एकूण 14 परिणाम
ऑगस्ट 15, 2019
स्वातंत्र्य दिन : नवी दिल्ली - पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशभरातील 946 पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त गौरविण्यात आले आहे. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक, 117 जणांना पोलिस शौर्यपदक जाहीर झाले आहे; तर अतिविशिष्ट सेवेसाठी 89 जणांना राष्ट्रपती पोलिस पदक, तर 677 जणांना...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 10, 2019
Loksabha 2019 : नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या तारखा आज (रविवार) जाहीर केल्या. यामध्ये देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. महाराष्ट्रातील चार...
डिसेंबर 29, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने कोकणातील ३,३०७ चालक आणि वाहकांसाठी इच्छाबदल्या जाहीर केल्या आहेत. त्यांच्यात १,६६९ चालक आणि १,६३८ वाहकांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या बदल्या झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेटच मिळाली आहे. एसटी महामंडळातील चालक- वाहकांच्या...
नोव्हेंबर 18, 2018
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीनेच लढणार असल्याचे निश्‍चित झालेले असले तरी कॉंग्रेसने राज्यातील सर्वच्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुरू केल्याने राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांत लोकसभेच्या जागावाटपाचे सूत्र अद्याप निश्‍चित झालेले...
नोव्हेंबर 14, 2018
नाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...
नोव्हेंबर 02, 2018
मुंबई : राज्यातील दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी राज्य सरकारने 33 प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते दहावी, तर 26 माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  राज्यातील दुर्गम...
सप्टेंबर 26, 2018
नाशिक - "नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. "रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 25, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनादरम्यान कानडगाव (ता. गंगापूर) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत...
जुलै 12, 2018
आर्णी (यवतमाळ) : सर्वसामान्य लोकांना रोजगार देणारी  व विकास कामाची जिवणदायीनी म्हणुन ओळखली जाणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र राज्यात दुबळी होत चालली आहे. या योजनेचा कुशल निधी मागील एक वर्षापासून मिळाला नसल्याने विकास कामे व वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फज्जाच उडाला आहे...
जुलै 11, 2018
पुणे - मुंबई, ठाणे, पालघर आणि नागपूरमध्ये धो-धो पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सोलापूरसह दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली आहे. तेथील सरासरीच्या वीस टक्केही पाऊस पडल्याची नोंद झाली नसल्याची माहिती हवामान खात्याने मंगळवारी दिली. राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) दाखल होऊन...
जुलै 10, 2018
पुणे: कोकणात सुरू असलेल्या पावसाची मुसळधार थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. शनिवारपर्यंत (ता. 14) कोकणसह, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या (बुधवार) कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे....