एकूण 607 परिणाम
जून 26, 2019
वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा वज्रेश्वरी तिर्थक्षेत्र परिसरात येथील नदी आटल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन ने भातसा तलावामधून पाणी सोडून निदान पिण्यापुरते तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील तहानलेले ग्रामस्थ करीत आहे. भिवंडी तालुक्यातील...
जून 26, 2019
औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची बाजूही समजून घेतली...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 24, 2019
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : संपूर्ण भारतात आपल्या वेगळ्या आकारमान आणि सौंदर्यामुळे ओळखला जाणारा बगळा जातीतील फ्लेमिंगो या पक्ष्यांचा थवा तब्बल 15 वर्षांनंतर पुन्हा तालुक्‍यातील मालखेड तलावावर आढळून आला आहे. 2004 मध्ये मोठ्या संख्येत हे पक्षी तलावावर आढळून आले होते. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात...
जून 24, 2019
कबनूर - डिजिटल इंडिया संकल्पना देशभरात सर्वत्र रुजू होत असताना कबनूर ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीची व गावची माहिती घरबसल्या ग्रामस्थांना मिळावी. यासाठी नावीन्यपूर्ण ‘स्मार्ट ॲप’ तयार करून कबनूर स्मार्ट व्हिलेज संकल्पना राबवली जात आहे. या ॲपवर कबनूरमधील सर्व माहिती मोबाईलच्या एका क्‍लिकवर मिळणार आहे...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 21, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर प्राचीन काळापासूनच नाशिक जिल्ह्याला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान लाभलंय. धर्म, निसर्ग, जैविक आणि कृषी वैविध्यानं नटलेला हा जिल्हा समृद्धतेचं एक प्रतीक मानला गेला आहे. खुद्द नाशिक शहर आणि परिसरातील काळा राम, गोरा राम, सीतागुंफा, तपोवन, पांडव लेणी आणि बारा...
जून 20, 2019
चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट ते राजापूर दरम्यानच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर तत्काळ दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधान परिषदेत दिली.  जिल्ह्यातील बाणकोट ते...
जून 19, 2019
औरंगाबाद : 'सकाळ'ने (ता.19) जूनच्या अंकात "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरा, पानचक्की तसेच जिल्ह्यातील वेरुळ - अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे जगभर नाचक्की झाल्याने देशी, विदेशी पर्यटकांनी पाठ...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८)...
जून 17, 2019
मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या "टीम देवेंद्र'च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 16, 2019
दोडामार्ग - गोव्यातील पर्यटकांची तेरवण-मेढेला पसंती आहे. तेथील घनगर्द झाडी, खळाळता पाण्याचा प्रवाह आणि जवळचा निळाशार उन्नेयी बंधारा त्यांना साद घालत असतो. त्यामुळे वीकेंडला येणारा शनिवार आणि रविवार त्यांच्यासाठी "फन डे' असतो.  तिलारी धरण आणि परिसर टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तिलारी धरणाच्या एका बाजूला...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  त्यानुसार...
जून 13, 2019
सांगली - सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चांदोली धरण आणि जंगल परिसराचा भाग्योदय समीप आला आहे. आजवर केवळ कागदी घोडे नाचवून चांदोली विकासाच्या गप्पा मारल्या जात होत्या. आता राज्य शासनाने हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या पर्यटनक्षम धरणांसह धरणानजीक अतिरिक्त जमिनी,...
जून 13, 2019
मुंबई - मुंबईतून एलिफंटा लेणीपर्यंत पोहचण्यासाठी रोप वे तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या सोयीसाठी जेटीची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. सर्व विकासकामांचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आढावा घेतला. एलिफंटा लेणी जागतिक वारसा...
जून 12, 2019
मुंबई - राज्यातील अनेक धरणांवरील विश्रामगृहांमध्ये यापूर्वी खासगी व्यक्‍तींना प्रवेश निषिद्ध होता. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही विश्रामगृहे विकसित करून ती भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला; पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक धरणे संवेदनशील असल्याने...