एकूण 85 परिणाम
एप्रिल 11, 2019
किन्हवली :  साखरपुडा झाल्यावर वर पक्षाने हुंड्याची मागणी करून लग्न मोडल्याने वधूपक्षाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर कारवाई करण्या ऐवजी वधूच्या नातेवाईकांना दमदाटी करणाऱ्या पोलिसांविरोधात वधू कविता दामोदर फर्डे हिने आज (दि.11) सकाळी 11:30 पासून किन्हवली पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे....
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
फेब्रुवारी 16, 2019
मोखाडा (ता. जव्हार) : येथील आदिवासी भागात अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम असून, या आदिवासी भागात भगतगीरी, बुवाबाजी, भूत लागणे, भूत काढणे, काटा काढणे, आजारपण करून टाकणे, असे अंधश्रद्धेचे प्रकार आजही घडत आहेत. तर, अशिक्षितपणामुळे अंधश्रध्देचा पगडा आदिवासींवर कायम असल्याचे समोर आले आहे. जव्हार मधील ओझर...
जानेवारी 27, 2019
पालघर - सातपाटी गावातील श्रॉफ मैदानाबाबत निर्माण झालेल्या वादात आपल्या कुटुंबाने तटस्थ भूमिका घेतली होती. त्या रागातून काही ग्रामस्थांनी सामाजिक बहिष्कार टाकला आहे, अशी तक्रार सनी अनिल चौधरी यांनी सातपाटी सागरी पोलिस ठाण्यात केली आहे. सातपाटीतील श्रॉफ मैदानावरून वाद निर्माण झाल्यानंतर...
जानेवारी 17, 2019
मुंबई - ठाणे, पालघर जिल्ह्यांतील मिळून गेल्या १० महिन्यांत तब्बल ६१३ जणांचा भूकबळी गेला. डहाणू, जव्हार, मोखाडा आणि शहापूरसारख्या आदिवासी तालुक्‍यांत अद्याप कुपोषणाचा प्रश्‍न गंभीर असताना नजीकच्या मुंबईत मात्र शिल्लक राहिलेले अन्न फेकण्याचा प्रकार सर्रास दिसतो. उपाहारगृहे, कॅफे,...
जानेवारी 11, 2019
जालना - दामदुप्पटचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या विरोधात ता. एक डिसेंबर २०१७ रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आतापर्यंत २० हजार गुंतवणूकदारांची नावे पुढे आली आहेत. कंपनीच्या दोन मुख्य संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी,...
जानेवारी 06, 2019
वसई : पालघर येथील "सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली असून, अपर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. अपर पोलिस अधीक्षकांनी वसावे यांची बदली नियंत्रण कक्षात केली...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई :  पालघर जिल्ह्यतील पत्रकार हुसेन खान आणि राम परमार यांना 21 जूनला वृत्तांकन करताना, पालघर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तौफिक सैयद यांनी मोबाईल हिसकावून घेत मारहाण करून कोठडीत डांबले. त्यानंतर पहाट सहाच्या सुमारास पत्रकार राम परमार यांच्या घरात घुसून त्यांना...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्याच्या सूचना सर्व पोलिस आयुक्तालयांना देण्यात आल्या आहेत.  अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध यंत्रणांकडून उपाययोजना आणि कारवाई केली जाते. तरीही...
ऑक्टोबर 31, 2018
नालासोपारा - बॅंक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेतील चोरी प्रकरणात फरारी असलेल्या आरोपीला वसईत अटक करण्यात आली. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. वालीव परिसरातील अन्य दोन घरफोडींच्या तपासादरम्यान आरोपी संजय बाळू कामडी (वय 30) याने बॅंक ऑफ बडोदा चोरी प्रकरणातील स्वत:च्या...
ऑक्टोबर 31, 2018
नालासोपारा : बँक ऑफ बडोदाच्या सानपाडा येथील शाखेतील चोरी प्रकरणात फरारी असलेल्या आरोपीला वसईत अटक करण्यात आली. वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. वालीव परिसरातील अन्य दोन घरफोडींच्या तपासादरम्यान आरोपी संजय बाळू कामडी (वय 30) याने बँक ऑफ बडोदा चोरी प्रकरणातील स्वत:च्या...
