एकूण 92 परिणाम
जून 21, 2019
दोडामार्ग - ग्रामविकास विभागाने 13 जूनला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा तिसरा टप्पा घोषित केला. या टप्प्यात राज्यभरात 800 पेक्षा अधिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या; मात्र खुला प्रवर्ग वगळून इतर सर्व प्रवर्गाच्या रिक्त पदावर आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या. शिवाय...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप...
मे 21, 2019
पुणे - दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसानेही (वळीव) या वर्षी आतापर्यंत हजेरी लावली नाही. मुंबई, पालघर आणि नगरमध्ये तर वळवाची एकही सर पडली नाही. त्यामुळे राज्यातील उन्हाचा चटका वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे. राज्यात १ मार्च ते १९ मे या ८०...
एप्रिल 12, 2019
एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत  मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.  सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती असते. त्यामुळे...
मार्च 07, 2019
महाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विविध 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...
मार्च 01, 2019
तलासरी : तलासरी; पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात मागील नव्हेंबर महिन्यापासून एका पाठोपाठ वारंवार सौम्य मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ह्यामध्ये मागील फेब्रुवारी महिन्यात 1 तारखेला शुक्रवारी जवळजवळ 16 भूकंपाचे धक्के एकापाठोपाठ एक भूकंपाचे जाणवले होते. त्यातील 6 भूकंपाची...
फेब्रुवारी 24, 2019
सिन्नर - ‘संत्रा-लेमन गोलीऽऽ... आस्मानतारा गोलीऽऽऽ.. बोलो टाइमपासऽऽऽ...’ रेल्वेच्या प्रवाशांसाठी नवी नसलेली, स्वतःच्या पहाडी आवाजात ही हाक गुंजते ती जनशताब्दी एक्‍स्प्रेसमध्ये नाशिक रोड ते दादर या रेल्वेप्रवासात. ही हाक देतोय तो बेरोजगार दिव्यांग शिक्षक अब्दुल मणियार तेही आपल्या आईच्या उपचारासाठी...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई - शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर असंघटितपणाचा शिक्का पुसून संस्थात्मक पातळीवर नव्याने एकत्र येण्याची प्रेरणा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना मिळू लागली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या सहा जिल्ह्यांतील...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात रोजगार हमी योजना विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची (मनरेगा) राज्यात ४४ हजार ५५५ कामे सुरू असून, त्यावर २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती आहे. जानेवारीअखेर मजुरांची संख्या ४४ हजार ६१९ इतकी...
फेब्रुवारी 08, 2019
वाडा (ठाणे): जगात भारताची कमजोर व गरीबांचा देश म्हणून ओळख होती. भारताला कुणीही झुकवू शकतो, अशी देशाची प्रतिमा निर्माण होऊ पाहत होती. वाजपेयीच्या रूपाने देशाला कणखर पंतप्रधान लाभला. त्यांनी अणुचाचणी घडवून भारत जगातील महासत्ता बनण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले तसेच कारगिल विजय प्राप्त करून भारत...
जानेवारी 19, 2019
मोखाडा :  सन 1992 - 93  साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125  हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यानंतर शासनाची संपूर्ण यंत्रणा येथे कामाला लागली होती. मात्र, बालमृत्यू आणि कुपोषणाला आळा घालण्यात शासनाला यश आले नव्हते. परंतू...
जानेवारी 18, 2019
बारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ कामगार नेते भालचंद्र कांगो यांनी दिली. बारामतीतील कामगार मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना...
जानेवारी 15, 2019
बोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र ठाकुर यांनी वसई-विरार महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात ससु नवघर येथे लवकरच घाऊक बाजारपेठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. यामुळे पालघर...
जानेवारी 06, 2019
वसई : पालघर येथील "सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली असून, अपर पोलिस अधीक्षक योगेश चव्हाण यांनी त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. अपर पोलिस अधीक्षकांनी वसावे यांची बदली नियंत्रण कक्षात केली...
डिसेंबर 13, 2018
बोर्डी -  धोलवड सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी पूलापर्यंतच्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम अल्पावधीत पुर्ण करण्या आले असुन, बुधवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. डहाणु-चिखले मार्गे धोलवड आणि बोर्डी गावाला जोडणाऱ्या मुख्य मार्गावरील सरकारी दवाखाना ते कोलपाडा खाडी...
डिसेंबर 03, 2018
मोखाडा - मोखाड्यातील गोमघर येथे आदिवासी समन्वय समिती ने आयोजित मेळाव्यात आदिवासी संस्कृतीचे जतन करीत, आदिवासी नृत्य, करण्यात आले आहे. मेळाव्यात आदिवासींचे अधिकार अबाधित ठेवून घुसखोरी करणार्‍या धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असा एल्गार करण्यात आला आहे. या मेळाव्यास कोकण विभागातील जिल्ह्यासह नाशिक, नगर...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - न्यायालयाने आणि सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचे मापदंड ठरवून दिल्यानंतरही ते प्रत्यक्ष अमलात न येऊ शकल्याने आजमितीला सुमारे चार लाखांवर विद्यार्थ्यांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ‘शिक्षणाचा भार’ कायम आहे. देशाचा आधारस्तंभ ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठीचा कणा वाकडा होण्याची...
डिसेंबर 03, 2018
मुंबई - राज्य सरकारने केलेल्या कुष्ठरोग शोध पाहणीत ४ हजार ८९४ कुष्ठरोगी आढळून आले आहेत.  विशेष म्हणजे घराघरांत जाऊन केलेल्या या पाहणीत लपून राहिलेले रुग्णदेखील सापडल्याने कुष्ठरोग्यांची संख्या वाढल्याचा दावा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी केला आहे. कुष्ठरोग शोध अभियानात शंभर टक्के ग्रामीण...
नोव्हेंबर 15, 2018
बोर्डी : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कासा गावातील उपजिल्हा रुग्णालयाला ट्रामा सेंटरचा दर्जा दिल्याचे दाखवुन आय. आर. बी कंपनी जनतेच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप मानव अधिकार समितीचे अध्यक्ष हरबंससिंग नन्नारे यांनी केला आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीया सेवा उपलब्ध...