एकूण 239 परिणाम
जून 26, 2019
वज्रेश्वरी : ठाणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशा वज्रेश्वरी तिर्थक्षेत्र परिसरात येथील नदी आटल्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन ने भातसा तलावामधून पाणी सोडून निदान पिण्यापुरते तरी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी येथील तहानलेले ग्रामस्थ करीत आहे. भिवंडी तालुक्यातील...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ,...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा सरदार कारमधून...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या नकाशावर नेऊया...
मे 08, 2019
पुणे : दिवे घाटातून प्रवास करताना घाटमाथ्यावरून घाटपायथ्याशी नजर टाकताच निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या अत्यंत रमणीय अशा मस्तानी तलावाकडे नजर आपोआप वळते. पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या मस्तानी तलावाकडे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, वनविभाग, पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे सध्या...
एप्रिल 16, 2019
कडगाव - चार महिन्यांपासून विश्रांती घेतलेली लालपरी ‘भटवाडी-मुंबई’ पुन्हा धावू लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली पाटगाव-मुंबई व नंतरच्या काळात नामांतर होऊन धावू लागलेली भटवाडी-मुंबई. ही बस प्रवाशांच्या कमतरतेमुळे व आर्थिक तोटा होत असल्याने बंद करावी लागली होती...
मार्च 22, 2019
नेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात आहेत. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ सुरू असून माथेरान पालिकेचे याबाबत उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे.  दरम्यान, या प्रकरणाची...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 05, 2019
जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई -  माथेरानला जाण्यासाठी पर्यंटकांना नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हे आकर्षण असते. आता या मिनी ट्रेनला विशेष विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या संदर्भात शुक्रवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक...
फेब्रुवारी 05, 2019
मंडणगड - प्रतिवर्षी मंडणगड किल्ल्याला लागणार्‍या वणव्यामुळे येथील जैवविविधता, वनसंपदा नष्ट झाली आहे. दुर्मिळ पक्षी, जंगली प्राणी दिसेनासे झाले आहेत. हा वणवा मानव निर्मित असल्याची चर्चा आहे. स्थानिकांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणारी गडावरील पुरातन अवशेष, बुरुज, तटबंदी, जुने वाडे, धान्याची कोठार,...
डिसेंबर 29, 2018
कायरो : गिझा येथे एका बसवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर इजिप्तियन पोलिसांनी 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गिझा येथे झालेल्या हल्लात येथील तीन पर्यटकांसह त्यांच्या गाईडचा मृत्यू झाला. त्यानंतर आज (शनिवार) इजिप्तियन पोलिसांनी ही कारवाई केली.  गिझा येथे बसवर बॉम्बहल्ला झाला. त्यानंतर...
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
डिसेंबर 22, 2018
चेन्नई : 'रामायणा'तील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा प्रस्ताव तमिळनाडू सरकार तयार करत आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे 'राम सर्किट'चा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि तमिळनाडूमधील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याचा...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - यंदाच्या अर्थसंकल्पातील (2018-19) मंजूर निधीपैकी पन्नास टक्‍के इतका निधी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरित झाला आहे, तर एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ 38 टक्‍के इतका निधी आतापर्यंत खर्च झाला आहे. विकासकामाला निधी मिळवण्यासाठी वणवण भटकणारे राज्य सरकार अर्थसंकल्पातील निधी खर्च...
डिसेंबर 04, 2018
मडगाव  : गोव्याच्या सीमेपासून 60 किलोमीटरपर्यंतच्या मच्छिमारांना गोव्यात मासळी पाठवण्याची मुभा देण्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या निर्णयाचे मडगाव घाऊक मासळी विक्रेता संघटनेने स्वागत केले असून, 6 डिसेंबरपासून महाराष्ट्र व कर्नाटकातून मासळी आयात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राणे यांच्या...
नोव्हेंबर 25, 2018
मुंबई  - बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा कायदा मोडण्यात आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्यानात जोरजोरात ध्वनिक्षेपक वाजवण्यात आला. राष्ट्रीय उद्यान, प्राणिसंग्रहालय, अभयारण्य तसेच जंगलात ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी नाही. या मोठ्या आवाजामुळे जंगलातील...