ऑक्टोबर 10, 2018
बोर्डी (जि. पालघर) - डहाणूतील चिखले गावात काही अतिरेक्‍यांनी शस्त्रसाठ्यासह घुसखोरी केल्याप्रकरणी सोमवारी (ता. 8) रात्रीपासून सुरू करण्यात आलेली शोधमोहीम मंगळवारी (ता. 9) दिवसभर सुरू होती. ग्रामस्थांच्या मदतीने पालघर पोलिस, रॅपिड ऍक्‍शन फोर्स, तटरक्षक दल आदी तपास...
ऑक्टोबर 09, 2018
बोर्डी : डहाणु तालुक्यातील समुद्र किनारी असलेल्या चिखले गावात काही संशयित बंदुकधारी व्यक्ती आढळून आल्यानंतर सोमवारी रात्री पोलिसांनी सुरु केलेली शोध मोहिम मंगळवारी सकाळपासून चालू ठेवण्यात आली. प्रत्यक्षदर्शी योगेश राऊत यांनी आज सकाळी घोलवड पोलिस ठाण्यात हजर राहून सोमवारी रात्री घडलेला प्रकार...
ऑक्टोबर 04, 2018
मुंबई - बांगलादेशातील मुलींना फसवून देहविक्रयासाठी भारतात आणल्यानंतर त्यांच्या कमाईचा पैसा हवालामार्फत या मुलींच्या कुटुंबाला पाठवला जातो. याच पैशातून बांगलादेशी दलालांनी तिकडे कोट्यवधींची मालमत्ता उभी केल्याचे पालघर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 14 ते 23 वयोगटांतील मुलींना...
सप्टेंबर 28, 2018
नवी मुंबई - मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लील चाळे करून पलायन करणाऱ्या सिरीयल रेपिस्टला सीसी टीव्ही फुटेजमुळेच अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांनी यश आले आहे. रेहान अब्दुल राशिद कुरेशी असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला वाशी न्यायालयाने 6 ऑक्‍टोबरपर्यंत...
सप्टेंबर 27, 2018
सांगली - आश्रमशाळेत ५ मुलींवर बलात्कार निनाई आश्रम शाळेचा संस्थापक अरविंद आबा पवार (वय ६१, रा. मांगले, ता. शिराळा) याने शाळेतील अल्पवयीन मुलींच्या असहायतेचा गैरफायदा घेत पाच जणींवर बलात्कार व तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. कुरळप पोलिसांना काल मिळालेल्या निनावी पत्रावरून...
सप्टेंबर 27, 2018
नवी मुंबई / वसई - मुंबई, नवी मुंबई आणि नालासोपारा येथे अल्पवयीन मुलींना हेरून त्यांच्याशी अश्‍लील चाळे, अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांच्या रडारवर असलेल्या विकृत नराधमावर अखेर बुधवारी नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने झडप घातली. त्याला मीरा रोड येथील "एस-9' या बारसमोरील...
सप्टेंबर 22, 2018
नालासोपारा - मुंबई, नवी मुंबईसह ठाणे ग्रामीण व शहर परिसरातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारा ‘सिरीयल रेपिस्ट’ आता नालासोपाऱ्यात सक्रिय झाल्याचे दोन घटनांवरून उघडकीस आले आहे. या नराधमाने चार दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका मुलीने आरडाओरड करत त्याच्या...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई : देशसेवे करीता आर्मीत भर्ती व्हा! आर्मीचा यूनिफॉर्म सर्व भारतीयांच्या अभिमानाचा केंद्र बिंदू आहे.सैनिक म्हणजे देशाचा रक्षण कर्ता होय. देशावरील विविध आपदांच्या वेळी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स नेहमी आपले कर्तव्य बजावत नागरिकांच्या जीवीत आणि मालमत्तेचे रक्षण करीत असतात. जनतेच्या हृदयात...
ऑगस्ट 27, 2018
वाडा : वाडा तालुक्‍यातील बिलोशी गावात रिलायन्स गॅस लाईनच्या कामात शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या वेळी शेतकरी व पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. या दरम्यान पोलिसाने शेतकऱ्याला श्रीमुखात लगावल्याने वातावरण तंग झाले आहे. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याने 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे...