवडणुकीच्या काळातील प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांचं...
एप्रिल 08, 2019
वरुड (अमरावती) : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी पुसली शेत शिवारामध्ये एक युवा शेतकऱ्याला सायंकाळचे सुमारास एका पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यामुळे त्याने शेतातीलच कडु लिंबाच्या झाडावर चढुन तब्बल दोन तास आश्रय घेतला. अखेर मध्यप्रदेशातील खडकी येथील गावकऱ्यांच्या मदतीने झाडाखाली उतरून युवा शेतकऱ्याचे...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून,...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 19, 2019
औरंगाबाद - अरे, तो आत गेला... अगं तो बेशुद्ध झाला... पळा लवकर, चला चला म्हणेपर्यंत दोघांचा बळी गेला अन्‌ तिसरा गटारीत गडप झाला. कुणाचा बाप, पती गेला, तर कुणाच्या भावाची शुद्ध हरपली. जमिनीवर अंग सोडून कुणी हंबरडा फोडत होते. कुणी एकमेकांचा आधार घेत असहाय झाले होते... हे चित्र काळीज पिळवटून टाकत होते...
मार्च 13, 2019
मूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...
मार्च 13, 2019
‘निवडून येण्याची क्षमता’ एवढ्या एकमेव निकषाचे झापड लावून जर सगळे निर्णय घेतले तर लोकशाहीचा आशय खुरटलेलाच राहील. पटनाईक यांचे पाऊल म्हणूनच महत्त्वाचे. उमेदवारांची पळवापळवी, आरोप-प्रत्यारोपांची धुळवड आणि व्यक्तींभोवती राजकारण फिरविण्याचा प्रयत्न अशा अनेक गोष्टींना ऊत आलेला असताना ओडिशाचे मुख्यमंत्री...
मार्च 12, 2019
भुसावळ : मध्य रेल्वेत भुसावळ रेल्वे स्थानकाला जंक्शनचा दर्जा प्राप्त आहे. तसेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचे यार्ड भुसावळला आहे. दररोज दोनशेच्यावर गाड्यांमधून हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आगीच्या घटनांवर नियंत्रणासाठी रेल्वेची स्वतःची अग्निशमन यंत्रणाच...
मार्च 12, 2019
लष्करातील विविध स्तरांवर सुधारणा घडविण्याच्या प्रकल्पात राजकीय, प्रशासकीय आणि राजनैतिक पातळीवरील सहकार्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रासाठीचे समर्वसमावेशक धोरण ठरवायला हवे. भा रतीय लष्करातील व्यापक सुधारणांच्या योजनेला नुकतीच संरक्षणमंत्र्यांनी संमती दिली आहे. बालाकोटच्या यशस्वी हल्ल्यानंतर संबंधित...
मार्च 11, 2019
स्वायत्त निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होणाऱ्या नियमित निवडणुका आणि त्या मार्गाने शांततेने होणारे सत्तांतर, ही लोकशाही सदृढ झाल्याची लक्षणे भारताने गेल्या सात दशकांत सिद्ध केली आहेत. या यशात आपल्याकडच्या संस्थांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांचा वाटाही महत्त्वाचा आहे, याची नोंद घ्यायला हवी. राजकीय...
मार्च 10, 2019
जालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. "ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते. वातावरणात सतत एक...