एकूण 420 परिणाम
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 3,237 मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करूनही राज्यातील जनतेमध्ये मतदान करण्याबाबत अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मतदान करूनही शहरातील प्रश्न तसेच राहत असतील तर मतदान करून काही फायदा आहे का? त्यापेक्षा दोन दिवस सुट्टीचा आनंद तरी घेता येईल. रविवार-सोमवार दोन दिवस सुट्टी मिळाल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 18, 2019
येवला : 'पार्टी विथ डिफरन्स' असलेला भाजप शिस्तबद्ध पक्ष होता; परंतु आज शिस्त डायलूट झाली असून भाजपची अवस्था कशी झाली आहे, हे आपण पाहतोच. गेल्या पाच वर्षात विकास केला म्हणतात, पण या पक्षाचे एखादे तरी चांगले काम दाखवा. विकास केला असता, तर प्रचारात फौजा उतरवण्याची वेळ आली असती का? असा सवाल करून...
ऑक्टोबर 18, 2019
गोंदवले : माण तालुक्यात माजी आमदारांकडून एमआयडीसी आणल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या शंभर एकरातील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग सोडाच. पण, गुळाचे चांगले गुऱ्हाळदेखील सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अशा भूलथापांना माण-खटावची जनता भुलणार नाही. माण-खटाव मतदारसंघाच्या औद्योगिक...
ऑक्टोबर 18, 2019
उच्च शिक्षण घेणे खूप महागले आहे. सामान्यांसाठी ते न परवडणारे आहे. तसेच शिक्षण घेतल्यानंतर मुलांना शहरात नोकरी मिळेल याची हमी नाही. याकरिता पुणे, मुंबईकडे जाण्याचा ओढा असतो. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि नोकरीची संधी जळगावातच मिळावी; याकरिता शहरात एज्युकेशन आणि आयटी हब एमआयडीसीत...
ऑक्टोबर 18, 2019
आपल्या आमदारकीच्या काळात तालुक्यात जी काही भरीव कामे केली ती जनतेसमोर आहेत. या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी विविध विकासकामांसाठी भरीव निधी आपण आणला होता. त्यामुळेच वरखेडे- लोंढे बॅरेज प्रकल्प, ‘एमआयडीसी’, शहरासाठी गिरणा उद्भव योजना यासह इतर विविध प्रकल्पांना चालना देता आली. हा...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत सातपूरच्या कोळीवाड्यातील संदीप पुराणे याने बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑर्थोपेडिक सर्जन होण्याचे स्वप्न पूर्ण केले. शिक्षणाला पैशांची जोड नसली तरीही बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळविता येते आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे संदीप.  परिस्थितीवर मात करत संदीप बनला...
ऑक्टोबर 17, 2019
वडूज : खटाव माण तालुक्यात निर्माण झालेले दहशतीचे वातावरण, कलंकित व्यक्तींमुळे तालुक्याची होत असलेली वाताहात रोखण्यासाठी, माझ्या कुटुंबियांच्या उज्ज्वल भविष्यासह माझ्या गावच्या, परिसराच्या व खटाव-माण तालुक्यांच्या विकासासाठी अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुखसाहेब यांनाच आमदार करण्याची ग्वाही देत आहे, अशी...
ऑक्टोबर 17, 2019
"शब्द' देणे आणि तो पाळणे याला जीवनात एक महत्त्व आहे. जो दिलेला शब्द पाळतो, त्याच्यावर विश्‍वास व्यक्त केला जातो. जळगाव महापालिका कर्जमुक्त करण्याचा शब्द आपण गेल्या निवडणुकीत दिला होता. तो आपण पूर्ण करून जळगावकरांना कर्जमुक्त केले आहे. त्यामुळे गेल्या 35 वर्षांपासून प्रत्येक निवडणुकीत असलेले "...
ऑक्टोबर 17, 2019
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकारने भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभार व सुशासन जनतेला दिले. त्यामुळे देश व राज्य वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वच्छ सरकारचा एक घटक म्हणून काम करण्याची संधी मला जनतेने दिली. या विकासकामांच्या जोरावरच पुन्हा मी जनतेसमोर जात आहे. शेळगाव बॅरेजसाठी ९६८...
ऑक्टोबर 16, 2019
कोल्हापूर - सत्ताभक्षक नशा डोक्‍यात घुसली की त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणून दोन्ही काँग्रेसकडे पाहता येईल. सत्तेच्या जोरावर त्यांनी पैशांच्या तुंबड्या भरल्या. त्यांची चौकशी करायची नाही, तर करायची कोणाची? सत्तेची लालसा असणाऱ्या काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचा विनाश अटळ असल्याचे शिवसेना...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर...
ऑक्टोबर 15, 2019
स्वारगेट : यापुढील काळात एक कष्टकरी समाजाच्या सर्वसमावेशक हिताचे निर्णय घेण्याचे धोरण आम्ही कायम ठेवू, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष-शिवसेना-रिपाई-रासप महायुतीच्या कसबा विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार मुक्ता टिळक यांनी केले. भवानी पेठेत विडी कामगार महिलांच्या मेळाव्याचे आयोजन...
ऑक्टोबर 14, 2019
उदगीर (जि. लातूर ) ः  शत्रूला धडकी भरवणारे 'राफेल' हे अत्याधुनिक लढाऊ विमान विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतीय वायुदलात सहभागी झाले. उदगीरात बालपण गेलेल्या भारतीय हवाई दलातील मराठमोळा स्क्वाड्रन लीडर सौरभ सूर्यकांत अंम्बुरे याला अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' उडवण्याचा पहिला मान मिळाला आहे.   भारतीय...
ऑक्टोबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेमधून ज्यांना जायचे होते, ते गेल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पक्षबांधणी करण्यात मला यश आले. हे फक्त राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पेरलेले होते. ते पीक आज मी नवी मुंबईत घेत आहे. जनता-जनार्दन पक्षांतर करणाऱ्यांचा सूड नक्की घेईल, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 13, 2019
पिंपळनेर : चिंचदर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कैलास भटू बच्छाव व कातरवेल येथील  शिक्षिका उर्मिला कैलास बच्छाव यांनी पिंपळकोठा जनता विद्यालय या शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थी धनंजय भाऊसाहेब पवार व इयत्ता सातवीत शिकणारा महेंद्र भाऊसाहेब पवार या दोन्ही विद्यार्थ्यांकडे...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बालदी यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु बालदी यांनी माघार न घेतल्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले...
ऑक्टोबर 08, 2019
सावरगाव : भगवानबाबांच्या मार्गाने गोपीनाथ मुंडेंनी काम केले. गोपीनाथ मुंडे यांनी भगवानबाबांच्या विचाराने काम केले. ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी आयुष्य घालविले. पंकजाताईही गोपीनाथ मुंडेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम केले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. भारतीय जनता...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक ः आदिवासी बहोल तिरडशेतचे केवडीबन हे वैशिष्ट्य होते. काळाच्या ओघात वृक्षांची तोड झाली. इथल्या महिलांना पाण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. हनुमान जयंतीला होणारा यात्रोत्सव दोन वर्षांपासून बंद झालायं.  तिरडशेतमध्ये शिक्षण घेणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. नाशिक शहरालगत असलेल्या गावाचा...