एकूण 31 परिणाम
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत...
मे 19, 2019
"नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले हे मंडलोत्तर राजकारणातलं आणि कॉंग्रेसनं सत्तेसाठी आघाडीपर्वाची महती मान्य केल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातलं सर्वांत मोठं वळण आहे. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत प्रदीर्घ काळ सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची पार दाणादाण झाली आणि भाजपला स्पष्ट...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 07, 2018
नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार भाषण, त्याला पाकनं दिलेल्या उत्तरावर भारतीय प्रतिनिधींनी "राईट टू रिप्लाय'च्या माध्यमातून दिलेलं तितकंच जोरदार प्रत्युत्तर याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. ही तशी मळवाट चालण्यात स्वराज यांच्यापासून...
सप्टेंबर 30, 2018
कोणत्याही संरक्षण व्यवहारात घोटाळ्याचे, दलालीचे आरोप करणं सोपं असतं. मात्र ते सिद्ध होणं महाकठीण, हे याआधी या देशात अनेकदा दिसलं आहे. साहजिकच राफेलमध्ये कुणाला काही मलई मिळाली का यावर निर्णायक उत्तर मिळणं कठीणच. मात्र, "चौकीदार चोर है' म्हणत शंकेचं धुकं तयार करायची संधी देशात विरोधकांना...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
जुलै 15, 2018
पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराच्याच मदतीनं पुढं आलेल्या नवाझ शरीफ यांना तीनही वेळा पंतप्रधानपदाचा त्याग करावा लागला तो लष्कराच्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हस्तक्षेपानं. पनामा पेपर्स प्रकरणात आधी पंतप्रधानपदावर राहण्यास त्यांना अपात्र ठरवलं गेलं. आता त्यांना 10 वर्षं कारावासाची सजा सुनावली गेली आहे....
जून 24, 2018
जम्मू आणि काश्‍मीर राज्यातल्या भाजप-पीडीपी युतीच्या सरकारमधून भाजप बाहेर पडल्यानं मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. काश्‍मीरमधला हा विजोड संसार चालणार नव्हताच. काडीमोड कधी, इतकाच मुद्दा होता. हा निर्णय आताच का, याची कारणं भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत शोधता येतात. ध्रुवीकरण हे...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
जून 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची अनौपचारिक भेट रशियातल्या सोची या शहरात नुकतीच (21मे) झाली. भारत आणि रशिया यांची पूर्वापार मैत्री तशी जगजाहीर आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करून ही मैत्री दृढ करत नेल्याची...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य...
मे 06, 2018
कुणी नेता कितीही कणखर असला तरी आंतरराष्ट्रीय संबंध हवे तसे ठरवता येत नाहीत. त्यावर अनेक घटक प्रभाव टाकत असतात. त्यांची दखल घेऊन उभयपक्षी समन्वयाचे मुद्दे शोधत वाटचाल करत राहण्याला अनेकदा पर्याय नसतो, याची जाणीव भारत आणि चीन या दोन्ही बलाढ्य शेजारीदेशांच्या नेत्यांना झाली, हे पंतप्रधान नरेंद्र...
एप्रिल 15, 2018
नेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...
मार्च 25, 2018
लोकसभेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी सत्तारूढ भाजपच्या विरोधात, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींसाठीचं पहिलं पाऊल एनडीए आघाडीतल्या चंद्राबाबू नायडू यांनीच उचललं...
जानेवारी 14, 2018
साडेतीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तारूढ झालं तेव्हा ‘आता शेजारीदेशांत भारताचा प्रभाव वाढेलच; पण जगातही दबदबा वाढेल,’ असं एक वर्ग समजायला लागला होता. ‘मोदी यांचं सारंच न्यारं’ असं मानणारा हा वर्ग होता. मात्र आता साडेतीन वर्षं उलटल्यानंतर...